हिंदू सणांमध्ये महाशिवरात्री या सणाला फार महत्व आहे. अगदी काहीच दिवसांवर महाशिवरात्री आली आहे. तुम्ही घरातील मोठ्यांकडून महाशिवरात्रीविषयी बरेच काही ऐकले असेल. महाशिवरात्री म्हणजे काय? या दिवसाचे महत्व काय? या दिवशी उपवास का करतात वगैरै. पण जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्याचा अवलंब तुम्ही येत्या महाशिवरात्रीला करु शकता. मग आज जाणून घेऊया महाशिवरात्रीविषयी…
महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराबाबत जाणून घ्या ‘या’ रहस्यमय गोष्टी
तुम्हाला हे माहीत आहे का?
प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्थीला शिवरात्र असतेच. पण फाल्गुन कृष्ण चतुर्थीला येणारी शिवरात्र ही ‘महारात्र’ म्हणून साजरी केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली. काही पौराणिक कथांच्या दाखल्यानुसार ‘आरंभ अग्निलिंग’ या शिवाच्या महाकाय रुपाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. शिवाय याच दिवशी देवी पार्वतीसोबत त्यांचा विवाह झाला असे देखील म्हटले जाते. वर्षभरात एकूण 12 शिवरात्र येतात त्यापैकी ही शिवरात्र ही या काही कारणांमुळेच सगळ्यात मोठी आहे. दरवर्षी महाशिवरात्र ही इंग्रजी महिन्याच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी या उत्सवाचे स्वरुप वेगवेगळे आहे. काही ठिकाणी हा दिवस शंकराच्या विश्रांतीच्या काळाा असतो असे देखील म्हणतात. अहमदाबाद,नेपाळमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
अशी करा शंकराची पूजा
आता महाशिवरात्रीला शंकराची पूजा कशी करावी अशा विचारात तर तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीने ही पूजा घरच्या घरी करता येते.
- या दिवशी सर्वसाधारपणे शंकराच्या पिंडीला अभिषेक केला जातो. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक या पैकी तुम्ही काहीही करु शकता. जर तुम्ही शंकराला अभिषेक करणार असाल. तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी ताम्हणात शिव पिंड घेऊन त्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करु शकता. हे करताना ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जाप करा.
- जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर पहाटे उठून स्नान करुन पुरुष आणि महिला दोन्हीही मंदिरात जाऊ शकता. शिवाच्या पिंडीला अभिषेक करु शकता. त्यानंतर पिंडीला साधारण तीन वेळा परिक्रमा घाला.
महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा (Happy Mahashivratri Wishes In Marathi)
शिवपुराणानुसार अशी करतात पूजा
- शिव पुराणानुसार पूजा करताना 6 गोष्टींचा समावेश असणे फारच गरजेचे असते.
सगळ्यात आधी शिवाच्या पिंडीवर दूध, मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो. बेल हे आत्मा शुद्धीकरण्याचे प्रतिक मानले जाते म्हणून बेलाचा अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणात आहे. ( प्रत्येक देवाला काही खास वाहिले जाते हे आपण जाणतो. त्याच प्रमाणे शंकराला बेल वाहिली जाते हे तुम्ही ऐकले असेलच) - त्यानंतर मूर्तीला सिंदूर लेपन केले जाते. ( यामध्ये हळदी कुंकू नाही तर भस्म वापरले जाते)
- महादेवाला फळांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की फळ ही दिर्घायू आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहे.
- त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो. धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे.
- देवापुढे दिवा लावला जातो. जो ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल आहे.
- पुराणानुसार देवापुढे विड्याची पाने ठेवली जातात. संसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचे ते प्रतीक आहे
असा करा महाशिवरात्रीचा उपवास
महाशिवरात्रीचा उपावास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. म्हणजे तुम्ही फळं, वरीचा भात- शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खिचडी असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. असे म्हणतात की, कुमारीकांनी चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा. तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा.
मग यंदा महाशिवरात्रीचा उपवा नक्की करा.
हेही वाचा –
Shayari on Mahashivratri in Hindi
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.