ADVERTISEMENT
home / मनोरंजन
एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका

एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका

आहिल्याबाई होळकर या भारतातील माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून आजही ओळखल्या जातात. याच इतिहासाची ओळख करून देणारी मालिका पुण्यश्लोक आहिल्याबाई सध्या  सोनी वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेतील छोटया आहिल्येची भूमिका संपून आता त्यांचा किशोरवयीन इतिहास मालिकेत दाखवला जाणार आहे. ज्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत काळ झपाट्याने म्हणजे जवळजवळ सात वर्षे पुढे सरकणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना आता आहिल्याबाईंचा युवा अध्याय पाहता येणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी हिची तरुण अहिल्याबाई होळकरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील तिचे यश, प्रेक्षकांचे प्रेम  आणि मालिकेतील या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पात्रता असल्यामुळे एतशाची निवड करण्यात आली आहे.

एतशा संझगिरीसमोर आहे आहिल्याबाई  साकारण्याचे आव्हान

या मालिकेसाठी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करत एतशा संझगिरीने तिच्या भावना शेअर केल्या ती म्हणाली की, “भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला शासक असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. पुण्यश्लोक अहिल्याबाई ही सध्या टेलिव्हिजनवरची प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका आहे आणि याचे श्रेय त्यातील उत्कृष्ट अभिनय आणि दमदार कथानकाला जाते. मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरोखर, माझे जणू स्वप्नच साकार झाले आहे!”

भारतीय इतिहासातील एक शूर महिला शासक

पुण्यश्लोक आहिल्याबाई मालिकेत आता अहिल्याबाईंच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. स्वतःचा मार्ग शोधताना सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत आणि समाजातील अनिष्ट रूढींवर विजय मिळवत भारतीय इतिहासातील एका महान महिला शासक बनण्याच्या कीर्तीपर्यंतची अहिल्याबाईंची वाटचाल या मालिकेतून दिसणार आहे.आहिल्याबाईंचे सासरे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. आहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले मात्र त्यानंतर तत्त्कालिन प्रथेनुसार मल्हाररावांनी आहिल्याबाईंना सती जाण्यापासून  रोखले. उलट त्यांच्या चार्तुर्याची प्रशंसा करत त्यांनी नेहमी आहिल्याबाईंना राज्य कारभार आणि सैन्याच्या कारभारात पारंगत केले. पुढे  सासऱ्यांच्या मृत्युनंतर मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताचा कारभार आहिल्याबाईंनी सांभाळला. अनेक लढायांमध्ये आहिल्याबाई स्वतः नेतृत्व करत होत्या. इंग्रजी लेखकांनी तर आहिल्याबाईंच्या शौर्याची तुलना इंग्लडची राणी एलिझाबेथ यांच्याशी केलेली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं रोमॅंटिक फोटोशूट, चाहत्यांना आवडला अंदाज

ADVERTISEMENT

बिग बॉस OTT’ ची जबरदस्त सुरूवात, काय होणार पुढे याची चाहत्यांना उत्सुकता

आणखी एक मराठी अभिनेत्री खूप वर्षांनी दिसणार छोट्या पडद्यावर

09 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT