ADVERTISEMENT
home / Styling
Ambada Hairstyles In Marathi

खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल (Ambada Hairstyles In Marathi)

काही खास समारंभासाठी ज्यावेळी जायचं असतं त्यावेळी इतर दिवसांपेक्षा थोडी हेअर स्टाईल करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. अंबाडा हेयर स्टाइल ही सध्या जास्तच ट्रेंडमध्ये आहे. अप डू प्रकारातील ही हेअरस्टाईल तुम्ही विचार करत असलेल्या टीपिकल पद्धतीने केली जात नाही तर आता यामध्ये इतके वेगळे प्रकार आहेत की, तुम्हाला या अंबाडा हेयर स्टाइल नक्की आवडतील आणि एकदा तरी करायव्याशा वाटतील. आज आपण साधा अंबाडा, लहान केसांचा अंबाडा अशा काही हेअरस्टाईल पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अंबाडा हेयर स्टाइल.

अंबाडा हेअरस्टाईलचे वेगवेगळे प्रकार (Types Of Ambada Hairstyles In Marathi)

जसं आम्ही म्हटलं की, अंबाडा हेयर स्टाइलचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातीलच काही आंबाड्याचे प्रकार आपण आज पाहणार आहोत. अगदी पारंपरिक खोप्यापासून ते आताच्या स्टायलिश हेअरस्टाईलपर्यंत वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. यातील काही हेअरस्टाईल तुम्ही अगदी घरीसुद्धा ट्राय करु शकता. यासाठी तुम्हाला  थोड्या प्रॅक्टीसची गरज लागेल. अजून काही नाही. मग पाहुया या काही हेअरस्टाईल.

खोपा (Khopa)

Types Of Ambada Hairstyles In Marathi

ADVERTISEMENT

instagram

महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये अगदी हमखास केली जाणारी हेअरस्टाईल म्हणजे ‘खोपा’ पारंपरिक नऊवारी साडीवर अगदी हमखास ही हेअरस्टाईल केली जाते. केसांचा खोपा बांधणे फारच सोपे असते. हा खोपा कसा बांधला जातो ते पाहुया.

अंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीन, केसांच काटा, रेडिमेड अंबाडा वेणी, रबर बँड, गुलाबाची फुलं

असा बांधा आंबाडा: 

ADVERTISEMENT
  • केस व्यवस्थित विंचरुन घ्या. केसांचा मधून भांग पाडून घ्या. 
  • खोप्यामध्ये केस चापून चोपून बसवलेले असतात. पण तुम्हाला थोडासा फुगीरपणा केसाला हवा असेल तर तुम्ही मधून भांग पाडल्यानंतर दोन्ही बाजून केस पिळून मागच्या बाजूला पीन लावून घ्या. 
  • हेअर रबरच्या साहाय्याने केसांचा बो बांधून घ्या. आता जर तुमचे केस लहान असतील तर या ठिकाणी तुम्हाला गंगावन लागेल कारण आता आपण केसांची वेणी घालणार आहोत. 
  • केसांच्या तीन पेढ्या करुन अगदी शेवटच्या टोकापर्यंत वेणी बांधून घ्या.
  • वेणीचे शेवटचे टोक घेऊन आता ती वर गोलाकार वर फोल्ड करायला घ्या. वेणी सुरु केली  तिथे आल्यानंतर वेणीची ही भेंडोळी तुम्हाला समोरुन दिसेल इतकी वर घ्या. व्यव्स्थित काटे आणि पीन लावून ती वेणी चापूनचोपून बसवून घ्या. 
  • त्यावर छान रेडिमेड वेणी खोचा. फ्रेंच रोलप्रमाणे तुम्ही एका बाजूला गुलाबाची फुलं देखील खोचू शकता. खोट्या किंवा खऱ्या फुलांचा वापर यासाठी चालू शकेल. 

कधी करता येईल  हेअरस्टाईल: खोपा हेअर स्टाईल ही अगदी पारंपरिक अशी हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला नऊवारी साडीवर छानच खुलून दिसेल. तुम्हाला सहावारी पण काठापदराच्या साडीवरही ही अशाप्रकारची हेअरस्टाईल करता येईल.

फ्रेंच रोल (French Roll)

French Roll

Instagram

मॉर्डन आंबाड्यामध्ये जाणारा हा प्रकारही आता आपल्याला नवीन राहिला नाही. तुमचे केस लहान असो किंवा मोठे अगदी कोणालाही ही हेअरस्टाईल करता येते विशेष म्हणजे ही हेअरस्टाईल कोणतीही मेहनत न घेता घरच्या घरी करता येते. 

ADVERTISEMENT

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीना,हेअर बड्स, वेणी, गजरा (आवश्यकतेनुसार)

असा बांधा आंबाडा:

  • सगळ्यात आधी केस छान मोकळे करुन घ्या.
  • पुढच्या केसांचा तुम्ही केसांचा पफ काढून घ्या. त्यामुळे तुमच्या केसांना थोडा उठाव मिळेल. 
  • फ्रेंच रोल हा जास्त करुन पदराच्या बाजूला असतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेणी घालता येते आणि फोटो काढता येतात.
  • आता तुम्हाला केस उजव्या बाजूला घेऊन डाव्या बाजूला उभ्या रेषेत पीना लावून घ्यायच्या आहेत. 
  • पीना लावून झाल्यानंतर केस डाव्या बाजूला घेऊन एकत्र करुन तुम्हाला हळू हळू ट्विस्ट करायला घ्यायचे आहे. आणि केस वर घ्यायचे आहेत. केस वर घेताना केस सरळ वर येत आहेत का सारखे बघायचे आहे. केसांचा साधारण एक बोटभर भाग राहिल्यानंतर तुम्ही केसांना पीन लावून आबांडा करायचा आहे. 
  • आता वर उरलेल्या केसांनी तुम्हाला पीना असलेल्या ठिकाणी केस टक करायला घ्या. केस टक करण्यासाठी काटा पीन किंवा यु पीनचा वापर करा. 
  • आता तुमच्या समारंभानुसार त्यामध्ये डकोरेटीव्ह पीन्स किंवा फुलं माळा.

कधी करता येईल हेअरस्टाईल: फ्रेंच रोल तुम्हाला अगदी ऑफिसलाही करता येतो. पण लग्नसमारंभात तो अधिक खुलून दिसतो. एखाद्या पार्टीला तुम्ही छान वेस्टर्न साडी नेसली असेल तरी ही हेअरस्टाईल तुम्हाला चांगली दिसते.

डोनट अंबाडा (Donut Ambada)

Donut Ambada

ADVERTISEMENT

Instagram

तुमचे काम वाचवणारी अशी ही सिंपल अंबाडा हेयर स्टाइल आहे. यामध्ये एका विशिष्ट डोनटचा वापर केला जातो . त्यामुळे तुमचे केस लहान किंवा विरळ असले तरी ते छान भरगच्च दिसतात.

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांटा डोनट (काळ्या रंगाचा बन), केसांची जाळी, पीना, यु पीन, गजरा किंवा तत्सम डेकोरेशनचे साहित्य 

असा बांधा आंबाडा:

ADVERTISEMENT
  • केस व्यवस्थित विंचरुन घ्या. पुढच्या केसांचा क्रिएटीव्ह पफ करुन घ्या.
  •  उरलेल्या केसांचा बो बांधून घ्या. आंबाडा किती वर हवा आहे त्यानुसार केसं वर बांधून घ्या. 
  • तुमच्या चेहऱ्याला शोभेल इतका डोनट निवडा. केसांमध्ये डोनट घालून हा डोनट एका जागी नीट राहावा म्हणून केस आणि डोनटला पीन लावून घ्या. 
  • बनच्या चारही बाजूंनी केस फिरवून केस होल्ड करण्यासाठी रबर लावा आता तुमचे केस सूर्यासारखे दिसत असतील.
  • आता तुम्ही तुमच्या केसांच्या छोट्या छोट्या बटा करुन ते गोलाकार बनभोवती फिरवा. 
  • आता हे करण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल.डोनट बनमध्ये तुम्हाला वेगवेगळया डिझाइनही करता येईल.

कधी करता येईल हेअरस्टाईल: डोनट हेअरस्टाईल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. तुम्ही लग्नासाठी एखाद्या छोट्या पार्टीसाठी ही हेअरस्टाईल करु शकता. 

हेअर ट्विस्ट अंबाडा (Hair Twist Ambada)

Hair Twist Ambada

Youtube

आता तुम्हाला थोडा ट्विस्ट देऊन हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही हेअर ट्विस्ट आंबांडा ही हेअरस्टाईल करु शकता. हा आंबाडा तुम्हाला लहान केसांना करता येणार नाही. या साठी तुमचे केस थोडे मोठे लागतील.

ADVERTISEMENT

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य:  केसांच्या हेअर पीन्स, रबर बँड, हेअर डेकोरेशन पीन्स 

असा बांधा आंबाडा:

  • केस विंचरुन घ्या. केसांचा पोनी बांधून घ्या. 
  • तुम्हाला आंबाडा किती वर हवा त्या हिशोबाने तुम्ही केसांचा पोनी बांधा.
  • केसांची एक बट घेऊन केस ट्विट्स करा. केस ट्विस्ट केल्यानंतर केसांचा काही भाग बाहेर काढून फुलवून घ्या. 
    पहिली बट त्याच ठिकाणी उलट्या  U आकारात फिरवून पीन अप करुन घ्या. 
  • आता दुसरी बट घेऊन तशाच पद्धतीने केस बाहेर काढून तीन बट पोनी टेल खालून दुसऱ्या बाजूला आणून पीन अप करा.
  • असे करत करत एक एक बट पिळून तशाच पद्धतीने पीन अप करुन घ्या. 
  • सगळ्यात शेवटची बट नीट पीन अप करुन झाल्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार डेकोरेट करा. 

कधी करता येईल ही हेअरस्टाल: आता ही आंबाडा हेअरस्टाईल थोडी फॅन्सी वाटत असली तरी लग्न समारंभासाठी ही हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे.

बॉटम फ्रेंच बन ट्विस्ट (Bottom French Bun Twist)

Bottom french bun twist

ADVERTISEMENT

Instagram

आता आपण फ्रेंट ट्विस्ट किंवा फ्रेंच रोल ही हेअरस्टाईल पाहिली आहे. आता जर तुम्हाला यामध्ये थोडासा ट्विस्ट हवा असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करुन पाहा. ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच आवडेल. ही हेअरस्टाईल तुम्हाला लहान केसांवरही करता येईल. आता ही हेअरस्टाईल कशी करायची ते पाहुया.

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीना, हेअर अॅसेसरीज आवडीनुसार 

असा बांधा आंबाडा:

ADVERTISEMENT
  • केस विंचरुन घ्या. केसांच्या पुढील काही बटा सोडून क्राऊन भागाकडील केस विंचरुन त्याचा पफ काढून घ्या. 
    तो पफ पीनने व्यवस्थित सेट करा. 
  • सगळे केस उजव्या बाजूला नेत क्रॉस पीना लावून सेट करुन घ्या. 
  • आता सगळे केस डाव्या बाजूला आणत हातावरच ते ट्विस्ट करा आणि पीन लावून तुमचा फ्रेंच रोल सेट करुन घ्या.
  • पुढे केसांची बट काढली असेल तर ती आता आपल्याला सेट करायची आहे त्यासाठी तुम्ही ती सगळी विंचरुन उजव्या बाजूला बनकडे आणा थोडे सैल करुन बनवर हे केस आणत बनच्या खोलगट भागात टक करुन पीनअप करा. 

 कधी करता येईल ही हेअरस्टाईल: ही हेअरस्टाईल पार्टीसाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही मस्त ही हेअरस्टाईल करा. तुमच्या गाऊनवर हा फ्रेंच रोल अगदी छान शोभून दिसेल.

फ्रंट पफ विथ फॅन्सी बन (Front Puff With Fancy Bun)

Front Puff With Fancy Bun

youtube

जर तुम्हाला समोर केस चपटे आवडत नसतील तर तुम्हाला हा फॅन्सी बन आंबाडा हेअरस्टाईल करता येईल. आता हा फॅन्सी बन कसा बांधायचा ते आता पाहुया. 

ADVERTISEMENT

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीना, रबर, यु पीन, हेअर पफसाठी रेडिमेड मिळणारे साहित्य

असा बांधा आंबाडा:

  •  केस विंचरुन घ्या. केसांचा मधून भांग पाडा. 
  • दोन्ही बाजूने पुढच्या काही बटा वेगळ्या काढा. आता मागील क्राऊन भागातील केसांचा पफ काढायचा आहे. आता हा पफ थोडा मोठा दिसायला हवा. म्हणून रेडिमेड पफ कुशन मिळतात त्यांचा आपण वापर करणार आहोत. 
  • केसांच्या खाली या पफ कुशन ठेवून तुम्ही पफ पीन अप करुन घ्या. आता पुढे काढलेल्या बटा एक एक करुन पफच्या पीनांच्या इथे पीन अप करा. म्हणजे आता तुमच्या पफच्या पीना झाकून राहतील. 
  • आता उरलेल्या केसांचे दोन भाग करुन तुम्ही दोन बो बांधून घ्या. 
  • डाव्या बाजूच्या केसांची सैलसर वेणी घाला. वेणी फॅन्सी दिसण्यासाठी त्याचे केस हळूहळू पाकळी प्रमाणे बाहेर काढा. केस पूर्ण बाहेर काढू नका. 
  • अशा दोन्ही पोनीटेलच्या वेणी घाला. डाव्या केसांची वेणी उजव्या वेणी खालून काढा आणि पुन्हा जिथे डाव्या बाजूची पोनी बांधली आहे तिथे पीन अप करा. उजव्या बाजूची वेणी डाव्या बाजूने खालून परत उजव्या बाजूला फिरवून केस पीन अप करा.
  • आता तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे केस डेकोर करा.

कधी करता येईल ती हेअरस्टाईल: ही हेअरस्टाईल करायला फारच सोपी आहे. तुम्ही  लग्न समारंभासाठी अशी हेअरस्टाईल करु शकता.

डोनट झिग झॅक आंबाडा (Donut Zigzag Ambada)

Donut Zigzag Ambada

ADVERTISEMENT

youtube

डोनटचा वापर कसा करायचा हे तुम्हाला आता पर्यंत कळालेच असेल. आता याचाच थोडासा वेगळा आणि अॅडव्हान्स प्रकार म्हणजे ही डोनट झिग झॅक आंबाडा आता हा आंबाडा कसा बांधायचा ते बघूया.

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीन, यु पीन, हेअर रबर 

असा बांधा आंबाडा:

ADVERTISEMENT
  • केस विंचरुन घ्या. आता जर तुम्हाला केसांचा पफ काढायचा असेल तर तो काढून घ्या.
  • उरलेल्या केसांना बांधून त्यात डोनट बन घाला. खाली वाकून सगळे केस पसरवून तुम्ही केसांना रबर लावा. आता तुमच्या केसांचा अर्धा अंबाडा तयार झालेला दिसेल. 
  • आता जे एक्सट्रा राहिलेले केस  तुम्हाला झिग झॅग पद्धतीने बांधायचे आहेत. म्हणजे तुम्हाला केसांचे छोटे छोटे सेक्शन करुन त्याला पिळ देऊन तुम्हाला हे केस झिग झॅग पीनअप करायचे आहेत. 
  • तुमचा झिग झॅग अंबाडा तयार आता या हेअरस्टाईलला तुम्हाला काहीच डेकोरेट करायची गरज नाही.

कधी करता येईल हेअरस्टाईल: तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमासाठी ही हेअरस्टाईल नक्की करा खूप छान आणि उठून दिसेल. 

रोझ अंबाडा (Rose Ambada)

Rose Ambada

Instagram

हा अंबाडा थोडा फॅन्सी आहे बरं. तुम्हाला ही हेअरस्टाईल अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने करता येईल. या आंबाड्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेट करु शकता. आता हा रोज अंबाडा कसा बांधायचा ते बघूया.

ADVERTISEMENT

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: यु पीन, पीन आवश्यक असल्यास हेअर स्प्रे

असा बांधा आंबाडा:

  • केस विंचरुन घ्या.
  • केसांचे तीन भाग करुन घ्या.क्राऊन, मिडल आणि एकदम मानेकडील भाग असे तीन पोर्शन करुन घ्या. 
  • आता सगळ्यात वरच्या भागाच्या केसांची वेणी घाला. ती थोडी सैलच असू द्या. ही वेणी आहे त्या जागी गोलाकार फिरवा. तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या तयार झालेल्या दिसतील. 
  • आता मधल्या बटीला पिळून घ्या आणि ती वेणीच्या गोलाकार भागाभोवती फिरवा. 
  • असे करताना तुम्ही ज्या प्रमाणे वेणीचा काही भाग सैल केला अगदी तसाच तुम्हाला या केसांचे करायचे आहे. 
  • सगळ्यात शेवटची बटही अशीच ट्विस्ट करुन फिरवा. पण असे करताना तुम्ही यु पीन लावायला विसरु नका. 
  • आता तुम्ही तुम्हाला हवं तर आंबाडा डेकोर करु शकता.

कधी करता येईल हेअरस्टाईल: हा थोडा फॅन्सी बन आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात करु शकता. तुम्हाला तुमच्या वेस्टर्न वेअर गाऊनवरही ही हेअरस्टाईल करता येईल.

मेसी बन आंबाडा (Messy Bun Ambada)

Messy Bun Ambada

ADVERTISEMENT

Instagram

मेसी बन आंबाडाची सध्या फॅशन आहे. हा मेसी बन बांधणे खूपच कठीण असते. पण थोड्या प्रयत्नांनी तुम्हाला हा बन बांधता येईल. कुरळ्या केसांवर ही हेअरस्टाईल अगदी सहज करता येते. पण सरळ केस असलेल्यांना थोडी मेहनत घ्यावी लागते. आता सोप्या पद्धतीने हा बन कसा बांधायचा ते जाणून घेऊया.

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: यु पीन, पीन, टेल कोंब, हेअर स्प्रे, केसांचा टाँग

असा बांधा आंबाडा:

ADVERTISEMENT
  • केस विंचरुन केसांचे लाँग कर्ल करुन घ्या.
  • आता पुढचे केस सोडून केसांचा हाय पोनी टेल बांधत आंबाडा बांधून घ्या. 
  • हा आंबाडा अगदी व्यवस्थित पीन अप करुन घ्या. 
  • पुढच्या कुरळ्या केसांची एक एक बट मागे घेऊन ती आंबाड्यावर सोडा. वरच्या बाजूने पीन अप करा असे करताना तुमच्या केसांची कर्ल केलेली टोकं अगदी खाली वर दिसायला हवी.
  • हा बन बांधताना परफेक्शन महत्वाचे नसते. 

कधी करता येईल हेअरस्टाईल: तुम्हाला साडीपासून पार्टीवेअर पर्यंत अशाप्रकारचा अंबाडा बांधता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी कधीही ही हेअरस्टाईल करु शकता. 

लो नेक आंबाडा (Low Neck Ambada)

Low Neck Ambada

Instagram

हल्ली तुम्ही अनेक सेलिब्रिटींना असा लो नेक अंबाडा हेअरस्टाईल करताना पाहिले असेल. अगदी मानेकडे हा अंबाडा येतो. पण याला ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही थोडी व्हरायटी आणू शकता. कसा बांधायचा हा लो नेक आंबाडा ते पाहुया. 

ADVERTISEMENT

आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीना, रबर, फॅन्सी पीन्स 

असा बांधा आंबाडा:

  • केसांचा मधून भांग पाडा. केसांचे एका बोटापर्यंत म्हणजेच फ्रंट सेक्शनचे केस वेगळे करा. 
  • मागच्या केसांना थोडेसे बॅककोंबिंग करुन घ्या त्यामुळे मागचे केस थोडे फुगीर दिसतील अगदीच चपटे दिसणार नाही. 
  • आता पुढे वेगळ्या केलेल्या केसांपैकी डावीकडील बाजू विंचरुन त्याला बॅककोंबिंग करुन घ्या. असे दोन्ही बाजूला करा.
  • डाव्या बाजूचे केस पोनी टेलच्या उजव्या बाजूच्या खालच्या बाजूला नेऊन पीन लावा. 
  • तसेच दुसऱ्या बाजूलाही करा. आता तुम्ही सगळे केस एकत्र करुन साधारण एक वीत सोडून केसांचा पोनी बांधा आता ज्या ठिकाणी तुम्ही रबर बांधला आहे. तिथून केस उलट फिरवा. आता तुम्हाला बोटीच्या आकाराप्रमाणे बन तयार झालेला दिसेल. 
  • आता उरलेले केस बनमध्ये फोल्ड करुन टाका. जर जास्तीचे केस बाहेर आले असतील तर तुम्ही यु पीन लावा. 
  • जर तुमचे केस थोडे फ्लॅट वाटत असतील तर तुम्ही केस थोडे फुलवून यु पीन लावा.
  • आता या बनला थोडे आणखी छान करण्यासाठी एक छान पीन लावा.

कधी कराल ही हेअरस्टाईल: तुम्हाला कोणत्याही  प्रसंगी असा बन करता येईल. पण एखाद्या लाँग गाऊनवर ही हेअरस्टाईल छान उठून दिसेल.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

ambada hairstyle

Instagram

1. छोट्या केसांसाठी आंबाड्याची बेस्ट डिझाईन कोणती?
छोट्या केसांचा बन किंवा लहान केसांचा आंबाडा बांधणे थोडे कठीणच असते. जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही गंगावनचा उपयोग करुन कोणताही आंबाडा बांधू शकता. पण तुमच्यासाठी बांधायला आणि डिझाईन टिकवून ठेवायला आंबाडा हेअरस्टाईलचा बेस्ट प्रकार म्हणजे फ्रेंच रोल. कारण लहान केसांचा फ्रेंच रोल चांगला बांधला जातो. तो फार जडही होत नाही आणि दिसायला एकदम छान दिसतो.

2. आंबाडा टिकून राहण्यासाठी हेअर स्प्रे वापरण्याची गरज असते का? 
हल्ली कोणतीही हेअरस्टाईल करायची असेल आणि ती टिकवायची असेल तर हमखास हेअर स्प्रे वापरला जातो. जर तुम्हाला काही खास समारंभासाठी ही हेअरस्टाईल करायची असेल तुमचा खूप वेळ त्या कामामध्ये जाणार असेल तर तुम्ही हेअर स्प्रे वापरायला हवा. पण हा हेअर स्प्रे वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. 

ADVERTISEMENT

3. आंबाडा हेअरस्टाईल करण्याआधी केसांना क्रिम्मिंग करण्याची गरज असते क?
ज्यावेळी लग्नासाठी किंवा काही खास समारंभासाठी अंबाडा हेअरस्टाईल केली जाते. त्यावेळी तुमचे केस क्रिम्प केले जातात. तुम्हाला केसांना पर्म केल्यावर केस कसे दिसतील हे जर माहीत असेल तर अगदी तसेच तुमचे केस क्रिम्पिंग केल्यावर दिसतात. जर तुमचे केस सिल्की असतील तर अशा केसांवर आंबाडा पीन, आंबाडा बन राहात नाही. अशावेळी तुमच्या केसांना ड्राय करण्यासाठी क्रिम्पिंग केले जाते. आता तुम्ही कोणती हेअरस्टाईल निवडली त्यानुसार हे क्रिम्पिंग केले जाते. म्हणजे काहींना फक्त पुढच्या भागात तर काहींच्या सबंध केसांना क्रिम्पिंग केले जाते. 

आता तुम्ही ही लग्नाला किंवा खास समारंभाला जाणार असाल तर नक्की ट्राय करा या आंबाडा हेअर स्टाईल.

30 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT