काहीजण जात्याच खोडकर असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जरी तस दिसून आलं नाही तरी काहीतरी काड्या करायची त्यांना सवयच असते. तुमच्या घरात किंवा ग्रुपमध्ये एकतरी असं असतंच जे पटकन काही करत नाही. पण गप्प बसून त्यांना खोड्या काढायची सवय असते. अशा लोकांमागे त्यांच्या राशी कारणीभूत असतात. हा राशीचा स्वभावदोष असतो. या राशीच्या लोकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार असाल तर जाणून घेऊया अशा राशी ज्या असतात फारच खोडकर…
कुंभ राशीच्या व्यक्तींची वैशिट्ये, काय आहेत यांचे गुण आणि दोष
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्ती या फारच खोडकर स्वभावाच्या असतात. वृश्चिक राशीचे लोक हे इतरवेळी गप्प असतील पण खोड्या काढण्यामध्ये ही लोकं नंबर एक असतात. मुद्दाम एखाद्याला चिडवून किंवा एखाद्याला राग आणेपर्यंत डिवचायला या लोकांना खूप जास्त आवडते. वृश्चिक राशीचे लोक उगाचच खोड्या काढण्यात पटाईत असतात. सगळ्या राशींमध्ये खोडकर अशी ही रास आहे. जिचा खोडकरपणा वय वाढले तरी देखील कमी होत नाही. उलट मोठे झाल्यानंतर यांच्या खोड्यांमध्ये जास्त वाढच होऊ लागते. तुमच्या आजुबाजूला कोणी वृश्चिक राशीचे लोकं असतील तर तुम्हाला त्यांच्या स्वभावतील ही गोष्ट नक्की जाणवेल.
मेष
मेष राशीच्या व्यक्ती या फारच सरळ स्वभावाच्या आणि कधीकधी तर कोणाच्याही मध्ये पाय न घालणाऱ्या असतात. पण यांच्यामध्येही खोडकर स्वभाव असतो. या खोडकर स्वभावाची जाणीव कदाचित पटकन होत नाही. यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्यानंतर त्यांचा खोडकर स्वभाव जाणवू लागतो. त्यांना उगाचच खोड्या काढायला आवडत नाही. पण एखादी व्यक्ती यांच्या टार्गेटवर असेल तर त्यांच्याशी भांडण्याव्यतिरिक्त त्यांना उत्तर देण्यासाठी खोड्या काढण्याचे काम या राशी करतात. त्यामुळे या राशींच्या मागे लागू नका. कारण या व्यक्ती खोड्या करण्यावर आल्या तर तुम्हाला पळता भुई करुन सोडतात.
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
सिंह
सिंह राशीच्या या व्यक्ती देखील खूप खोडकर असतात. सिंह राशीच्या व्यक्तींना राग खूप येतो. पण तितक्याच त्या संयमी देखील असतात. पण त्यांना खोड्या काढायच्या असतील तर त्या खोड्या काढताना ती समोरची व्यक्ती कशी आहे त्याच्यावर या खोड्या अवलंबून असतात. पण या राशीच्या लोकांना खोडी काढायला नाहक आवडते. तुमच्या आजुबाजूला या व्यक्ती असतील तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल.
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
तूळ
तूळ राशीच्या व्यक्ती या फारच बॅलन्स असतात. या व्यक्तिंना सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स करायला आवडते. या व्यक्ती आकर्षक असतात त्यामुळे त्यांच्याकडे अनेक जण आकर्षित होतात. एखादे झालेले प्रकरण उकरुन काढणे या लोकांना फार आवडते. उगाचच सगळे शांत झाल्यावर सारखे त्या विषयी विचारत राहणे या लोकांना इतके आवडते की, कधी कधी त्यामुळे पुन्हा नाहक भांडण होऊ लागतात. पण या लोकांचा स्वभाव हा काहीच केल्या बदलत नाही. त्यामुळे या राशीच्या लोकांसोबत वाद न केलेलाच बरा!
आता तुमची रास या खोडकर राशींपैकीतर एक नाही ना हे बघून घ्या.