ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मृणाल ठाकूरला लागला जॅकपॉट, तूफाननंतर आता ‘थडाम’च्या हिंदी रिमेकमध्ये एन्ट्री

मृणाल ठाकूरला लागला जॅकपॉट, तूफाननंतर आता ‘थडाम’च्या हिंदी रिमेकमध्ये एन्ट्री

टेलिव्हिजन माध्यमातून अभिनयात पदार्पण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या एकापाठोपाठ एक हिट बॉलीवूड चित्रपट करण्यात व्यस्त आहे. मृणाल ठाकूरच्या तूफानला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ज्यामुळे तिच्याकडे आता चांगल्या चित्रपटांची रांगच लागली आहे. नुकतंच मृणालने तिच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मृणाल लवकरच भूषण कुमार आणि मुराद खेतानीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूरही मुख्य भूमिकेत असेल.

संग्राम- खुशबू यांच्या घरी येणार नवा पाहुणा, शेअर केला आनंद

मृणाल ठाकूरला लागला जॅकपॉट

मृणाल ठाकूर लवकरच साऊथचा सुपरहिट चित्रपट थडाम (Thadam) च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात आधीपासूनच आदित्य रॉय कपूरचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र आता या चित्रपटासाठी मृणालची निवड करण्यात आली आहे. थडाम हा तमिळ चित्रपट असून तो साऊथमध्ये सुपरहिट ठरला होता. त्यामुळे निर्मात्यांना या चित्रपटासाठी तगडी स्टारकास्ट हवी होती. खूप शोध केल्यानंतर या चित्रपटासाठी मृणाल ठाकूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ज्यामुळे मृणालला जवळजवळ जॅकपॉटच लागला असं म्हणावं लागेल.

असं काय घडलं की पापाराझीवर एवढी भडकली यामी गौतम

ADVERTISEMENT

मृणालची भूमिका नेहमीपेक्षा हटके

मृणालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तिने आदित्य रॉय कपूरसोबत फोटो शेअर करत कॅप्शन दिली आहे, हा सामना करण्याची वेळ आहे!! आदित्य रॉय कपूरला टॅग करत तू यासाठी तयार आहेस का असा प्रश्न तिने विचारला आहे. यासोबतच तिने शेअर केलं आहे की, “थडाम या सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत वर्धन केतकर तर या चित्रपटाचे निर्माते आहेत भूषण कुमार आणि मुराद खेतानी. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू होईल. यात मृणाल एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी शीर्षकाची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मृणाल ठाकूर या वर्षी शाहिद कपूर सोबत ‘जर्सी’मध्येही लवकरच दिसणार आहे. मृणालने ‘बाटला हाऊस’मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यात ती जॉन अब्राहिमसोबत मुख्य भूमिकेत होती. पुढे ह्रतिक रोशनच्या ‘सुपर 30’ मधून तिच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. फराहान अख्तरसोबत ‘तूफान’मध्ये तिच्या भुमिकेची चांगली प्रशंसा झाली. आता तिच्या हातात लागोपाठ बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपटांची लिस्ट आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मृणाल ठाकूरचीच चर्चा सगळीकडे असण्याची शक्यता आहे.

विद्युत जामवाल आणि नंदिता मेहतानीचा झाला साखरपुडा, नेहा धुपियाने दिल्या खास शुभेच्छा

07 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT