कंगनाच्या बहिणीचा ऋतिकवर निशाणा, म्हणाली आता तू बघच

कंगनाच्या बहिणीचा ऋतिकवर निशाणा, म्हणाली आता तू बघच

कंगनाच्या वादग्रस्त विधानामुळे होणारा गोंधळ कमी नाही… तोच आता तिच्या बहिणीमुळेही बी टाऊनमध्ये रोज नवे वाद येऊ लागले आहेत. आता रंगोलीने आणखी एक नवा वाद सोशल मीडियावर सुरु केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रंगोली अनेकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. हा वाद रंगोली, ऋतिक आणि एकता कपूर यामध्ये रंगला असून या भांडणात रंगोलीचा तोल गेला आहे इतके मात्र नक्की!


आलिया ही करणच्या हातातली बाहुली- कंगना रनौतनेमकं प्रकरण काय?


झालं असं की, कंगनाचा ‘मेंटल हे क्या?’ आणि ऋतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे. आता तुम्हाला कंगना आणि ऋतिकचे प्रकरण माहीत असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. एकाच  दिवशी चित्रपट रिलीज होण्यावरुन कंगनाची बहीण खूपच नाराज झाली.तिने थेट ऋतिक आणि चित्रपटाची निर्माती एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनला भलतंसलतं बोलायला सुरुवात केली. तिने ऋतिक तू असा कसा वागू शकतोस… आता तू बघच अशा स्वरुपाची धमकीच कंगनाच्या बहिणीने ऋतिकला दिली आहे.  समोर येऊन मैदानात खेळण्याऐवजी तू अशा पद्धतीने वार करतोस.. आता बघ तूझं कंगना काय करते.


वेबसिरीजनंतर आता सैफला सिरीअलचे वेड

एका मागोमाग केले ट्विट


आलियाच्या अभिनयावर कंगनाने अशी केली टीक ही आलियाचे फॅन्स झाले नाराज


 रंगोली एक किंवा दोन ट्विट करुन थांबली नाही तर तिने लागोपाठ या संदर्भातील ट्विट केले आहेत. रंगोली कंगनाचे सगळे काम पाहते. ती कंगनाची मॅनेजर म्हणून काम करते. कंगनाच्या आगामी चित्रपटासाठी तिची जोरदार तयारी सुरु झाली असून ऋतिकच्या पीआर कंपनीने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अत्यंत वाईट अशी पीआर पॉलिसी निवडली आहे, असे ती म्हणाली आहे.    


kangana rangoli fi %281%29


ऋतिक पप्पू आहे


रंगोलीचा राग इतका अनावर झाला की, तिने असे काही ट्विट केले आहेत ज्यामुळे समोरच्याला राग येईल. एकता कपूर आहे म्हणून कधीही चित्रपट रिलीज कराल. पण पप्पू तर पप्पूच राहणार ना? आता तू बघ तूझे काय होईल. कंगनाने एक इंटरव्ह्यू देईल आणि विजय मिळवेल.


एकताने बदलली तारीख ?आता एकताच्या बॅनरखाली हा चित्रपट आहे म्हटल्यावर एकताला यावर उत्तर देणे भाग आहे म्हणा. एकताने रंगोलीच्या ट्विटला उत्तर देत माझा चित्रपट आणि मी ठरवलेली तारीख यामध्ये या चित्रपटातील स्टारकास्टशी काहीच घेणंदेणं नाही. मी या आधीही या सगळ्यागोष्टी सामंजस्याने सोडवूया असे म्हटले होते. पण तसे काहीच न करता हा वाद चव्हाठ्यावर आणला आहे जे चांगले नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की हा चित्रपट येत्या 26 जुलैला रिलीज होणार आहे.


 (फोटो सौजन्य- Instagram)