ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ananya-teaser-out-in-marathi

आकाशाला गवसणी घालणाऱ्या ‘अनन्या’चा टीझर प्रदर्शित

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ (Ananya) हा चित्रपट येत्या 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर (Teaser) सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे. एम. कॅाममध्ये गोल्ड मेडल पटकावलेली अनन्याचा स्वतःची काही स्वप्नं आहेत, आयुष्यात काही ध्येय आहेत. तिला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. आयुष्याकडे सकारात्कतेने बघणाऱ्या अनन्याचा तिच्या नावाप्रमाणेच अनन्यसाधारण असा प्रवास यात दिसून येत आहे.  

रंगभूमीनंतर आता मोठ्या पडद्यावर 

दिग्दर्शक प्रताप फड यांनी याबाबतीत सांगितले की, “यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वयोगट आहे. तर तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते. त्यात भव्यता आणू शकता. या ‘अनन्या’लाही प्रेक्षक तसेच भरभरून प्रेम देतील. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय.’’ प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’  या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे.  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

नाटकात अनन्याची भूमिका ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने साकारली होती. मात्र आता या चित्रपटात हृता दुर्गुळे अनन्याची ही भूमिका साकारत आहे. हृताने तिच्या भूमिकेसंदर्भात आधीच चाहत्यांना माहिती दिली होती. तर सध्या हृता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. तसेच तिचे नुकतेच लग्न झाले असून ती पुन्हा काम करण्यास सज्ज झाली आहे. 

अनन्या असाधारण मुलीची कहाणी

सगळ्यांचे आयुष्य परफेक्ट नसते. प्रत्येकाकडे कोणत्यातरी गोष्टीची कमतरता असतेच. पण आपल्यात काय कमतरता आहे, यामध्ये तुम्ही गुरफटून न राहता जर आहे त्यातच काही तरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नवी शिखर गाठू शकता आणि उंच भरारी घेऊ शकता यात काहीही शंका नाही. हेच या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. तुम्हालाही अनन्याची ही गोष्ट पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच थोडी वाट बघायला हवी पण आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दरम्यान हृतासाठी हा चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळा अनुभव आहे. तर प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल असा विश्वासही या चित्रपटातील कलाकारांनाही आहे. तर हृतालाही आपलं काम प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT