ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
दूध आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांपासून मिळवा शरीरासाठी पुरेसं कॅल्शिअम

दूध आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांपासून मिळवा शरीरासाठी पुरेसं कॅल्शिअम

दूधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराला पुरेसं कॅल्शिअम मिळावं यासाठी नेहमीच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जर तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तर दूध प्यायल्यावर मळमळतं अथवा उलटी येते. दूध न पिल्यास अशा लोकांच्या शरीराला पुरेसं कॅल्शिअम कसं  मिळेल ही चिंता नक्कीच सतावत असते. जर शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळालं नाही तर त्याचा परिणाम शरीर, हाडे, केस, दात अशा अनेक अवयवांवर दिसू लागतो. शिवाय वयोमानानुसार तुमच्या शरीराला लागणारी कॅल्शिअमची गरज पूर्ण झाली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. यासाठीच वेळीच शरीराची कॅल्शिअमची गरज पूर्ण करायला हवी. पण मग यासाठी दुधाला काही पर्याय आहे का ? तर नक्कीच आहे. असे अनेक पदार्थ आहेत ज्यामधून तुमच्या शरीराला पुरेसं कॅल्शिअम नक्कीच मिळू शकतं.

केळं –

pexels

जर तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तर तुम्ही दररोज एक केळं खाऊ शकता. कारण केळ्यामध्येही तुमच्या शरीराला पुरतील इतके कॅल्शिअम असतात. एका केळ्यामधून तुमच्या शरीलाला जवळजवळ सहा ते सात ग्रॅम कॅल्शिअम मिळू  शकतं. त्यामुळे जर तुम्हाला दुधाचा वास सहन होत नसेल तर नियमित एक केळं खाण्याची सवय स्वतःला लावा. 

ADVERTISEMENT

बदामाचे दूध –

जर तुम्हाला गाईचे अथवा म्हशीचे दूध आणि त्याचा वास, चव आवडत नसेल तर तुम्ही बदामाचे दूध दररोज पिऊ शकता. यासाठी तुम्हाला बदाम रात्रभर भिजवत ठेवून सकाळी ते बदाम पाण्यासोबत वाटून त्याचे  दूध काढावे लागेल. बदामाच्या दूधातून तुमच्या शरीराला कॅल्शिअम तर मिळेलच शिवाय तुमच्या शरीराला प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सही मिळतील. 

सफेद तीळ –

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये तीळाचा वापर केला जातो. मकर संक्रातीच्या सणाला तीळगूळाचे लाडू वाटण्यामागेही आरोग्यदायी हेतू असतो. मकर संक्रात हिवाळ्यात येते अशा थंड वातावरणात शरीराला उष्णतेची आणि कॅल्शिअमची गरज असते. कारण थंडीचा परिणाम तुमच्या हाडांवर होत असतो. यासाठीच शरीराला पुरेसे कॅल्शिअम मिळावे यासाठी तीळाचे लाडू अवश्य खा. 

हिरव्या पालेभाज्या –

pexels

ADVERTISEMENT

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि दररोजच्या जेवणात एकतरी पालेभाजी असावी असं आपलं आहार शास्त्र सांगतं. याचं कारण पालेभाज्यांमध्ये इतर पोषक घटकांसोबत भरपूर कॅल्शिअम असतं. जर तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तर कमीत कमी आहारात भरपूर पालेभाज्यांचा समावेश करा. 

पनीर –

जरी तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तरी तुम्हाला दुधापासून बनवलेलं पनीर नक्कीच आवडत असेल. तेव्हा आहारात पनीरचा वापर करूनही तुम्ही तुमच्या शरीराची कॅल्शिअमची गरज भागवू शकता.  एक वाटी पनीरमधून तुम्हाला जवळजवळ 120 ग्रॅम कॅल्शिअम मिळू शकतं. दूधाला पनीर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. शिवाय पनीरपासून बनवलेले चमचमीत पदार्थ तुमच्या  जीभेची चवही वाढवतील. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे दुधाला पर्याय तुम्हाला आवडले का आणि या पदार्थांचा तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – pexels

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

जाणून घ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश

शरीराला पुरेसं झिंक मिळण्यासाठी आहारात वाढवा हे पदार्थ

गाईचं दूध आवडत नसेल तर नियमित घ्या ‘बदामाचं दूध’

ADVERTISEMENT
21 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT