सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण 14 एकादशी येतात. पण त्यातही आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Information In Marathi) आणि कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते. या दिवशी खास आषाढी एकादशी शुभेच्छा तर यानंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा (kartiki ekadashi wishes in marathi) ही दिल्या जातात. अगदी पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते. मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. आषाढी एकादशी माहिती मराठीत (Ashadhi Ekadashi Information In Marathi) खास तुमच्यासाठी या लेखाद्वारे आम्ही घेऊन आलो आहोत. यावर्षी 10 जुलै, 2022 रोजी (Date and Timings Of Ashadhi Ekadashi 2022) आषाढी एकादशी 2022 साजरी करण्यात येणार आहे. हा कालावधी अत्यंत उत्तम कालावधी मानला जातो. आषाढी एकदशीचे महत्त्व आता आपण जाणून घेऊ.
Table of Contents
आषाढी एकादशी माहिती | Ashadhi Ekadashi Infromation In Marathi
आषाढी एकादशीचे नक्की महत्त्व काय आणि ही नक्की का इतकी जल्लोषात साजरी करतात हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो. खरं तर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असं म्हटले जाते. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो. पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं सांगण्यात येते. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. आषाढी एकादशी माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते आणि म्हणूनच तुम्ही या लेखाद्वारे ही माहिती मिळवू शकता.
अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा संतमहात्मे एकत्र यायचे तेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या चरणांवर डोके ठेऊन एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करायचे. पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो असा समज होता. त्यामुळे आजही आपल्याकडे थोरामोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. पायावर डोके ठेवल्याने दोघांचेही तेज वाढून अंगात असणारा मी पणा, अहंकार आणि ताठा कमी होतो असे म्हटले जाते. ईश्वर हा चराचरात आहे ही भावना अधिक बळावते. तसंच पूर्वी एकमेकांची भेट घेऊन आपापले अनुभव, कथा, रचना, अभंग आणि भजने याची देवाणघेवाण करण्यात ये असेल. तीच परंपरा कायम सुरू ठेवण्यात आली आङे. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी या साधनेचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पुढीला पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
एकादशी महात्म्य कथा | Katha Of Ekadashi In Marathi
एकादशी महात्म्य कथा नक्की काय आहे हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. एकादशी महात्म्य मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखातून मदत करत आहोत. एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. पण एकादशी महात्म्य कथा नक्की काय आहे तुम्हाला त्याची माहिती आहे का? आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा असतात. अशीच एकादशी महात्म्य कथा जाणून घ्या.
भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.
आषाढी एकादशी व्रत | Vrat Of Ashadhi Ekadashi In Marathi
आषाढी एकादशीला बरेच जण उपवास करतात. उपवासाचे अनेक पदार्थ खाऊनही या दिवशी काही जण उपवास ठेवतात तर काही जण अगदी निर्जळी उपवास करतात.
आषाढी एकादशीचे व्रत नक्की कसे करावे याची इत्यंभूत माहिती –
एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणो सोडायचे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही करण्यात येतो. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय आहे. तर विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. या संप्रदायात वार्षिक, सहमाही जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशा स्वरूपात वारी काढण्यात येते. पण वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे. तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समाज आहे. म्हणूनच अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येते.
वाचा – आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे पदार्थ
वारीचे महत्त्व | Importance of Wari In Marathi
वारीची परंपरा ही आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे विठ्ठलमनामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला ही वारी होते. पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी असते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो.
एकादशीच्या दिवशी नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी, नित्यनियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी असे म्हटले जाते. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हटले जाते तर वारकरी धर्मालाच भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ही एकच इच्छा वारकऱ्याची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानण्यात येते. इतकंच नाही तर अनेक शतकांपासून जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधकही सहभागी होतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे ही अत्यंत मनाला शांत करणारी अनुभूती आहे असं म्हटले जाते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात.
आषाढी एकादशीला पंढरपुरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबिराची पालखी एकत्र येते. आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात. ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि हे पिकलेले धान्य शेतकऱ्याला जगण्यास अधिक बळ देतो. याचप्रमाणे वारीच्या दिवशी वारकरी हा प्रेमाची साठवण करून ठेवतो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत हे विठ्ठलाचे प्रेम व्यवहारात वापरतो असं म्हटलं जातं. तर विठ्ठलाच्या भक्तीसाठी आसुसलेला प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो असंही सांगण्यात येते.
तर पायी करण्यात येणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी असल्याचेही सांगण्यात येते. तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख आढळतात. ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेव महाराजांनी भागवत या धर्माची पताका खांद्यावर घेतली. तसंच सर्व जातीपातींच्या लोकांना आणि समाजाला एकत्रितपणे या वारीच्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उल्लेख केला आहे की, “पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव महाराजांच्याही पूर्वकालीन प्रथा आहे, तर वारकरी हे नाव वारीमुळेच पडले आहे. वारीमधून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा ही सर्व मोठ्या संतांनी जतन केली आहे.” ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे वारी संप्रदाय हा जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला असे सांगण्यात येते; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते असेही म्हटले जाते.
निष्कर्ष – 2022 आषाढी एकादशी माहिती मराठी (ashadi ekadashi information in marathi) जाणून घेतल्यावर तुम्हाला हा दिवस म्हणजेच आषाढी एकादशी का साजरी करतात (ashadhi ekadashi information in marathi) करतात ते कळलं असेलच. आषाढी एकादशी माहिती मराठी (ashadhi ekadashi mahiti marathi madhe) इतरांसोबतही नक्की शेअर करा.