ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
बॅकलेस ब्लाऊज घातल्यानंतर पाठ सुंदर दिसायची असेल तर करा सोपा व्यायाम

बॅकलेस ब्लाऊज घातल्यानंतर पाठ सुंदर दिसायची असेल तर करा सोपा व्यायाम

मोठ्या गळ्यांचे ब्लाऊज घालायला खूप जणांना आवडतात. असे ब्लाऊज दिसायला खूपच आकर्षक असतात. पण हे ब्लाऊज घालताना तुमची पाठही तितकीच आकर्षक असणे गरजेचे असते. आता तुम्हाला वाटेल पाठ आकर्षक असणे म्हणजे त्याचा रंग उजळ असणे असे अजिबात नाही किंवा तुम्ही बारीक असणे अजिबात नाही. काही जणांना अगदी कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज घातला तरी त्यांची पाठ एकदम छान उठून दिसते. याचे कारण काहींची पाठ ही मुळातच तर काहींची व्यायामामुळे सुंदर होते. अनेकदा मॉडेल्स आणि इन्स्टाग्रामवरील काही फोटो तुम्ही चाळले असतील तर तुम्हाला अशी सुंदर पाठ म्हणजे काय याचा अंदाज येईल. तुम्हीही थोडा व्यायाम केला तर अशी आकर्षक पाठ तुम्हालाही मिळवता येऊ शकते. त्यासाठी सोपे असे व्यायामप्रकार कोणते ते जाणून घेऊया.

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

श्रग (shrug)

खांंद्यासाठी केला जाणाऱ्या या व्यायामप्रकारामध्ये खांद्याच्या वरच्या बाजूला मागे चांगला ताण पडतो.  हा व्यायाम करण्यासाठी हातात 1.5 ते 2 किलोचे डंबेल्स घ्या. हात मांडयांकडे समांतर ठेवून दोन्ही खांदे एकत्र उचला. खांदे उचलल्यानंतर तुम्हाला ते काही सेकंदासाठी तसेच पकडून ठेवायचे आहेत. असे केल्यामुळे तुमच्या खांद्याना योग्य आकार मिळेल. हा व्यायाम खास खांद्यासाठी केला जातो. सुरुवातीला तुम्ही 10 चा सेट करा त्यानंतर तुम्ही तो वाढवत नेला तरी चालेल. शिवाय तुम्ही वजन वाढवले तरी चालू शकेल. 

ओव्हर हेड प्रेस (Over Head Press)

खांद्यासाठी आणि त्याच्यावरील भागासाठी उत्तम असा व्यायाम. या व्यायामामुळे पाठ आकर्षक दिसते. दोन्ही हात हवेत वर उंचवा. हातात मोठे डंबेल्स घेऊ नका.आता व्यायाम करताना सुरु करायचे हात खांद्याच्या दिशेने बरोबर खाली आणा. असे करताना तुमच्या कोपरे हे पुढे किंवा मागे जाता कामा नये. तो हात अगदी  खांद्याला समांतर असायला हवा असे केल्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने शरीरावर ताण घेता येईल  सुरुवातीला कमीत कमी वजन घेऊन याची सुरुवात करा. नंतर वजन जास्त घेतले तरी चालेल.

ADVERTISEMENT

 

पुशअप्स ( Pushups)

पुशअप्स हा सर्वांगसुंदर असा व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्हाला अगदी कोणत्याही मदतीसशिवाय करता येतो. पुशअप्स व्यायाम हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. तुम्ही पुशअप्स अगदी तुम्हाला कधीही करता येतो. पोटावर झोपून हात छातीच्या दोन्ही बाजूला ठेवा. त्यानंतर हातावर शरीराचे वजन घेऊन हात पाठीच्या दिशेने मागे ओढत खाली जा. असे तुम्ही सुरुवातीला 10 करा मग त्यानंतर तुम्ही वाढवता जात त्यामुळे तुमच्या पाठीवर आणि थोडासा लोव्हर बॅकवर प्रेशर येईल.

स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी ब्रेस्ट कन्झर्विंग शस्त्रक्रिया पर्याय

व्यायाम करताना

व्यायाम करताना काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात. पाठीचा व्यायाम करताना जर तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्ही व्यायाम करणे टाळा. व्यायाम केल्यानंतर काही काळासाठी त्रास होत असेल तर ठीक पण जर तुम्हाला सतत पाठ दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही काही व्यायाम ट्रेनरच्या मदतीशिवाय करु नका.

ADVERTISEMENT

आता पाठीचे हे व्याायमप्रकार करुन तुम्ही पाठीचा आकार आकर्षक करा.

फ्लॅट चप्पलही ठरु शकते पाय दुखीचे कारण, जाणून घ्या

14 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT