एप्रिल महिन्याचा पहिला दिवस म्हणजे सर्वांसाठीच मजेचा असतो. एप्रिल फूल (April Fool) म्हणून 1 एप्रिल हा ओळखला जातो. एप्रिल फूल म्हटलं की लहानपणापासून सगळेच जण एकमेकांची मजा घेण्यात पुढे असतात. या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींना एप्रिल फूल कसं करायचं याचा विचार करण्यात येतो. अशाच एप्रिल फूलच्या (April Fool Jokes In Marathi) दिवसासाठी काही खास जोक्स आणि एसएमएसही (April Fool SMS in Marathi) आपण आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवतो. आयुष्यात अनेक चढउतार होत असतात. पण हास्य, विनोद आणि प्रँकसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो. आपल्या मित्रमैत्रिणींना एप्रिल फुल करण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे प्रँक आणि कल्पना (April Fool Ideas in Marathi) शोधत असतो. या गमतीने वातावरणही हलकेफुलके होत असते. पण ही मजा मस्ती कोणालाही जिव्हारी लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एप्रिल फुल साठी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी काही जोक्स (April Fool Marathi Jokes) आणि एसएमएस (April Fool Marathi SMS) या लेखातून आम्ही देत आहोत.
Table of Contents
एप्रिल फूल जोक्स | April Fool Jokes In Marathi
एप्रिल फूल म्हटलं की, आपल्या मित्रमैत्रिणींना प्रँकमध्ये आपल्याला सामावूनही घ्यायचं असतं आणि त्याशिवाय आपल्या मित्रमैत्रिणींची धमाल झालेलीदेखील पाहायची असते. असेच काही एप्रिल फूल जोक्स (New April fool marathi jokes) खास तुमच्यासाठी.
1. पक्या 1 एप्रिलच्या दिवशी बसमध्ये चढतो, कंडक्टर तिकीट विचारतो, राजा 10 रुपये देतो आणि तिकीट घेतो, आणि कंडक्टरला म्हणतो एप्रिल फुल ..!!! माझ्याकडे पास हाय …
2. जेव्हा तुला अगदी एकाकी वाटू लागेल.. डोळयासमोर अंधार दाटून येईल…
तू तेव्हा नक्की माझ्याकडे ये! मी तुला डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाईन!
3. 2 ऑक्टोबर – गांधीजींसाठी
14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी
15 ऑगस्ट : देशासाठी
1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !
Happy April Fool’s Day!
4. पक्या आपल्या गर्लफ्रेंडबरोबर हॉटेलमध्ये जातो आणि सामोसे मागवतो, त्याची गर्लफ्रेंड त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत असते, आणि मग पक्या म्हणतो …
क ..
क ..
कि ..
किस ..
किस ..
किसान सॉस देना, सामोसाबरोबर खायला मस्त लागते !!!
5. एक खुळा होता, खूपच खुळा होता, अरे जास्त विचार करू नका अथवा घाबरू नका तुमच्यापेक्षा जास्त खुळा अजिबात नव्हता
6. 1 एप्रिलला चार-चौघींना propose करून बघा पटल्या तर cool नाहीतर अगं ताई एप्रिल फूल
7. मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस, माझ्या जीवनात ही तू आहेस,
आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं, ती पण फक्त तूच आहेस
8. April Fool च्या हार्दिक शुभेच्छा! एक विनंती आहे ती म्हणजे विवाहित पुरुषांना कोणीही april fool करू नये कारण ते काम त्यांच्या सासऱ्यांनी अगोदरच केले आहे
9. 1 एप्रिलला मूर्ख बनविण्याचे 7 प्रकार
.
.
.
हा होता पहिला प्रकार…आता बाकी सगळं उद्या!
10. काल रात्री माझे डोके खूपच दुखत होते, डॉक्टर म्हणाले एखाद्या मूर्खाला मेसेज पाठव आणि मला तुझी आठवण आली…कारण तुझ्याशिवाय असं माझ्या आयुष्यात कोणीच नाही…Happy April Fool!
एप्रिल फूल मराठी SMS | April fool marathi SMS
एप्रिल फूल म्हटलं की, आजकालच्या धावपळीच्या दिवसात अनेकांच्या हा दिवस लक्षात नसतो. तसंच आयुष्य इतकं ताणतणावाचं झालं आहे की, थोडेसे हसायलाही वेळ नाही. त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना एप्रिल फूलचे एसएमएस (April Fool SMS in Marathi) पाठवा आणि आयुष्यात थोडे हसूही आणा.
1. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही खालच्या जीभेने ओठाला स्पर्श करू शकत नाही. अर्थात हे वाचल्यावर 100 पैकी 99 लोक तसा प्रयत्न नक्कीच करतात. तुम्ही केला का असा प्रयत्न?
2. एक हृदय जे आज, उद्या आणि नेहमीच तुझ्यासाठी धडधडत असेल
जास्त विचार नको करूस, ते तुझंच आहे, नाहीतर तुला जगता तरी येईल का?…Happy April Fool!
3. फजितीत फसवते स्वतःलाच हसवते
एप्रिलमध्येच कसे बघा एक तारखेलाच उगवते
‘एप्रिल फूल’ – एप्रिल फुलच्या शुभेच्छा!
4. FOOL ने
FOOLAN च्या
FOOLWARI मध्ये
FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत,
तू सर्वात जास्त
BEAUTIFOOL
WONDERFOOL
आणि ColorFOOL असून
सर्वांमधील FOOL’S आहेस
Happy April Fool’s Day!
5. ….या प्रश्नाचे उत्तर द्या
मी मूर्ख आहे? होय की नाही
April Fool Day History in Hindi
6. मूर्ख दिवसाच्या या पवित्र आणि पावन दिवसाला मूर्खांचे सरताज असणाऱ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा!
7. अरे खजूर, पिळलेला आंबा, सर्कसमधून निवृत्त झालेला माकड असे कधीच कोणाला म्हणू नका …वाईट वाटेल ना?
8. वेडे आहेत ते लोक जे 14 फेब्रुवारीला लग्नाची मागणी घालतात
1 एप्रिलला लग्नाची मागणी घालून तर बघा. मानली तर कूल नाहीतर एप्रिल फूल
9. प्लीज मला लगेच फोन कर…अपघात झालाय. तुझाच ब्लड ग्रुप लागेल नाहीतर ते गाढव मरेल
10. तुला कोणीही वेडा म्हटलं तर शांत राहा,
माकड म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नकोस
पण जर कोणी स्मार्ट म्हटलं तर नक्कीच थोबाडीत वाजव! Happy April Fool!
एप्रिल फूल एसएमएस मराठीत (April fool SMS in marathi)
एप्रिल फूलसाठी काही खास एसएमएस मराठीत. तुम्हीही तुमच्या आप्तेष्टांना द्या सोशल मीडियावरून शुभेच्छा आणि साजरा करा एप्रिल फूल.
1. तू टेन्शनमध्ये असशील, काहीच ठीक होत नसेल तर
तू मला फक्त फोन कर, त्यानंतर तुझं टेन्शन अधिक वाढवायला मी आहेच…एप्रिल फूल!
2. तुला भेटल्यापासून मला एक गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवली आहे,
तुझ्यासारखे मित्र हे लाखमोलाचे असतात
तुझी हरकत नसेल तर मी तुला विकून टाकू का?
3. आयुष्य हे रडण्यासाठी नाही तर हसण्याहसविण्यासाठी आहे
एप्रिल फूल झालात तरी चिडू नका..फक्त आनंद साजरा करा
4. तू चार्मिंग आहेस, तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस, आणि मी ?
मी अशा अफवा पसरविणारा!…Happy April Fool’s Day!
5. जेव्हा तू आरशा समोर जातोस तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,
पण जेव्हा तू आरशापासून दूर जातो, तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!
6. कोणतीही महत्त्वाची गोष्ट असेल तर मला उद्याच सांग, कारण कदाचित आज मला काहीच खरं वाटणार नाही…एप्रिल फूल!
7. तुमच्यासारखा कोणी माझ्या आयुष्यात आला तर नक्कीच माझं आयुष्य सुंदर असेल
पण माझ्या या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवलात तर नक्कीच ‘एप्रिल फूल’ व्हाल
8. पक्या आपल्या गर्लफ्रेंडला, 1 एप्रिलला फोन लावतो आणि म्हणतो … आय लव्ह यू, आय लव्ह यु खूप खूप … कारण मेनका गांधीनी सांगितले की माणसांनी जनावरांवर प्रेम केले पाहिजे !!!
9. माझ्या प्रिय मित्रांनो,
मी आता कामानिमित्त अमेरिकेला शिफ्ट होणार आहे. मला तिथला पाच वर्षाचा व्हिसा मिळाला आहे. परवापासून माझा मोबाईल नंबर बंद राहील. +6153378901 हा माझा तिकडचा नंबर आहे. मला तुमची खूप आठवण येईल, पण व्हाटस अपवर तुमच्यासह टचमध्ये नक्की राहीन
गुड बाय.
.
.
.
.
असं स्वप्न मला काल रात्री पडलं
सध्या मी घरीच आहे
10. आपली मैत्रीच आहे अशी की
मी हॉट तू कूल
मी एप्रिल (April) आणि तू फूल (Fool)
एप्रिल फूल मेसेज मराठीत (April fool msg in marathi)
मराठीमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना जर एप्रिल फूल मेसेज पाठवायचे असतील तर तुम्ही आमच्या लेखाचा नक्कीच आधार घेऊ शकता.
1. तुला मी मेसेजमध्ये फूल पाठवले आहे बघ ना
दिसले का?
नाही दिसले?
कसे दिसणार कारण हे आहे एप्रिल फूल
2. तुम्ही आज न्यूज चॅनेलवर महत्त्वाची बाब ऐकली का?
नाही, किमान रेडिओवर तरी ऐकली असेल?
अजिबातच नाही का?
अहो आज आहे एप्रिल फूल
3. गुलाबाचे फूल बागेत उगवते, चमेलीच्या फुलाने मन मोहकते
कमळाचे फूल पाण्यात तरंगते, आणि एप्रिल फूल…माझा मेसेज वाचते
4. येणारा उद्याचा दिवस हा तुमचाच होता, आहे आणि कायम राहील. कारण उद्या एप्रिल फूल आहे
5. जसा तुम्ही कधीच कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही, तसाच आजही ठेऊ नका. कारण आज आहे एप्रिल फूल
एप्रिल फूल मजेदार बनवण्यासाठी आयडिया
एप्रिल फूल बनविण्यासाठी तुम्हाला जर काही आयडिया (April fool ideas in marathi) हव्या असतील तर त्यासाठीही तुम्हाला आम्ही मदत करू शकतो.
1. खिडकीतून दोऱ्याला नोट लाऊन खाली सोडणे
खोट्या नोटेला दोरा बांधा आणि वरच्या मजल्यावरून ती नोट खाली सोडा. काही माणसांना रस्त्यावर नोट पडली आहे असे वाटेल आणि उचलायला येतील. समोर व्यक्ती आल्यावर नोट खेचून मजा घ्या
2. ज्युसमध्ये कारल्याचा रस मिक्स करणे
आपल्या घरी आपले मित्रमैत्रिणी येणार असतील तर ज्युस देताना त्यात कारल्याचा रस मिक्स करूनही तुम्ही देऊन त्यांची फजिती करू शकता
3. करा ड्रॉव्हर्सची अदलाबदल
आपल्या घरातील व्यक्तींना सवय असते काही गोष्टींची पण एप्रिल फूलच्या दिवशी तुम्ही रोज लागणाऱ्या अशा वस्तूंची अदलाबदल ड्रॉव्हर्समधून करू शकता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा गोंधळ उडेल आणि एप्रिल फूल करता येईल
4. फेक फोटो
एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीच्या व्यक्तीसह फेक फोटो बनवून घ्या आणि त्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवा
5. बिस्किटामध्ये घाला टूथपेस्ट
पांढरे क्रिम असणाऱ्या बिस्किटामध्ये तुम्ही टूथपेस्ट घाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खायला द्या. एक घास खाल्ल्यानंतर त्यांचे तोंड बघण्यासारखे होईल आणि तुम्हाला मजा घेता येईल
अशा अनेक आयडिया तुम्हाला तुमच्या सुपीक डोक्यातून लढवता येतील. तुम्हाला नक्कीच आमचा लेख वाचून यावर्षीच्या 1 एप्रिलला काय करायचे आहे याचा अंदाज आला असेल. तुम्हीही पाठवा एसएमएश आणि जोक्स आपल्या प्रियजनांना आणि करा एप्रिल फूल! मात्र मजा मस्करी करत असताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला विसरू नका.
april fool jokes in marathi, april fool marathi sms, april fool sms in marathi, april fool messages in marath, april fool msg in marathi, april fool marathi jokes, april fool msg marathi, april fool ideas in marathi, april fool jokes in marathi, april fool marathi sms, april fool sms in marathi, april fool messages in marath, april fool msg in marathi, april fool marathi jokes, april fool msg marathi, april fool ideas in marathi, april fool jokes in marathi, april fool marathi sms, april fool sms in marathi, april fool messages in marath, april fool msg in marathi, april fool marathi jokes, april fool msg marathi, april fool ideas in marathi, april fool jokes in marathi, april fool marathi sms, april fool sms in marathi, april fool messages in marath, april fool msg in marathi, april fool marathi jokes, april fool msg marathi, april fool ideas in marathi,