ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्री करत होत्या बी ग्रेड चित्रपटात काम

मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्री करत होत्या बी ग्रेड चित्रपटात काम

टीव्हीवर काम करणाऱ्या अभिनेत्रींना आपण नेहमीच संस्कारी सून आणि मुलीच्या रूपात पाहत असतो. त्यामुळे बरेचदा प्रेक्षक या अभिनेत्रींना खूपच नम्र आणि खऱ्या आयुष्यातही अशाच स्वरूपाच्या या असतील असं मानतात. पण यापैकी काही अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरूवात ही बी ग्रेड चित्रपटांपासून केली आहे. याबाबत बऱ्याच जणांना माहीत नाही. टीव्ही मालिकांमध्ये मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटात काम केले होते. मात्र आज टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये यांना पाहिलं जातं. बऱ्याच चाहत्यांनाही याबाबत माहीत नाही. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. अशा अभिनेत्री ज्या यशस्वी होण्याआधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये  दिसल्या आणि त्यांनी या चित्रपटांमध्ये  काम केलं आहे. 

दिशा वकानी

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील संस्कारी सून दया ऊर्फ दिशा वकानीने आपल्या करिअरची सुरूवात बॉलीवूडमधील बी ग्रेड चित्रपटातून केली होती असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. इतकंच नाही तर दिशाने काही हॉट सीन्सही दिले होते. ‘कमसिन द अनटच्ड’ नावाच्या चित्रपटात दिशाने काम केलं होतं.  त्यानंतर तिला तारक मेहता या मालिकेत काम मिळालं आणि प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेला अक्षरशः उचलून धरलं. भोळीभाबडी दया सर्वांनाच भावली. दिशाला या मालिकेने खूप काही दिलं. दिशाने अनेक वर्ष या मालिकेत काम केलं. मात्र मुलगी झाल्यानंतर दिशा पुन्हा या मालिकेत कधी दिसणार हाच प्रश्न प्रेक्षक विचारत राहिले. दिशा हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 

रश्मी देसाई

लहान पडद्यावर अजून एक प्रसिद्ध नाव म्हणजे रश्मी देसाई. रश्मीने अनेक मालिकांमधून आणि रियालिटी शो मधून काम केले. तिची लोकप्रियता तुफान आहे. रश्मीला हे यश सहजपणात मिळालेलं नाही. रश्मीने खूपच स्ट्रगल केल्यानंतर तिला मालिकांमध्ये काम मिळालं होतं. रश्मीने मालिकांमध्ये काम करण्याआधी बॉलीवूडमध्ये बी ग्रेड चित्रपटात काम केलंच, पण त्याशिवाय तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं असून अनेक हॉट सीन्सही दिले आहेत. आता रश्मी टीव्हीवरील ए लिस्टर्स अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. बिग बॉस 13 नंतर तर तिच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. 

अर्चना पूरण सिंह

अर्चना पूरण सिंह या अभिनेत्रीचा कॉमेडीमध्ये कोणीही हात धरू शकत नाही. ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसंच कॉमेडी सर्कस आणि कपिल शर्मा शो मधूनही अर्चना नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण अर्चनाला हे यश मिळण्यापूर्वी अर्चनाने अनेक ब्री ग्रेड चित्रपटांमधूनही काम केलं आहे. रात का गुनाह सारख्या चित्रपटात अर्चनाला ब्रेक मिळाला होता. मात्र या चित्रपटांमध्ये काम करत अर्चनाने स्वतःला सिद्ध केलं आणि आज एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि कॉमेडी अभिनेत्री म्हणून तिने जागा मिळवली आहे.

ADVERTISEMENT

‘या’ बॉलीवूड अभिनेत्री एकेकाळी होत्या ‘बालकलाकार’

पायल रोहतगीची सुरुवातच बी ग्रेड आणि हॉट चित्रपटांपासून झाली. इतकंच नाही तर पायलने बॉलीवूडमधील अनेक मोस्ट सेन्शुअल सीन दिले आहेत. तिला एक हॉट अभिनेत्री म्हणूनच ओळख मिळाली. पण असं असूनही तिला बॉलीवूडमध्ये यश मिळालं नाही. मात्र बिग बॉसच्या सीझन दोनमध्ये आल्यानंतर पायलला ओळख मिळाली. इतकंच नाही तर पायल आपल्या फटकळ वक्तव्यामुळेही ओळखली जाते. 

सना खान हे नाव बिग बॉसनंतर खूपच प्रसिद्ध झालं. पण त्याआधी सनाने अनेक बॉलीवूडमधील बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ये है हाई सोसायटी, क्लायमॅक्स अशा बी ग्रेड चित्रपटात सनाने काम केलं. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या दोन रियालिटी शो मुळे. त्यानंतरही मेल्विनबरोबरील तिच्या अफेअर्सच्या आणि ब्रेकअपच्या चर्चांमुळे सना पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. 

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

ADVERTISEMENT

उर्वशी ढोलकिया

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील कमोलिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. कितीही कोणीही ही भूमिका साकारली तरी उर्वशीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. उर्वशीने आपल्या अभिनयाने ही भूमिका अजरामर केली. मात्र हे यश मिळण्यापूर्वी उर्वशीने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये  काम केलं आहे. इतकंच नाही तर तिने अनेक इंटिमेट सीनही चित्रपटांमध्ये दिले आहेत. स्वप्नम नावाच्या एका बी ग्रेड चित्रपटात उर्वशीने केलेलं काम अनेकांच्या लक्षात असेल. 

घटस्फोटानंतरही भक्कमपणे उभ्या राहिल्या या अभिनेत्री

नेहा धुपिया

नेहा धुपिया हे नाव आज रोडीज असो अथवा फॅशन स्टेटमेंट असो प्रसिद्ध आहे. मात्र करिअरची सुरूवात नेहाने बॉलीवूडमधील अगदीच बी ग्रेड चित्रपटांमधून केली. नेहाने अनेक चित्रपटांमध्ये हॉट सीन्स दिले आहेत. नेहाने जास्त ए लिस्टर्स चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरीही ती टीव्हीवरील काही रियालिटी शो मधून प्रसिद्ध झाली. 

31 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT