ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
balala-dudh-yenyasathi-upay-in-marathi

बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय | Balala Dudh Yenyasathi Upay Marathi

प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणा आणि आई होणे याचे वेगळेच महत्त्व असते. 9 महिने बाळाला आपल्या उदरात वाढवून त्याला जन्म देणे हा एक वेगळाच आनंद असतो. आई झाल्यानंतर आपल्या बाळाला पुरेसे दूध मिळत आहे की नाही अथवा त्याचे पोट भरत आहे की नाही? याची चिंता असते. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची तब्बेत अधिक नाजूक असते आणि त्याला दूध देण्याची जबाबदारी ही त्याच्या आईची असते.

ही बाब अत्यंत संवेदनशील आहे. पण काही जणींना दूध आधीपासूनच येत नाही तर काही जणींना बाळाला दूध येण्यासाठी उपाय (Balala Dudh Yenyasathi Upay) करावे लागतात. नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे काय महत्त्व आहे, बाळाला दूध येण्यासाठी काय खावे (Aaila Dudh Yenyasathi Upay Marathi) याबाबत आपण जाणून घेऊया. तसंच बाळाला दूध अधिक मिळण्यासाठी दूध कसे वाढवावे (How To Increase Breast Milk In Marathi) यासाठीही काही उपाय तुम्ही जाणून घेऊया.  

दूध कमी येणे म्हणजे काय? – What Is Breast Milk Depletion In Marathi

प्रसूतीनंतर नवजात बाळासाठी आईचे दूध हे सर्वात महत्त्वाचे असते. जन्मानंतर पुढील सहा महिने बाळ आईच्या दुधावर अवलंबून असते. काही स्त्रियांना खूप कमी दूध (स्तनाचे दूध) मिळते, तर काहींना दूध अजिबात बनत नाही. अशा परिस्थितीत दूध चांगले आणि पुरेशा प्रमाणात तयार व्हावे म्हणून काय करावे? यासाठी तुम्ही कोणतेही औषध घेऊ नये. तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही आईचे दूध वाढवू शकता.

बाळाचा जन्म झाल्यानंतर बऱ्याच महिलांना अर्थात नवजात बाळांच्या आईला दूध कमी कमी येत असल्याची समस्या येऊ शकता. बाळाची गरज भागू शकेल इतके दूध आईला येत नसेल तर आईला दूध कमी येते आहे असे मानण्यात येते. दुधाचा पुरवठा बाळाला कमी होतोय हे नक्की कसे ओळखता येईल, हे प्रत्येक नवजात आईला माहीत असायला हवे. 

ADVERTISEMENT

दुधाचा पुरवठा बाळाला कमी होतोय हे कसे ओळखावे?

बऱ्याचदा महिलांना या सर्व गोष्टी नवीन असल्या कारणाने समजत नाही कि स्तनपान म्हणजेच बाळाला दुधाचा पुरवठा योग्य रित्या होतोय कि नाही (How To Increase Breast Milk Supply In Marathi), किंवा आपल्या स्तनांमध्ये दूध पुरेसे बनत आहे कि नाही? परंतु या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे कारण बाळाला जर दूध पुरवठा कमी झाला तर त्याच्या सुरवातीच्या काळातील पोषण अपूर्ण राहील जे फार हानिकारक आहे.

दुधाचा पुरवठा बाळाला कमी होतोय हे ओळखण्यासाठी पुढील गोष्टीकडे लक्ष द्या –

  1. स्तनाग्रामधून दूध गळत नाही याचा अर्थ दुधाचा पुरवठा बाळाला कमी होतो आहे 
  2. तसंच स्तनांमध्ये दूध भरलेले आहे हे आईला कळून येते. पण स्तनांमध्ये दूध कमी भरले आहे हे कळून येते 
  3. बाळाचे पोट न भरल्यास, बाळ सतत रडत राहाते. त्यामुळे बाळाला दुधाचा पुरवठा कमी झाला आहे हे कळून येते 
  4. तसंच नियमित स्तनपानाचा कालावधी कमी होतो. त्यामुळे बाळाला दुधाचा पुरवठा नीट होत नाही
  5. बाळाला जर दिवसातून 5-6 वेळा शी होत असेल आणि पातळ शी होत असेल तर बाळाला दूध कमी मिळत आहे असे समजावे 
  6. तसंच बाळाला साधारणतः दिवसातून 8-10 वेळा लघ्वीला होते. पण याचे प्रमाण कमी झाले तर बाळाला पुरेसे दूध मिळत नाही असे समजावे
  7. याशिवाय बाळाचे वजन वाढत नाही आणि बाळ बारीक होऊ लागते. बाळाला पुरेसे दूध मिळत नसल्यास, बाळाचे वजन वाढत नाही

बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय (How To Increase Breast Milk After Delivery In Marathi) तुम्हाला माहीत असायला हवेत. 

बाळाला दूध येण्यासाठी काय खावे – Balala Dudh Yenyasathi Upay 

Balala Dudh Yenyasathi Upay Marathi
Balala Dudh Yenyasathi Upay Marathi

आपण जसे गरोदरपणात काय खावे? या बद्दल बाळंतीण बाईने बाळाला दूध येण्यासाठी काय खावे? या कडे लक्ष दिले पाहिजे. बाळाला दूध येण्यासाठी काय खावे? हे खूप महत्त्वाचे आहे. कारण बाळ साधारण सहा महिने हे आईच्या दुधावरच असते. दूध हा बाळाचा मुख्य आहार असतो. त्यामुळे बाळाचे पोट भरण्याइतके पोट भरावे असे अन्न आईच्या पोटात जायला हवे. (How To Increase Breast Milk Naturally At Home In Marathi).  

ADVERTISEMENT

मेथी

Balala Dudh Yenyasathi Upay
मेथी – Balala Dudh Yenyasathi Upay

मेथी ही नवजात आईसाठी उत्तम ठरते. स्तनपान वाढविण्यासाठी (How To Increase Breast Milk Naturally At Home In Marathi) अर्थात आईला दूध येण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही तुमच्या आहारात मेथीचा उपयोग करून घेऊ शकता.

अंगावरचे दूध वाढविण्यासाठी मेथी हा उत्तम पदार्थ मानला जातो. मात्र याचे प्रमाण योग्य असायला हवे. कारण मेथी ही रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी करते. त्यामुळे पोट बिघडण्याचीदेखील शक्यता असते. गरोदरपणानंतर या गोष्टींची काळजी घेत योग्य प्रमाणा तुम्ही मेथीचा वापर करावा. रोज सकाळी मेथीचे पाणी एक ग्लास प्यायल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. मोड आलेले मेथीचे दाणे हे यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. चवीला हे कडवट असेल तरीही स्तनातील दूध वाढण्यास यामुळे मदत होते. 

जिरे

balala dudh yenyasathi upay
Balala Dudh Yenyasathi Upay

जिरेदेखील दूध वाढविण्यासाठी नवजात आईला उपयोगी ठरते. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने आईच्या स्तनाग्रातील दूध वाढण्यास मदत होते आणि बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय म्हणून हा सोपा उपाय आहे. मात्र याचेही प्रमाण तुम्हाला माहीत असायला हवे. जिऱ्यामध्ये लोह आणि आवश्यक मिनरल्स आढळतात. त्याचा फायदा स्तनपान देणाऱ्या महिलांना होतो. याशिवाय जिऱ्यामुळे पोट साफ राहते आणि पचनही सुधारते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांना बाळाला दूध देताना काही त्रास होत नाही. आईला गॅस्ट्रिक त्रास असतील तर दूध पिणाऱ्या बाळालाही असे त्रास होतात. त्यामुळे जिऱ्याचे सेवन यासाठी चांगले मानण्यात येते. 

  • एक चमचा जिरेपूड आणि साखर मिक्स करा आणि हे मिश्रण गरम दुधात मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी प्या 
  • जिरे भाजा आणि त्याची पूड करून घ्या. ही पूड तुम्ही आमटी, डाळ अथवा कढी, रस्सा भाजीमध्ये वापरा आणि खा
  • ताक, रायते यामध्ये जिऱ्याची पूड घाला आणि खा. बाळासाठी दूध येण्यासाठी (How To Increase Breast Milk Supply In Marathi) याचा चांगला फायदा होतो

शतावरी – बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय

शतावरी ही औषधी वनस्पती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याचे आयुर्वेदिक औषधही अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. शतावरी हे बाळाला दूध पाजणाऱ्या आईसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय तुम्ही शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात शतावरीचा समावेश करून घ्यायला हवा. याचा हमखास फायदा होतो. 

ADVERTISEMENT
  • पाव चमचा शतावरी पावडर एक ग्लास दुधामध्ये मिक्स करा अथवा मधासह पाव चमचा शतावरी पावडर मिक्स करा आणि दिवसातून दोन वेळा स्तनपान करणाऱ्या आईने याचे सेवन करा. स्वतःच्या मनाने याचे सेवन करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याचा वापर करा

फ्रेंच लिलिअॅक 

फ्रेंच लिलिएक ही एक वनस्पती आहे आणि स्तनांमधील दूध तयार करणाऱ्या ग्रंथीवर याचा परिणाम होतो आणि दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. तसंच दुधाचा प्रवाह सुधारण्यासाठीही मदत मिळते. ज्या महिलांमध्ये बाळाला जन्म दिल्यापासूनच दूध कमी येण्याची तक्रार आहे त्यांनी याचा फायदा करून घ्यावा. याच्यामुळे 50% दुधाचे प्रमाण वाढते आणि बाळाला दूध मिळते. त्यामुळे तुम्ही बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय करत असाल तर याचा उपयोग करून घ्यावा

बडीशेप

बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय
बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी बडिशेप ही उत्तम औषध ठरते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोड बडिशेप खावी. दूध कमी येत असेल अथवा बाळाला दुधाचा पुरवठा नीट होत नसेल आणि बाळ उपाशी राहतंय असं वाटत असेल तर तुम्ही बडिशेप खाणं फायद्याचं ठरतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बडिशेप घालून चहादेखील घेऊ शकता. जेवणानंतर दोन्ही वेळा तुम्ही एक एक चमचा बडिशेप खावी अथवा तुम्ही बडिशेप रात्री पाण्यात भिजवून ठेवली आणि रोज सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायलात तरीही याचा फायदा स्तनाच्या ग्रंथीतील दूध वाढण्यासाठी होतो. 

निरगुडी

पूर्वपारपासून दूध वाढविण्यासाठी हा पाला उपयोगी ठरत आला आहे. बाळासाठी दूध येत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात निरगुडी या पाल्याचा समावेश करून घ्या. ज्या महिलांमध्ये संप्रेरकाचे असंतुलन आहे, त्या महिलांना हा पाला उपयोगी ठरतो. पण एकच लक्षात ठेवायला हवे की या पाल्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांची पाळी लवकर सुरू होऊ शकते. त्यामुळे याकडे नीट लक्ष ठेवा आणि त्यानुसारच याचे सेवन करा. 

अल्फाल्फा 

अल्फाल्फामधील जीवनसत्वे आणि खनिजद्रव्यांमुळे स्तनातील दूध वाढण्याचे प्रमाण वाढते. तसंच यातील जीवनसत्वामुळे रक्तस्राव थांबायलाही मदत मिळते. ज्या महिलांना मुळातच दूध येत नसेल त्यांनी नक्की याचा फायदा करून घ्यावा. बऱ्याचदा ही वनस्पती प्रसूतीच्या आधी 6 आठवडे रक्तस्राव टाळण्यासाठी आणि प्रसूतीनंतर काही महिने आईला दूध भरपूर यावे यासाठी देण्यात येते. मात्र याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

ADVERTISEMENT

ओवा

बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय
balala dudh yenyasathi upay

ओवा हा नेहमीच पोटासाठी चांगला ठरतो. ओव्याने बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय म्हणून फायदा होतो. मात्र याचा यकृतावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ओवा नेहमी प्रमाणात घ्यावा. अधिक काळ स्तनपानासाठी याचा उपयोग करून घेऊ नये. तसंच याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि मगच याचा वापर करावा. ओव्याचा स्तनामध्ये दूध वाढविण्यासाठी फायदा होतो. मात्र त्याचे योग्य प्रमाण माहीत असायला हवे. इतकंच नाही तर बाळाची शी होण्यासाठीही याची मदत होते.

लसूण

बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय
balala dudh yenyasathi upay

बाळाला दुधाचा पुरेसा पुरवठा होत नसेल तर स्तनपान देणाऱ्या महिलांनी आपल्या आहारामध्ये लसणीचा समावेश करून घ्यावा. लसणाचे अनेक फायदे आहेत. लसूण स्तनातील दूध वाढविण्यासाठी एक प्रेरक म्हणून काम करते. तसंच एका संशोधनानुसार लसूण खाल्लेल्या महिलांनी आपल्या बाळांना अधिक काळ स्तनपान केले आहे. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही लसणाचा समावेश करून घ्यावा. जेणेकरून स्तनातील ग्रंथींमध्ये दूध वाढण्यास मदत मिळेल. 

कच्ची पपई

बाळासाठी दूध येण्यासाठी घरगुती उपाय
balala dudh yenyasathi upay

पपईचे त्वचेसाठी होणारे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. मात्र कच्ची पपई खाण्यामुळे स्तनातील दूध वाढण्यास मदत होते. कच्च्या पपईच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऑक्सिटॉसिनचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे स्तनातील दूध वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे नवजात बाळाच्या आईने कच्च्या पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते. 

अंगावरील दुधाचे प्रमाण कसे वाढवावे? | How To Increase Breast Milk In Marathi

how to increase breast milk in marathi
अंगावरील दुधाचे प्रमाण कसे वाढवावे? | how to increase breast milk in marathi

अंगावरील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा अधिक प्रमाणात समावेश करून घ्यायला हवा. तसंच प्रसूतीनंतर काय काळजी घ्यायची याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा. याशिवाय काही महत्त्वाच्या टिप्स 

ADVERTISEMENT
  • एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये साधारणतः 4 ग्रॅम इतके फायबर असते. त्यामुळे बाळाची भूक भागविण्यासाठी आणि अंगावरील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी याचा उपयोग करून घ्या 
  • तुळशीची पाने ही अँटिऑक्सिडंटयुक्त असतात. तुळशीच्या पानामधील शीतलता ही अंगावरील दूध वाढविण्यासह बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही उपयोगी ठरते. त्यामुळे गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी स्तनपान देणाऱ्या महिलांनी रोज प्यावे. या पाण्यामुळे स्तनातील दूध वाढण्यास मदत मिळते 
  • अंगावरील दूध वाढविण्यासाठी पालक या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्या. पालकामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. तसंच यामध्ये कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिड खूप असतात. पालकाच्या नियमित सेवनाने दूध वाढण्यास फायदा होतो
  • तूप, दूध आणि लोण्याचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. आईने भरपूर खा
  • अंगावरील दूध वाढविण्यासाठी आळीवाची खीर, अळीवाचा शिरा या पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करून घ्या. पूर्वपरंपरेने याचा उपयोग करण्यात येत आहे
  • आहारामध्ये पालेभाज्या आणि कडधान्यांचा अधिक वापर करावा 
  • बदाम आणि खारीकदेखील खावी. नुसते आवडत नसतील तर याची पावडर करून दुधातून खावे
  • डाळिंब, सफरचंद आणि टरबूज या फळांचा स्तनदा मातांनी आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा

डॉक्टरांना केव्हा दाखवावे आणि औषधं – When To Visit Doctor

आम्ही तुम्हाला वर सांगितलेले उपाय करूनही जर तुम्हाला फरक वाटत नसेल. दुधामध्ये वाढ होत नसेल अथवा बाळ उपाशी राहात असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे. बाळाला दूध व्यवस्थित पुरत नाही असं वाटत असेल तर बाळाला घेऊनच तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कॅल्शियम, विटामिन्स आणि लोह वाढविण्याच्या गोळ्या खाव्यात. योग्य औषधोपचार करून तुम्ही बाळाला दूध वाढविण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. औषधांचा डोस आणि योग्य एकत्रीकरण याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण तुम्ही केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या बाळासाठी ही औषधे घेणार आहात हे नेहमी लक्षात ठेवा. बाळ हे केवळ तुमच्या दुधावर सहा महिने राहणार असते. त्यामुळे पोटात काय जात आहे याची काळजी घ्यायला हवी. 

बाळासाठी दूध येण्यासाठी उपाय – प्रश्नोत्तरे (FAQs)

1. पाणी कमी प्यायल्यामुळे दूध कमी होते का?
– हो स्तनदा मातांनी जर दिवसभरात पाणी कमी प्यायले तर त्याचा परिणाम येणाऱ्या दुधावर होतो. यासाठी तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाण सांभाळणे गरजेचे आहे. आहारामध्ये सूप, वरण भात, पातळ भाजी, रस्सा भाजी याचा समावेश करून घ्या. तसंच नियमित आपण किती पाणी पित आहोत याकडे लक्ष द्या. 

2. दूध वाढविण्यासाठी ओटमीलचा उपयोग होतो का?
हो बाळाला दूध येण्यासाठी उपाय करत असाल (balala dudh yenyasathi upay) तर ओट्स उपयुक्त ठरतात. ब्रेस्ट मिल्क वाढविण्यासाठी तुम्ही रोज आपल्या नाश्त्यामध्ये ओटमीलचा समावेश करून घेऊ शकता. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर आढळते. तसंच हे तणावापासून तुम्हाला दूर राखते आणि तुम्ही चांगल्या मूडमध्ये आपल्या बाळाला दूध पाजू शकता. 

3. बाळाला पुरेसे दूध येत नाही असं कधी समजावे?
2-3 तासाने बाळाला साधारण दूध लागते. अशावेळी तुम्ही बाळाला दर दोन ते तीन तासाने व्यवस्थित दूध पाजू शकत असाल तर तुम्हाला पुरेसे दूध येत आहे हे सिद्ध होते. मात्र तसं होत नसेल तर मात्र बाळाला पुरेसे दूध येत नाही असं समजावे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

22 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT