ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आवळ्याचा त्वचेसाठी करा असा वापर आणि दिसा अधिक तरूण

आवळ्याचा त्वचेसाठी करा असा वापर आणि दिसा अधिक तरूण

आवळा (Benefits of Amla) त्वचेसाठी आणि केसांसाठी (Amla benefits for skin and hair) नेहमी उत्तम मानला जातो. आवळ्याच्या पावडरचा उपयोग हा केसांसाठी वरदान ठरतो. त्वचेवर आलेला कोणताही डाग हटविण्यासाठी अथवा चेहऱ्याचा रंग अधिक उजळविण्यासाठी आवळ्याचा वापर करता येतो. घरच्या घरी तुम्ही देशी पद्धतीने आपल्या सौंदर्यात भर घालू शकता. विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असल्यामुळे आवळा आपल्या नेहमीच्या वापरात समाविष्ट करून घ्यायला हवा. याचे प्रभावी गुण तुम्हाला अधिक तरूण दिसण्यासाठी उपयोगी ठरतात. साधारण 30 वर्षानंतर एजिंग समस्या सुरू होतात. यातून सुटका मिळण्यासाठी आवळ्याचा उपयोग करता येतो. आवळा त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय तुमची सैलसर त्वचा अधिक कसदार करण्यासाठी तुम्हाला आवळ्याचा उपयोग करून घेता येतो. नक्की कसा उपयोग करायचा ते घ्या जाणून. 

आवळा आणि शीट मास्कचा वापर 

benefits of sheet mask

नितळ त्वचा आणि डागविरहीत त्वचा हवी असेल तर आजकाल सीरमचा अधिक वापर करण्यात येतो. पण याचा मुख्य स्रोत आहे तो म्हणजे आवळा. आवळ्यामधील असणारे विटामिन सी रोज त्वचा अधिक चांगली दिसून येते. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. तुम्हाला आवळ्याचा वापर करून तुमची त्वचा अधिक तरूण आणि सुंदर ठेवता येईल. शीटमास्कचा महत्त्वाचा फायदा आहे.  

  • सर्वात पहिल्यांदा आवळ्याचा रस घ्या आणि त्यामध्ये कोरफड जेल मिक्स करा 
  • याची एक जाडसर पेस्ट तयार करा आणि त्यात शीटमास्क बुडवा 
  • त्यानंतर हा शीट मास्क (Sheet Mask) तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स चेहऱ्यावर तसाच राहू द्या
  • त्यानंतर काही वेळाने हा शीट मास्क काढा आणि हाताने व्यवस्थित चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून आवळ्याचा रस तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित शोषून घेतला जाईल
  • हा प्रयोग तुम्ही 15 दिवसाने एकदा नक्की करावा. यामुळे त्वचा अधिक कसदार आणि तरूण दिसण्यास मदत मिळते 

तेलकट त्वचेसाठी आहे उत्तम फेसमास्क (Best Face Mask for Oily Skin)

उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. चेहऱ्यावर तेल आणि मुरूमांची समस्या तर नेहमी दिसून येते. तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये आवळ्याचा फेसमास्क नक्की समाविष्ट करून घ्या. यामुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि चांगली राहण्यास मदत मिळते. 

  • फेसपॅक बनविण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 चमचे आवळा पावडर, दही आणि गुलाबपाणी मिक्स करून घ्या 
  • त्यानंतर तुम्ही ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या
  • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा
  • लक्षात ठेवा तुम्ही हे रूटीन रोज व्यवस्थित फॉलो करा

चेहऱ्यावर चमक आणतो आवळा स्क्रब 

सुरकुत्या, ब्लॅकहेड्सच्या समस्या असतील तर त्यातून वाचण्यासाठई तुम्ही आपली त्वचा नियमित स्क्रब करायला हवी. यासाठी आवळ्यापेक्षा अधिक चांगला उपाय असूच शकत नाही.  

ADVERTISEMENT
  • स्क्रब बनविण्यासाठी 2 कच्चे आवळे घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा
  • यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा. दोन्ही मिक्स करून त्यात 1 चमचा ग्रीन टी मिक्स करा
  • तुम्हाला ग्रीन टी ची सुकी पाने मिक्स केल्यास अधिक फायदा होतो 
  • आता हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि व्यवस्थित स्क्रब करा. तुम्हाला हवं असेल तर शरीरालादेखील स्क्रब करू शकता
  • चेहऱ्याचा रंग उजविळ्यासह त्वचा अधिक मुलायम करण्यासाठी याचा उपयोग होतो 

सैलसर त्वचा बनवा कसदार 

वाढत्या वयासह त्वचा सैल व्हायला लागते. त्यामुळे तुम्हाला चेहऱ्याला मसाज करण्याची खूपच आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही आवळ्याचा रस वापरू शकता. कारण यात असणारे अँटिऑक्सिडंट आणि विटामिन सी सह रेटिनॉलचे गुणही असतात. याचा वापर सौंदर्य प्रसाधन बनविण्यासाठीही करण्यात येतो. 

  • फेस मसाजसाठी तुम्ही 1 चमचा आवळा रसामध्ये 1 चमचा बदामाचे तेल मिक्स करा 
  • सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याला नीट मसाज करा आणि 15 मिनिट्स तसंच राहू द्या. 15 मिनिट्सनंतर चेहरा क्लीन करा 
  • रोज असं केल्यास, तुम्हाला फरक दिसून येईल. 

आवळ्याचा त्वचेसाठी तुम्ही वर दिल्याप्रमाणे वापर करू शकता. मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल अथवा संवेदनशील त्वचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT