कुंभ राशीच्या (Aquarius) व्यक्तींचा जन्म महिना हा 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी मानला जातो. या राशीचा स्वामी शनि असतो. या राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात. तसंच यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती शांतताप्रिय असून अत्यंत विचारी असतात. तुमच्या जवळील कोणतीही व्यक्ती कुंभ राशीची असेल तर या लेखावरून पाहा नक्की त्यांचा स्वभाव जुळतो आहे की नाही ते.
प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या
कुंभ राशिच्या व्यक्ती कशा असतात (Aquarius sign people Positive and Negative Characteristics in Marathi)
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एका विशिष्ट वेळी, महिन्यात आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिना आणि दिवसाचे वैशिष्ट्य हे वेगळे असते. त्यानुसार माणसाची आवडनिवड ठरत असते. तसंच माणूस कसा आहे हेदेखील ठरत असते. या लेखातून आपण कुंभ राशीच्या व्यक्तिंचे वैशिष्ट्य पाहणार आहोत.
कशा असतात धनु राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या
- ‘आत्मविश्वासानेच यश प्राप्त होते’ ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो पण कुंभ राशीमध्ये आत्मविश्वास हा अत्यंत ठासून भरलेला असतो. यामुळेच त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य हे उत्तम राहते. या महिन्यात जन्मलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती या बुद्धिमानच असतात. त्यामुळे लेखन, परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारे चमक असते. पण या व्यक्तींना स्वतःबद्दल काहीच जाणीव नसते.
- कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत. एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून मगच ती गोष्ट मिळविण्याच्या मागे या व्यक्ती लागतात
- या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिकदेखील असतात. प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते. आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात. त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो
- व्हॅलेंटाईन डे च्या महिन्यात जन्म घेतल्यामुळे असेल कदाचित रोमान्स या व्यक्तींमध्ये ठासून भरलेला दिसून येतो. या व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार विचारपूर्वक निवडतात. यांना समजूतदार, साधे आणि चांगल्या मनाची माणसं अधिक आवडतात. पण यांचे प्रेम जास्त टिकत नाही. त्यामुळे यांना त्रास होतो. तर दुसऱ्या बाजूला जर प्रेम टिकले तर समोरच्या व्यक्ती अत्यंत नशीबवान ठरतात
- परफेक्ट मॅचबाबत सांगायचे झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथुन राशीच्या व्यक्ती योग्य आहेत. दोघेही अत्यंत रोमँटिक असून आयुष्य कसे जगावे हे या दोन व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे.
- या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यसााठी शब्द, विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही. कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतूनदेखील समजतात. या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात. या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणाऱ्या असतात. या व्यक्तींप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे या व्यक्तींना व्यवस्थित जमते
- कुंभ राशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात. कंजुसी करणे या व्यक्तींना जमत नाही. दोन्ही हातांना पैसे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठीच या व्यक्ती जन्माला येतात असं म्हणावं लागेलकोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे या हा या व्यक्तींचा दोष आहे. त्यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात. त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात. त्यामुळे यांनी सहसा कोणावर पटकन विश्वास ठेऊ नये
- नशीबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते. कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे यां व्यक्तींना जा्स्त योग्य वाटते. कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही. तसंच कोणी यांचे मन दुखावले तरीही त्यांना चालत नाही.
- या व्यक्तींना समजून घेणे तसं तर कठीण नाही. पण तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत असं या व्यक्ती नेहमीच दर्शवत राहतात
मकर राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, नेहमी राहतात मनाने तरूण
भाग्यशाली क्रमांक – 4,8,12, 22 आणि 28
भाग्यशाली रंग – काळा, निळा, जांभळा आणि हिरवा
भाग्यशाली दिवस – मंगळवार आणि शनिवार
भाग्यशाली खडा – नीलम आणि पोवळे
कुंभ रास असणारे बॉलीवूड स्टार्स – शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, मधुबाला, पूजा भट्ट, उर्मिला मातोंडकर, प्रीति झिंटा, श्रुति हसन, जॅकी श्रॉफ
कुंभ रास असणारे मराठी स्टार्स – प्रसाद ओक, गौतमी देशपांडे, नम्रता शिरोडकर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक