सारा अली खान ही सध्याच्या तरूण सेलिब्रेटीजमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सारा सोशल मीडियावरदेखील सतत अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सतत तिच्याबद्दल जाणून घ्यायला आवडत असतं. नुकताच तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लहानगी सारा महानायक अमिताभ बच्चन यांना ‘आदाब’ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ केबीसीच्या शोमधील असून त्यामध्ये ती तिचे वडील बॉलीवूड स्टार सैफ अली खान यांच्यासोबत आली तेव्हाचा आहे. चौदा वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि प्रिती झिंटा केबीसीच्या शो मध्ये त्यांच्या सलाम नमस्ते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या दुसऱ्या पर्वातील हा शो आहे.
अभिनेता सैफ आणि अभिनेत्री प्रिती या शोमध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाले होते त्यावेळी सारा तिच्या वडिलांसोबत त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी या शोमध्ये आली होती. लहानगी सारा त्यावेळी तिची मैत्रिण पशमिना हिच्यासह या शोमध्ये गेली होती. साराची ओळख करून देताना अमिताभ बच्चन यांनी क्युट साराला “तू मला आदाब नाही का करणार?” असं विचारलं त्यावेळी साराने अगदी निरागसपणे बिग बी यांना ‘आदाब’ केला होता. सारा अली खानचा क्युट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सारावर खूप चांगले संस्कार लहानपणापासूनच झाले आहेत हेच या व्हिडिओमधून दिसत आहे. कारण आजही सारा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना अतिशय नम्रपणे वागताना दिसते. एक सेलिब्रेटी म्हणून जेव्हा तिचे चाहते तिच्याशी संवाद साधतात अथवा तिचे फोटो घेतात तेव्हा सारा त्यांना नमस्कार करून अगदी अदबीने बोलते. तिचं सेलिब्रेटी असतानाही असं अगदी नम्रपणे वागण्याचं कारण या व्हिडिओमधून दिसत येतं.
सारा अली खानचे लहानपणीचे आणखी काही क्युट फोटो
सैफ अली खानसोबत मस्ती करताना…
सारामध्ये दिसते आई अमृताची झलक
वडिलांची लाडकी सारा अली खान
लाडका भाऊ इब्राहिमसोबत
करिनासोबतही साराचे चांगले संबध
लवकरच झळकणार ‘लव आज कल 2’ मध्ये
‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सारा अली खानला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केदारनाथ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तर सिम्बामधील अभिनय कौशल्यामुळे ती लोकप्रिय झाली. कमी वयात आणि इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर लगेच तिला चांगलं यश मिळालं. दोन वेगळ्या प्रोजेक्टवर काम करून आपण बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करायला आलो आहोत हे तिने दाखवून दिलं आहे. पण असं असतानाही रणवीर सिंह आणि सुशांत सिंह राजपूतच्या अनेक मुली चाहत्या असताना साराला मात्र अन्य कोणत्या अभिनेत्याची ओढ लागून राहिली होती. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांसमोरच करण जोहरच्या शो मध्ये कबूल केली होती. तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं होतं. तिचं स्वप्न आता पूर्ण होत असल्याचं दिसत आहे. इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ मध्ये कार्तिक आणि सारा ही जोडी काम करत आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटामध्ये सारा आणि कार्तिकने एकमेकांबरोबर लिप लॉक केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम