आवळ्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या घरात नेहमी आवळ्याचं लोणचं किंवा बाकी अनेक गोष्टी करण्यात आलेल्या असतात. आवळा चवीला जितका आंबट गोड लागतो त्याहीपेक्षा त्याचे फायदे तुमच्या शरीरासाठी अधिक प्रमाणात होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चरबी कमी करण्यासाठी आवळ्याचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. खरं तर आवळा खाल्ल्याने पोटात साठलेला मळ साफ होतो. चरबी जमते ती पोट साफ न झाल्यामुळे. तसंच यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही निर्माण होतात. पण आवळ्याच्या सेवनाने या समस्या निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही रोज नियमित आवळ्याच्या रसाचं अथवा आवळ्याचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही या लेखातून तुम्हाला आवळ्याचा रस वजन आणि चरबी कमी करण्यासाठी कसा उपयोगी ठरतो हे आपण जाणून घेऊया.
वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे आवळा
Shutterstock
जेव्हा गोष्ट वजन घटवण्याची येते तेव्हा व्यायामासह तुम्ही योग्य पदार्थ खाण्याचीही गरज असते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मेहनत करण्याची गरज असते. तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जादू चालणार नाही. पण काही पदार्थ असे असतात जे तुमच्या अंगावरील चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यात आवळ्याचा रस वापरणं गरजेचं आहे. यामुळे पोट साफ होऊन तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
स्वादिष्ट आणि चमचमीत आवळा रेसिपीज
मॅजिकल घटक आहे आवळा
विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स या सगळ्या घटकांनी आवळा पूर्ण होतो. आवळा शरीरातील असणाऱ्या टॉक्झिन्सना काढून टाकण्यासाठी मदत करतो. वजन कमी करण्यासाठी आणि चरबी बर्न करण्यासाठी तुम्ही एकतर कमी सॅलरीचं सेवन करायला हवं अथवा तुम्ही जितकी कॅलरी तुम्ही सेवन करता त्यापेक्षा अधिक कॅलरी बर्न करायला हवी. आवळा हा या सगळ्यासाठी एक जादुई घटक आहे. याच्या सेवनाने कॅलरी अतिशय कमी होते आणि यामुळे वजन कमी होण्यासाठीही मदत होते.
काळ्याभोर दाट केसांसाठी वरदान ‘आवळा’ (Amla), जाणून घेऊया केसांच्या प्रत्येक समस्येवरील घरगुती उपाय
मेटाबॉलिजम मजबूत करण्यासाठी होतो आवळ्याच्या रसाचा उपयोग
Shutterstock
चरबी कमी करण्यासाठी आवळा हे सुपरफूड म्हणून खरं तर ओळखलं जातं. कारण यामध्ये असणारं विटामिन सी तुमची प्रतिकारशक्ती अधिक बळकट बनवतं. शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकून मेटाबॉलिजम मजबूत करण्याची प्रक्रिया यामुळे अधिक जलद होते. त्यामुळे चरबी कमी करण्याची वेळ येते तेव्हा आवळा हे मुख्य फळ खावं असं म्हटलं जातं. आवळ्यातील घटक हे शरीरातील चरबी कमी करण्यसाठी अत्यंत आवश्यक ठरतात.
शरीरातली फॅट अर्थात चरबी हटवण्यासाठी फायदेशीर
Shutterstock
आवळ्यामध्ये हायपॉलिपिडॅमिक घटक आढळतात ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि कॉलेस्ट्रॉलच्या लक्षणांशी लढण्याची मदत मिळते. त्यामुळेच शरीरातील फॅट अथवा चरबी हटवण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे जाडी कमी होण्यास मदत मिळते. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच आवळ्याचा रस शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे नियमित आवळ्याचा रस पिणं हे योग्य आहे.
आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा
फायबरयुक्त आहे आवळ्याचा रस
आवळा हा फायबरसाठी अत्यंत चांगला सोर्स आहे. त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी तसंच पचनक्रिया अधिक चांगली बनवण्यासाठी आणि आतडीची प्रक्रिया चांगली करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी याची मदत होते. या सगळ्या गोष्टी जेव्हा योग्य तऱ्हेने काम करायला लागल्यानंतर तुमचं वजन लवकर घटायला सुरुवात होते.
रिकाम्या पोटी प्या आवळा रस
कच्चा आवळा खायला आंबट तर असतोच शिवाय यामध्ये थोडासा तुरटपणादेखील असतो. त्यामुळे सर्वांना आवळा आवडतो असं नाही. त्यामुळे तुम्ही आवळ्याचा रस पिणं जास्त चांगलं. चवीलादेखील हे चांगलं असतं आणि तुमच्या शरीरालाही त्याचा फायदा होतो. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दिवसातून किमान 2-3 चमचा आवळ्याचा रस अथवा आवळ्याची पावडर गरम अथवा कोमट पाण्यातून मिक्स करून घेतल्यास, फायदा होतो. पण हे तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिणं आवश्यक आहे. तरच तुमच्या शरीरावर त्याचा योग्य परिणाम होतो. असं केल्याने तुमच्या शरीरातील डिटॉक्स कमी होण्यास मदत होते.
मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई
केवळ वजन कमी नाही तर आवळ्याच्या रसाचे अधिक फायदे –
- आवळ्याच्या रसात अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे कार्सिनोजेनिक पेशी वाढण्यापासून रोख लागते आणि कॅन्सरपासूनही होतो बचाव
- आवळ्याच्या रसातील तुरटपणा पचनतंत्र नीट ठेवण्याच्या इन्जाईम्सना सक्रिय बनवतो आणि अॅसिडिटीपासून वाचवतो
- आवळ्यात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स रेटिनाला ऑक्सिडाईज होण्यापासून वाचवतात
- याच्या नियमित सेवनाने मोतीबिंदू आणि रातांधळेपणासारख्या समस्यांपासून सुटका मिळते
- आवळ्याच्या रसामुळे मेंदूतील पेशी तुमचा मूड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करतात
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.