ADVERTISEMENT
home / आरोग्य
avoid-these-things-for-healthy-vagina

व्हजायना निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी करणे टाळा

सर्वच महिलांना आपल्या व्हजायनल आरोग्याची (Vaginal Health) काळजी असायलाच हवी. व्हजायनची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय? खरं तर अनेकदा व्हजायनाला खाज येणे, मासिक पाळीच्या दिवसात व्हजायना दुखणे, यीस्ट इनेफ्शन असे त्रास होतात. या काळात व्हजायनाच्या स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. व्हजायना अर्थात योनीच्या बाबतीतील माहिती प्रत्येकाला असते. पण व्हजायना निरोगी ठेवायची म्हणजे नक्की काय करायचे हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. व्हजायना हे सामान्यतः एक आम्लीय पीएच आहे, ज्यामध्ये लाभदायक बॅक्टेरियाचे अधिक प्रमाण असते जे संक्रमण रोखण्यास मदत करते आणि यामध्ये नैसर्गिक चिकटपणा असतो. योनी हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. त्यामुळे याची काळजी घेणे आणि व्हजायन स्वच्छ ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. पण याची काळजी घेताना आपण बरेचदा चुकीच्या गोष्टींचा वापर करतो आणि त्यामुळे नुकसान होते. आम्ही तुम्हाला याबाबतीत माहिती देत आहोत. 

सुगंधित वॉशचा वापर करू नका 

व्हजायनच्या स्वच्छतेसाठी काही महिला सुगंधित वॉश अथवा साबण वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? अशा सुगंधित गोष्टींचा वापर केल्यामुळे व्हजायनाचा पीएच बॅलेन्स बिघडू शकतो. व्हजायना स्वतःचा आपली स्वच्छता करत असते आणि सुगंधित वॉशमधील केमिकल्सचा वापर या सामान्य क्रियेमध्ये बाधा आणण्याचे काम करते. त्यामुळे नैसर्गिक गंध दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साबणाची अथवा सुगंधित वॉशची गरज नाही. पण तुम्हाला व्हजायनामध्ये खाज येणे अथवा व्हजायनातून डिस्जार्च होणे असा त्रास असेल तर तुम्ही त्रिफला वॉश सारख्या चांगल्या पर्यायाचा वापर करू शकता. 

असुरक्षित सेक्शुअल रिलेशनशिप

सीमेन जर व्हजायनामध्ये सेक्स करताना गेले तर व्हजायनाच्या पीएच संतुलनावर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही जर बॅक्टेरियल वेजिनोसिसने ग्रस्त असाल तर सेक्स करताना नेहमी कंडोमचा वापर करा. असुरक्षित सेक्समुळे व्हजायन निरोगी ठेवणे कठीण होते. सेक्स करताना यामुळेच व्हजायना दुखू शकते.

शुगरी ड्रिंक्स आणि खाणे

sweets

तुम्हाला याबाबत माहिती नसेल की, साखरेचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे यीस्टची वाढ अधिक प्रमाणात होऊ शकते. हो साखरेच्या सेवनामुळे यीस्ट इन्फेक्शनचे बॅक्टेरिया अधिक प्रमाणात वातावरण तयार करतात. त्यामुळे व्हजायना निरोगी राखण्यासाठी तुम्ही खूपच साखर अथवा गोड पदार्थ खात असाल तर वेळेवर कमी करा. संतुलित, पौष्टिक आहार करणे आणि जास्त प्रमाणात लिक्विड सेवन करणे हे व्हजायनाच्या आरोग्याची काळजी घेण्यास उपयुक्त ठरते. 

ADVERTISEMENT

अँटिबायोटिक्स 

after antibiotics add these food in your diet

तुम्ही वापरत असलेला साबण असो अथवा तुम्ही सेवन करत असणारे अन्न असो या सर्वाचा व्हजायनाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. इतकंच नाही तर घेण्यात येणाऱ्या औषधांचाही व्हजायनावर परिणाम होतो. विशेषतः अँटिबायोटिक्स आणि बर्थ कंट्रोल पिल्स. 

संडासला अथवा लघ्वीला जाऊन आल्यानंतर व्हजायनल बॅक्टेरियापासून वाचवायचे असेल अथवा ब्लॅडरच्या संक्रमणापासून रोखायचे असेल तर तुम्ही नियमितपणे व्हजायना स्वच्छ पुसून घ्या. मासिक पाळीच्या दरम्यान नियमित स्वरूपात सॅनिटरी पॅड आणि टॅम्पॉन बदला. नॉर्मल व्हजायनल स्राव शोषून घेण्यासाठी तुम्ही नियमित पँटीलायनर बदल असाल तर योग्य आहे. यामुळे व्हजायन निरोगी राहते. जळजळ होत नाही. खाज येत नाही. 

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की आम्हाला कळवा. व्हजायनच्या आरोग्याच्या काळजी वेळोवेळी घेणे खूपच गरजेचे आहे हे लक्षात ठेवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT