अंगदुखीची समस्या ही खूप जणांना असते. काही ना काही कारणास्तव अंग दुखण्याचा त्रास हा खूप जणांना होतो. अंग दुखणे याचा त्रास तुम्हालाही होत असेल तर त्यामागे काही खास कारणं असू शकतात. केवळ वय वाढणं हे त्यामागील कारण असू शकत नाही. तर इतर अनेक सवयींमुळेही अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. अंगदुखी ही तुमच्या रोजच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करते. दिवसभरात काहीही काम करण्याची इच्छा राहात नाही आणि या कडे दुर्लक्ष केले तर त्याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागतात. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. या अंग दुखीवर घरगुती उपाय करुनही काहीसा आराम मिळवता येऊ शकतो. अंगदुखी म्हणजे नेमकं काय? त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय (body pain home remedies in marathi) हे शोधून काढले आहेत. चला तर जाणून घेऊया अंगदुखीवर घरगुती उपाय (ang dukhi upay in marathi) आणि अंग दुखीची कारणं.
अंगदुखीची कारणं (Causes Of Body Pain In Marathi)
Causes Of Body Pain In Marathi
अंगदुखीमागे केवळ दुखापत हे एकच कारण असू शकत नाही. तर अंगदुखीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. जाणून घेऊया अंग दुखीची कारणं
व्हिटॅमिन D ची कमतरता (Lack Vitamin D)
व्हिटॅमिन शरीरासाठी फारच गरजेचे असते. जर त्याची कमतरता झाली की, शरीर काही संकेत देऊ लागते. व्हिटॅमिन D ची कमतरता शरीरात असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास जाणवू शकतो. जर तुम्हाला अचानक असा अंग दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरात व्हिटॅमिनD ची कमतरता झाली आहे की नाही हे तपासावे.
लोहची कमतरता (Lack Of Iron)
शरीरात सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. जर शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असेल तर शरीर बळकट राहते. स्नायू आणि हाडांना चांगलीच बळकटी मिळते. जर तुम्ही लोहाचे प्रमाण योग्य नसेल तरी देखील तुम्हाला अंग दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोहाची कमतरता हे देखील या मागे एक कारण ठरु शकतो.
ताण तणाव (Stress)
हल्लीच्या काळी ताण-तणावाने सगळ्यांना ग्रासलेले आहे. ज्यांना सतत काही तरी टेन्शन असते अशांना अनेक शारीरिक व्याधी अगदी हमखास जाणवतात. त्यामुळे तुमच्या अंगदुखीमागे हे एक कारण देखील अगदी नक्कीच असू शकते. तुम्हीही कोणत्या गोष्टीचा ताण घेतला असेल तर तुम्हाला अपुरी झोप, अपुरा आहार असे काही त्रास होतात. त्यामुळे अंग दुखीचे हे एक कारण ठरु शकते.
डिहायड्रेशन (Dehydration)
पाणी कमी पिण्याची सवय ही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. जर तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी प्यायला नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. शरीराराची योग्य हालचाल होण्यासाठी तुम्हाला शरीरात योग्य पाणी असणे गरजेचे असते. जर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी असायला हवे. त्यामुळे पाणी हे शरीरासाठी फारच गरजेचे आहे.
झोपेची कमतरता (Lack Of Sleep)
शरीर रिलॅक्स करण्यासाठी आरामाची गरज असते. जर तुम्ही योग्य आराम केला तर तुम्हाला थकवा किंवा शरीराला आलेले जडत्व जाणवणार नाही. झोप ही प्रत्येक शरीराची गरज आहे. शरीराला आलेला क्षीण घालवण्याचे काम झोप करते. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला अंग दुखीचा हा त्रास जाणवणे अगदी स्वाभाविक आहे. संपूर्ण शरीराचा थकवा हा 8 ते 9 तासांच्या झोपेमुळे पूर्ण होतो. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास मुळीच होऊ शकत नाही.
थकवा (Fatigue)
खूप काम केल्यावर किंवा सहनशक्तीपेक्षा जास्त स्ट्रेस घेतल्यामुळेही खूप वेळा आपल्याला थकवा जाणवू लागतो. जर तुमचे शरीरा व्यायामामुळे किंवा कोणत्याही अती कामामुळे सतत थकत असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणे हे अगदी स्वाभाविक आहे. जर तुम्हाला असा थकवा जाणवत असेल तर तुम्ही त्याची योग्य काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणार नाही.
ताप किंवा सर्दी (Cold Or Flu)
कोणतेही आजारपण हे शरीरात थकवा आणत असते. ताप आणि सर्दी झाली की, शरीराच्या सगळ्या क्रिया या मंदावतात. अशावेळी शरीरामध्ये कणकण असते ही कणकण जर तशीच राहिली त्याकडे दुर्लक्ष केले तरी शरीरामध्ये कमालीचा थकवा येतो. ज्यामुळे अंग दुखीचा त्रास होऊ लागतो. कधी कधी तापातून बरे झाल्यानंतरही काही दिवस हा थकवा जाणवतो. त्यामुळे याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
आर्थरायटीस (Arthritis)
हाडांशी निगडीत असलेल्या अशा या आजाराने अनेक जण त्रस्त असतात. हा त्रास मांड्या आणि गुडघ्यांन होतो. हा एक संधीवाताचा एक प्रकार असून त्यामुळे अंग दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल तरी देखील अंग दुखीचा त्रास तुम्हाला अगदी हमखास होण्याची शक्यता असते.
न्युमोनिया (Pneumonia)
आजारपण हे शरीरात थकवा आणतात. न्युमोनियासारखा आजार हा शरीरामध्ये थकवा आणण्याचे काम करतो. अशावेळी देखील जरा शारीरिक हालचाल केली की त्रास होतो. अंग अगदी मुरडून जाते. काहीही काम करण्याची इच्छा राहात नाही. जर तुम्हाला न्युमोनिया झाला असेल तर तुम्हाला हमखास अंगदुखी, थकवा असा त्रास होण्याची शक्यता असते. याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. कारण ही अंग दुखी भयंकर वाढून तुमच्यामधील प्रतिकारशक्ती कमी करुन टाकते.
सांधेदुखी (Tender Points)
खूप जणांना सांधे दुखीचा त्रास असतो. सांधेदुखीमागेही अनेक कारणं असू शकतात. पण त्यामुळेही अंग दुखू शकते. स्नायूंनाही त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. सांधे दुखीचा त्रास हा आता केवळ ज्येष्ठांनाच होतो असे नाही तर आता तरुणांमध्येही हा त्रास दिसू लागला आहे.
अंगदुखीवर घरगुती उपाय (Ang Dukhi Gharguti Upay In Marathi)
Ang Dukhi Gharguti Upay In Marathi
अंग दुखी करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करु शकता. हे उपाय केल्यामुळेही तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.
सॉफ्ट टिश्यु मसाज (Soft Tissue Massage)
मसाजचा हा प्रकार फारच आरामदायी असा आहे. सॉफ्ट टिश्यु मसाजमध्ये तुमचे अंग ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी तुम्हाला अगदी हलक्या हाताने मसाज केला जातो. हा मसाज केल्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळण्यास मदत मिळते. हल्ली अनेक प्रोफेशनल मसाज करणाऱ्यांकडे अशा प्रकारचा मसाज नक्कीच करुन मिळतो. ज्यामुळे तुम्हाला अंगदुखीचा त्रास होत नाही. सॉफ्ट टिश्यु मसाज तुम्ही आठवड्यातून एकदा करुन घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमची अंगदुखी कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.
बर्फाचा मसाज (Ice Massage)
खूप जणांना सांधेदुखीचा त्रास असतो. अशावेळी बर्फाचा मसाज हा फारच फायदेशीर ठरतो. बर्फ हा थंड असला तरी देखील तो हाडांवर आणि सांध्यावर उष्णता देतो. त्यामुळे अंगदुखीवर आराम मिळतो. जर शक्य असेल तर तुम्ही अंग दुखत असेल तर तुम्ही एका कपड्यात बर्फ घेऊन तुमचे अंग दुखत असेल तिथे बर्फाचा मसाज करा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. दिवसातून जेव्हा शक्य असेल त्यावेळी तुम्ही बर्फाचा हा मसाज करा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
स्ट्रेचिंग (Stretching)
कधी कधी शरीर अडकल्यामुळेही सांधेदुखी होऊ शकते. कधी कधी सतत एकाच जागी बसून देखील तुम्हाला अशा प्रकारे अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही कामातून वेळ काढून संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग करा. असे स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होई शकतो. जर तुम्हाला स्ट्रेचिंग करण्याची कोणतीही माहिती नसेल तर तुम्ही काही व्हिडिओ पाहून अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करु शकता. त्यामुळे तुमची अंगदुखी नक्कीच कमी होईल.
सांध्याचा मसाज (Warm Up Joints)
सांध्याचा मसाज हा अंग दुखीसाठी फारच फायद्याच असतो. जर सांध्यांना गरम असा मसाज मिळाला तर त्यामुळे नक्कीच आराम मिळतो. तुमच्याकडे असलेले कोणतेही तेल घेऊन ते थोडेसे गरम करुन तुम्ही ते सांध्यांवर किंवा तुम्हाला जिथे स्नायू दुखत आहेत तिथे लावा. जर तुम्हाला स्वत:च्या हाताने मसाज केल्यामुळे आराम मिळेल असे वाटत नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारे काही खास मसाजर वापरु शकता. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकेल.
चांगली झोप (Good Sleep)
चांगल्या आरोग्यासाठी झोप ही फारच महत्वाची असते. जर तुमची झोप पूर्ण असेल तर तुम्हाला नक्कीच कोणताही शारीरिक थकवा जाणवत नाही. दिवसभर आलेला ताणतणाव घालवण्यासाठीच झोप असते. हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे खूप जणांची झोप ही योग्य होत नाही. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ आणि शरीराला पुरेशी इतकी झोप नक्कीच मिळवा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच थकवा किंवा अंगदुखी जाणवणार नाही.
अॅक्युपंचर (Acupuncture)
अंगदुखीसाठी फारच फायदेशीर ठरणारा प्रकार म्हणजे अॅक्युपंचर. अनेक ठिकाणी तुमच्या शरीराचा जो भाग दुखतो तेथील काही पॉईंट्स दाबले जातात. त्यामुळेच तुम्हाला आराम मिळतो. तुम्हाला अंगदुखी होत असेल तर तुम्ही अॅक्युपंचर करुन अंगदुखी कमी करु शकता. जर तुम्हाला अंगदुखी घालवायची असेल तर तुम्ही हा उपायही करु शकता.
फायबरयुक्त पदार्थ (Fiber Food)
शरीराला थकवा आला असेल तर अशावेळी तुम्ही चांगला आहार घेणे हे फारच गरजेचे असते. जर तुम्ही चांगले आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ले तर शरीरात उर्जा कायम राहते. वजन वाढवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ कारणीभूत असतात. पण ज्यांच्या शरीरात उर्जेची कमतरता आहे आणि ज्यांना काहीही करण्याची इच्छा होत नसेल तर अशांच्या शरीरात फायबरयुक्त पदार्थांची कमतरता आहे हे समजून जावे. जर तुम्हाला अंगदुखी होत असेल तर त्यामागे एक कारण उर्जेची कमतरता हे देखील असू शकते. त्यामुळे तुम्ही फायबरयुक्त पदार्थांचे सेवन नक्की करायला हवे.
व्यायाम (Exercise)
शरीर जखडण्याचे कारण शरीराला नसलेली हालचाल आहे. जर तुम्ही योग्य हालचाल करत नसाल तरी देखील तुम्हाला अंग दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य व्यायाम हा देखील शरीरासाठी सांध्यांसाठी आणि स्नायूसाठी आवश्यक असतो. त्यामुळे दिवसातून किमान 30 मिनिटं व्यायाम करा किंवा शक्य असेल तर तेवढा वेळ चाला त्यामुळे शरीराची हालचाल योग्य होईल.
अंगदुखी होऊ नये यासाठी काही टिप्स (Tips To Prevent Body Pain In Marathi)
Tips to Prevent Body Pain In Marathi
अंगदुखी होऊ द्यायची नसेल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स
- सकस आहार हा संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असतो. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळते. त्यामुळे अंग दुखीचा त्रास होत नाही.
- शरीराची योग्य हालचाल ही देखील अंगदुखीसाठी गरजेची असते. त्यामुळे तुम्हाला नक्कीच स्नायू अडकल्याचा किंवा शरीराला जडत्व आल्याचा त्रास होणार नाही.
- महिन्यातून एकदा तरी शरीराचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही व्यायाम करुन घ्यायला हवा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळेल.
- दिवसातून केवळ 30 मिनिटं तरी व्यायाम करा. त्यामुळे तुमचे स्नायू मोकळे होण्यास मदत मिळेल.
- सतत एका ठिकाणी बसून राहू नका. त्यामुळेही तुम्हाला अगंदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
जर तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल तर तुम्हाला अशाप्रकारे झोपेतून उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो. या शिवाय जर तुम्ही आदल्या दिवशी खूप शारीरिक हालचाल केली असेल तरी देखील तुम्हाला झोपेतून उठल्यावर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. जर तुम्हाला असा थकवा सतत जाणवत असेल तर तुम्ही योग्य झोप घ्या आणि शरीराला जास्तीत जास्त आराम द्या.
अंग दुखी होत असेल तर त्यामागे तुमच्या शरीरातील काही गोष्टींची कमतरता नक्कीच असू शकते. जर तुमच्या आहारात कार्बोदके, प्रथिनं,लोह योग्य प्रमाणात जातील तर तुम्हाला अस अंग दुखी होणार नाही. याशिवाय तुम्ही आहारात जंक फूड ऐवजी हेल्दी आणि चांगले पदार्थांचे सेवन केले तर तुम्हाला अंग दुखीचा त्रास होणार नाही.
बरेचदा शरीर कमजोर झाल्यामुळे अंग दुखीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे आहार हा चौकस आणि चांगला असायला हवा. जर तुम्हाला अगदी पटकन उर्जा मिळवायची असेल तर तुम्ही लिंबू पाणी, नारळाचे पाणी यांचे सेवन करु शकता. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.