ADVERTISEMENT
home / सौंदर्य
फक्त केसांसाठीच नाही तर असाही करा हेअर कंडिशनरचा वापर

फक्त केसांसाठीच नाही तर असाही करा हेअर कंडिशनरचा वापर

केसांना शॅम्पू केल्यावर केस मऊ आणि चमकदार दिसावे यासाठी आपण केसांना कंडिशनर लावतो. मात्र शॅम्पूच्या तुलनेत हेअर कंडिनशर फार कमी लावायचं असतं. शिवाय ते फक्त केसांच्या टोकाकडील भागावर लावायचं असतं. त्यामुळे शॅम्पूपेक्षा कंडिशनर खूपच कमी लागतं. एकाच ब्रॅंडचं शॅम्पू आणि कंडिशनल विकत घेतलं तर त्यामध्ये शॅम्पूपेक्षा कंडिशनर बरंच उरतं. कधी कधी मग कंडिशनर फेकून द्यावं लागतं. मात्र असं उरलेलं हेअर कंडिशनर फेकण्यापेक्षा त्याचा असा वापर करा. यासाठी जाणून घ्या हेअर कंडिशनरचा पर्यायी वापर कसा करा. यासाठी जाणून घ्या केसां व्यतिरिक्त हेअर कंडिशनर आपण आणखी कशा कशासाठी वापरू शकतो.  

हेअर कंडिशनरचा पर्यायी वापर

केस मऊ आणि चमकदार करण्यासोबतच तुम्ही हेअर कंडिशनरचा असाही वापर करू शकता.

हात मऊ करण्यासाठी

हात मऊ करण्यासाठी आपण हॅंड क्रिमचा वापर करतो. मात्र असं करूनही बऱ्याचदा नखांचे क्युटिकल्स कठीण आणि कोरडे होतात ज्यामुळे तुमच्या हाताचे सौंदर्य कमी करतात. क्युटिकल्स कोरडे झाले तर त्यामुळे इतर त्वचेवर त्याचे ओरखडे येतात. यासाठीच क्युटिकल्सवर थोडं हेअर कंडिशनर लावा आणि हाताला मसाज करा. ज्यामुळे तुमचे हात आणि नखं मऊ होतील. जर तुमचे हात सतत कोरडे  पडत असतील तर तुम्ही तुमच्या हात आणि नखांसाठी हेअर कंडिशनर वापरू शकता.

कपडे धुतल्यानंतर

कपडे धुताना हार्श डिटर्जंट वापरण्यामुळे कपड्यामधील दोरे तुटतात आणि अर्धवट अवस्थेत बाहेर पडतात. ज्यामुळे कापडावर गोळे निर्माण होतात. असं झाल्यास कापडाचा मऊपणा कमी होतो. यासाठी आजकाल बाजारात फॅब्रिक कंडिशनर विकत मिळतात. मात्र जर तुम्हाला यावर पैसे खर्च करायचे नसतील अथवा घरातील फॅब्रिक सॉफ्टनर संपलं असेल तर तुम्ही त्याऐवजी हेअर कंडिशनर वापरू शकता. 

ADVERTISEMENT

मेकअप टूल्ससाठी

मेकअपसाठी लागणारं सर्वात महत्ताचं टूल म्हणजे  हेअर ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर. हेअर ब्रशने तुमचा मेकअप व्यवस्थित ब्लेंड होतो.  मात्र बऱ्याचदा धुतल्यावर हे ब्रशमधील केस कोरडे आणि कडक होतात. धुतल्यावर या प्रॉडक्टचा आकारही बदलतो. सहाजिकच याचा वापर त्वचेवर करताना तुमच्या त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. यासाठी धुतल्यानंतर या टूल्ससाठी हेअर कंडिशनर वापरा. ज्यामुळे हेअर ब्रशचे केस मऊ आणि मुलायम होतील आणि त्यांचा मूळ आकार तसाच राहिल.

मेकअप रिमूव्हर

मेकअप केल्यानंतर तुम्ही जितक्या  सुंदर दिसता तितकंच मेकअप काढल्यावरही सुंदर दिसायचं असेल तर वेळेवर आणि योग्य पद्धतीने मेकअप काढायला हवा. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर आपण करतो. मात्र जर तुमच्याकडचं मेकअप रिमूव्हर संपलं असेल तर तुम्ही हेअर कंडिशनरने मेकअप काढू शकता. यासाठी मेकअप रिमूव्हर प्रमाणेच हेअर कंडिशनर वापरा.

रेझर वापरण्याआधी

अंगावरील अनावश्यक केस ही एक खूप मोठी समस्या आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्लर बंद असल्यामुळे आपण रेझरचा वापर सर्रास केला असेल. पण रेझरने केस काढल्यानंतर केस खूपच कडक आणि जाड येतात. यासाठीच रेझर वापरण्यापूर्वी तुमचे केस हेअर कंडिशनरने मऊ करा. ज्यामुळे रेझर अतिशय हळूवार त्वचेवरून फिरेल आणि केसांची ग्रोथ चुकीच्या पद्धतीने होणार नाही.

फोटोसौजन्य – Pixels

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनमध्ये असं वापरा ग्लिसरीन

या सोप्या स्टेप्स वापरत तुम्हीदेखील करू शकता नाकावर ब्लश

13 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT