ADVERTISEMENT
home / आरोग्य
your-guide-to-use-menstrual-cups-while-traveling-in-marathi

मेन्स्ट्रूअल कपचा वापर प्रवासात कसा करावा

आजही प्रवासाच्या वेळी मासिक पाळी (Menstrual Cycle) चालू झाल्यावर अवघडल्यासारखं होतं. हा प्रत्येक महिलेचा अनुभव आहे. मासिक पाळीच्या दिवसात तुम्ही जर प्रवास करणार असाल तर तुम्ही मेन्स्ट्रूअल कपचा वापर करून बघायला काहीच हरकत नाही. अजूनही मेन्स्ट्रूअल कपविषयी (Menstrual Cup) अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत आणि याचा वापर नक्की कसा करायचा अथवा प्रवास करताना याचा काही त्रास तर होणार नाही ना? गाडीचे धक्के लागून कप निघणार तर नाही ना? अथवा प्रवास करताना कपड्यांना रक्त तर लागणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून राहतात. मात्र मेन्स्ट्रूअल कप वापरणे प्रवास करताना (Your Guide To Use Menstrual Cups While Traveling) अधिक सोपे आणि चांगला पर्याय आहे. याबाबत अधिक माहिती आम्ही या लेखातून तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला तुमच्या हायजिनची काळजी या काळात अधिक घ्यावी लागते त्यामुळे तुम्ही सिरोनाचे लिकेजप्रूफ आणि इको – फ्रेंडली मेन्स्ट्रूअल कप (Sirona Leakage Proof and Eco Friendly Menstrual Cup) वापरू शकता. याचा कसा वापर करायचा याबाबत घ्या जाणून. 

प्रवास करताना कसा करावा वापर (How to Use Menstrual Cup While Travelling)

मुळात आपल्याला प्रवासात जास्त काळ बसावे लागते आणि अशावेळी पॅडचा वापर केल्यास, रॅश येण्याचा अथवा सतत बदलण्याचाही त्रास सहन करावा लागतो. मग अशावेळी मेन्स्ट्रूअप कप हा उत्तम पर्याय आहे. प्रवास करताना तुम्हाला बिनधास्त राहायचे असेल तर तुम्ही याचा वापर नक्कीच करून पाहायला हवा. 

  • मेन्स्ट्रूअल कपचे वेगवेगळे आकार असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या योनीची अर्थात व्हजायनाचा (Vagina) आकार माहीत असायला हवा 
  • तुम्हाला हायजीनबाबत दक्षता बाळगायला हवी त्यामुळे तुम्ही सिरोनाच्या कोणत्याही मेन्स्ट्रूअल कपचा वापर अगदी डोळे झाकून करू शकता 
  • याचा वापर करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले प्रवासाला निघण्याआधी हात धुवा आणि कप फोल्ड करून अर्धा करा आणि हाच आकार ठेऊन तुम्ही व्हजायनाच्या आत घालण्यासाठी हात वर करा 
  • हळूहळू तुम्ही योनीमध्ये हा कप घाला जोपर्यंत हा कप पूर्ण आत जात नाही तोपर्यंत हळूहळू सरकवा
  • कप घातल्यानंतर थोडासा फिरवा आणि योनीच्या आतमध्ये एअरटाईल सील झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या 
  • सुरूवातील तुम्हाला याचा वापर कदाचित नीट जमणार नाही. मात्र सवयीने तुम्हाला याचा वापर करता येतो आणि प्रवासात गाडीचे कितीही धक्के लागले तरीही याचा त्रास तुम्हाला होत नाही 

प्रवास करताना का वापरावा मेन्स्ट्रूअल कप 

  • बॅगेमध्ये पॅडच्या आकाराने अधिक जागा व्यापली जाते. मात्र या कप्सचा वापर प्रवासात तुमच्या बॅगमधील जागा अधिक वाचविण्यास मदत करतो. पॅड अथवा टॅम्पॉन्सपेक्षा कमी जागेमध्ये तुमच्या या कप्सचा समावेश होतो
  • कोणत्याही ठिकाणी जाताना महिलांना पॅड्सचे पाकिट दिसेल की नाही याची भीती मनात असते. काही महिला बिनधास्त असतात, पण ज्यांना अजूनही तितका बिनधास्तपणा आलेला नाही, त्यांच्यासाठी हे अगदी खासगीरित्या पाकिटातून नेता येऊ शकते 
  • मेन्स्ट्रूअल कप्स हे पर्यावरणासाठी पूरक असून याची पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. अर्थातच हे इको-फ्रेंडली असल्यामुळे प्रवासात कुठेही फेकण्याची गरज भासत नाही आणि तुम्ही याचा पुनर्वापर करू शकता 
  • साधारण 12 तास तुम्ही मेन्स्ट्रूअल कप्सचा वापर करू शकता. त्यामुळे प्रवासात तुम्हाला सतत पॅड बदलण्याचा अथवा डोक्यात एकाच गोष्टीचा विचार करत राहण्याची गरज भासत नाही
  • प्रवास करताना मासिक पाळी चालू असताना येणारा एक दुर्गंध राहात नाही. मेन्स्ट्रूअल कप वापरल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत नाही. मेन्स्ट्रूअल कपमधून एकदा तुम्ही टॉयलेटमध्ये रक्त फ्लश केल्यानंतर आणि हा कप स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला कोणताच अन्य त्रास राहात नाही 

प्रवासात करताना अनेकांना मेन्स्ट्रूअल कप्सचा चांगला अनुभव आला आहे. तुम्हीही सिरोनाचे उत्पादन वापरून पाहा आणि प्रवास करताना तुम्हाला काय अनुभव आला हे आमच्यासह नक्की शेअर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
14 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT