वाणी कपूरने यश राज बॅनरमधून दमदार पदार्पण केलं. पण त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये जास्त चित्रपट केले नाहीत. पण आता वाणी पुन्हा एकदा हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासह ‘वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये वाणी कपूर एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतेय. वाणीचा हा लुक सध्या व्हायरल होत आहे. हॉट बिकिनी बॉडीसाठी वाणीने खास ट्रेनिंग घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. वाणी कपूरचा आगामी चित्रपट हा अॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर वाणी यामध्ये हॉटनेसचा तडका लावणार असल्याचं दिसून येत आहे. वाणी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या फोटोंमध्ये नेहमीच हॉट लुकमध्ये दिसते. पण या लुकसाठी वाणीने टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
यास्मिन कराचीवालाकडून घेतलं खास ट्रेनिंग
वाणीने आपला चित्रपट ‘वॉर’मध्ये परफेक्ट बिकिनी बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे. यासाठी तिने यास्मिन कराचीवालाकडून ट्रेनिंग घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चित्रपटाच्या पूर्वी साधारण 10 आठवडे वाणी यासाठी मेहनत करत होती. तेव्हा तिला आपल्या शरीराचा योग्य आकार मिळवता आला. मूळची दिल्लीची असणारी वाणी आधी मॉडेलिंग करत होती. त्यानंतर तिने चित्रपटातून पदार्पण केलं. शुद्ध देसी रोमान्समध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलेल्या वाणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. तर त्यानंतर तिने रणवीर सिंगबरोबर बेफिक्रे हा चित्रपट केला आणि त्याशिवाय तामिळ चित्रपट आहा कल्याणममध्येही तिने काम केलं. त्याव्यतिरिक्त वाणीला जास्त चित्रपट मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे आता या चित्रपटाकडून वाणीला खूपच अपेक्षा आहेत.
Bigg Boss 2 ‘टिकिट टू फिनाले’ शिवानीला मिळणं कितपत योग्य
यानंतर वाणी दिसणार शमशेरामध्ये
याशिवाय वाणी आता रणबीर कपूरबरोबर शमशेरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरबरोबर वाणी रोमान्स करणार आहे. तसंच या चित्रपटात संजय दत्तदेखील आहे. त्यामुळे अजून वाणीला तितकं यश मिळालं नसलं तरीही तिच्या हाताामध्ये सध्या चांगले प्रोजेक्ट्स आहेत. हा चित्रपटदेखील यशराज प्रॉडक्शनचा असून यामध्ये वाणीची भूमिका वेगळ्या धाटणीची असल्याचं सांगण्यात येत आहे. वाणीने अजूनही यशराजच्या बाहेर जास्त चित्रपट केलेले नाहीत. वास्तविक तिला अजूनही दुसऱ्या बॅनर्सकडून जास्त प्रस्ताव आलेले नाहीत असं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तिचं लक्ष वॉर या चित्रपटाकडे केंद्रित झालं असून या चित्रपटाकडून तिला यशाची अपेक्षा आहे.
SHOCKING : Insha-Allah चित्रपटाबाबत भाईजानचं धक्कादायक ट्वीट
वाणी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
वाणी कपूर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आपले बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो ती नेहमीच पोस्ट करत असते. तसंच सोशल मीडियावर तिला बरेच फॉलोअर्सही आहेत. सध्या वाणीचे चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत. मुख्यत्वे या चित्रपटात ती पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासह काम करत आहे. त्यामुळे ही तिगडी कशी दिसेल आणि हा चित्रपट नक्की कसा असेल अशी उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. लवकरच याचं उत्तर कळेल. शिवाय वाणीला अशा हॉट लुकमध्ये पाहायला नक्कीच तिचे चाहतेही उत्सुक असतील.
आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल