ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी मॉडेल सोशल मीडियावर होतेय व्हायरल

ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी मॉडेल सोशल मीडियावर होतेय व्हायरल

एकाच चेहऱ्याप्रमाणे दिसणारे अनेक लोक या जगात असू शकतात. मात्र अभिनेते आणि अभिनेत्रींप्रमाणे दिसणारे ड्युप्लिकेट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आतापर्यंत शाहरूख खान, अनुष्का शर्मा, अमीर खान, रणबीर कपूर, दीपिका पदूकोन, सलमान खान, अमिताभ बच्चन, शत्रूघ्न सिन्हा, अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा अशा अनेक अॅक्टर्सच्या ड्यूप्लिकेटची चर्चा झाली आहे. सध्या विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासारखी दिसणारी एक मॉडेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मघलाना दिसते हुबेहुबे ऐश्वर्यासारखी

महलाघा जबेरी ही इराणी मॉडेल हुबेहुब दिसणारी आणि तिच्याइतकीच सुंदर आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ती कार्बन कॉपी आहे असं म्हटलं जात आहे. महलाना इराणमध्ये मॉडेलिंग करत आहे. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असून तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. तिच्या इंन्स्टा अकाऊंटला जवळजवळ सत्ताविस लाख फॉलोवर्स आहेत.

महलाघा सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याच मॅगझिनच्या कव्हर फोटोवर ती झळकली आहे. काही संशोधनानुसार ती जगातील सर्वात सुंदर महिला आहे असं म्हटलं जात आहे. महलाघा सध्या मॉडेलिंगसाठी अमेरिकेत राहत आहे.

स्नेहा उल्लालदेखील होती ऐश्वर्याची ड्यूप्लिकेट

महलाघा जबेरी प्रमाणे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा उल्लालदेखील ऐश्वर्याप्रमाणे दिसत असल्याची चर्चा रंगली होती. स्नेहाने सलमान खानच्या लकी या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ऐश्वर्या आणि सलमान खानच्या ब्रेकअपनंतर हा तिला मुद्दाम घेण्यात आलं होतं. कारण तीचा लुक ऐश्वर्याप्रमाणे दिसत होता. स्नेहा तिच्या दिसण्यामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आजारपणामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. आता चौदा वर्षांनी ती पुन्हा कमबॅक करणार आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या सोशल मीडियावरील नवीन ड्यूप्लिकेटमुळे मात्र पुन्हा या चर्चांना उधाण आलं आहे. 

ADVERTISEMENT

कंगनाच्या बहिणीचा ऋतिकवर निशाणा, म्हणाली आता तू बघच

जाहिरात विश्वात बाजीराव-मस्तानीची जोडी सर्वाधिक लोकप्रिय

लेक कोमोला का जात आहेत रणबीर-आलिया

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

 

09 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT