टॉवेल ही प्रत्येकाची रोजची गरज आहे हे नक्कीच नाकारता येणार नाही. पण बऱ्याच जणांना वॉशरूमधून आल्यानंतर टॉवेल कुठेही काढून ठेवायची सवय असते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो कुठेही असणारा टॉवेल पुन्हा तसाच वापरला जातो. पण मुलींनो, तुमच्या सौंदर्यासाठी असं करणं ठरू शकतं घातक. तुमच्या सौंदर्यासाठी टॉवेल स्वच्छ, जंतूमुक्त आणि मुलायम असणं अत्यंत गरजेचं आहे. एक स्वच्छ आणि मुलायम टॉवेल हा तुमचा दिवस अप्रतिम बनवू शकतो. तर तुम्ही जसं वागता त्याप्रमाणे तुम्ही केलेल्या टॉवेलचा वापर हा तुमचं सौंदर्य बिघडवू शकतो हे लक्षात घ्या. कदाचित तुमच्या हे लक्षातही येणार नाही. पण असं तुमच्या बाबतीत नक्कीच घडू शकतं. त्यामुळे टॉवेल नियमित वापरताना त्याची योग्य काळजी घेणं हे आपल्या हातात आहे.
1. पिंपल फ्री फेस
Shutterstock
तुमच्या चेहऱ्यावर अचानक जर एखादी पुळी अर्थात पिंपल्स दिसायला लागली तर त्याला प्रत्येकवेळी hormones जबाबदार असतात असं नाही. तर तुम्ही केलेल्या दुर्लक्षपणाचे हे परिणाम असतात. याचं कारण टॉवेलचा चुकीचा वापर हेदेखील असू शकतं. आंघोळ केल्यानंतर तुम्ही टॉवेल कसाही कुठेही फेकून देता. त्यामध्ये किटाणू जमा होतात. त्यामुळे नंतर टॉवेल व्यवस्थित सुकत नाही. टॉवेल जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तो अशा ठिकाणी सुकायला ठेवा ज्या जागेवर व्यवस्थित हवा येत असेल. तुमचा चेहरा योग्य राहावा वाटत असेल तर नेहमी आंघोळ झाल्यावर तुम्ही टॉवेल व्यवस्थित हँगरवर लावून ठेवा.
2. मूड खराब होतो
Shutterstock
एका चांगल्या हॉट शॉवर नंतर तुम्हाला नेहमी फ्रेश सुगंधी टॉवेल मिळाला तर तुमचा फ्रेशनेस दिवसभर टिकून राहातो. त्यासाठी तुमचा टॉवेल तुम्ही नियमित धुवायला हवा. कारण सुगंधी आणि स्वच्छ टॉवेल तुमचा मूड चांगला ठेवतो. तुमच्या मूडवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पण हेच जर टॉवेलला खराब वास येत असेल तर तुमचा मूड नक्कीच खराब होतो आणि मग दिवसभर चिडचिड होत राहाते. चांगल्या शॉवरच्या अनुभवासाठी आणि आनंदी मूडसाठी तुम्हाला नेहमी स्वच्छ आणि नीट टॉवेलची गरज भासते हे लक्षात ठेवा. आपण आनंदी असतो तेव्हाच आपला चेहरा अधिक सुंदर दिसतो हे नेहमी लक्षात ठेवा.
3. क्रिस्पी टॉवल !!
कोणालाही टोचणारा अर्थात क्रिस्पी अथवा रफ टॉवेल आवडतो का? तर नक्कीच नाही. पण तरीही तुम्ही अशा टॉवेलचा वापर करत असाल तर तुम्ही टॉवेल धुताना डिटर्जेंटचा वापर कमी करा. जास्त पावडर वापरल्याने टॉवेल जास्त साफ होत नाही तर अधिक कडक होतो. असा टॉवेल तुम्ही घाईघाईत वापरता आणि मग तुमच्या त्वचेवर त्यामुळे रॅशेस येतात. ज्यामुळे अंगावर जळजळ आणि इरिटेशन होते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
चेहरा धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का
4. कलरफुल आणि ब्राईट towel
Shutterstock
ज्याप्रमाणे टॉवेलला चांगला सुगंध येणं गरजेचं आहे तसंत आपला मूड चांगला राहण्यासाठी आपले टॉवेल अधिक कलरफुल आणि ब्राईट असणंही गरजेचं आहे. याचा चांगला परिणाम आपल्या मूडवरही होत असतो. Color effects theory नेहमीच आपल्याकडे चांगलं काम करते. त्यामुळे टॉवेलचा रंग नेहमी तसाच राहावा हे आवश्यक आहे. त्यामुळे टॉवेल पहिल्यांदाच धुणार असाल तेव्हा त्यामध्ये व्हिनेगर घालायला विसरू नका. तसंच manufacturer instructions देखील नीट वाचा.
5. कोमट पाणी
Luke warm water आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी चांगलं असतं. त्याचप्रमाणे ते टॉवेलसाठीही चांगलं असतं. कोमट पाण्यात टॉवेल भिजवून स्वच्छ केल्यास, यातील किटाणू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. पण याचा अर्थ तुम्ही जास्त गरम पाण्यात टॉवेल धुवू शकता असा होत नाही. कारण तसं केल्यास, टॉवेलचा मुलायमपणा आणि रंग निघून जातात. त्यामुळे याची काळजी घ्यावी.
6. चेहरा परत धुवा
Shutterstock
तुम्ही चुकूनही तुमच्या चेहऱ्यावर घाणेरडा टॉवेल वापरला असेल तर तुम्ही तुमचा चेहरा पुन्हा पाण्याने धुवा. अन्यथा तुमच्या चेहऱ्यावर खाज येणं अथवा पिंपल्स होणं असे प्रकार होतील. पण दुसऱ्यांदा चेहरा धुताना कोमट पाण्याने धुवा. कोणत्याही प्रकारचा साबण अथवा फेसवॉशचा वापर करू नका. कोमट पाण्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि पुन्हा फेसवॉश लावल्यास चेहरा कोरडा होण्याची शक्यता असते.
Pimple-free चेहरा मिळवण्यासाठी करा घरगुती उपचार
7. कॉटन टॉवेल always best
कॉटन हे नैसर्गिक फायबर आणि direct skin ला टच करणाऱ्या प्रत्येक फॅब्रिकसाठी हे बेस्ट आहे. त्यामुळे नेहमी वापरताना कॉटन टॉवेलच वापरला जाईल याची काळजी घ्या.
8. ड्रायरपासून दूर ठेवा
Shutterstock
शक्यतो टॉवेल ड्रायरपासून दूर ठेवा. हाताने टॉवेल धुवा आणि नैसर्गिकरित्या सुकू द्यावा. ड्रायरमध्ये टॉवेल सुकवल्यास, त्याचा मऊपणा कमी होतो आणि टॉवेल फ्लफी राहात नाही. towel fluffy राहतात तेव्हा अधिक चांगले दिसतात आणि त्यामुळे तुमचं सौंदर्यही टिकून राहातं. त्याचा कोरडेपणा तुमच्या चेहऱ्याला लागत नाही. टॉवेलचा मऊपणा हा तुमच्या चेहऱ्यासाठी जास्त फायदेशीर ठरतो.