सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावर डाग नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण कधी आरोग्यामुळे तर कधी सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कधी ना कधीतरी डाग पडतातच. अशा डागांमुळे तुमचा चेहरा खूपच काळसर दिसू लागतो. या अडचणींपासून सुटका हवी असल्यास, आम्ही तुम्हाला 10 घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा क्लीन आणि चमकदार होण्यास मदत होईल. जाणून घेऊया काही आहेत हे घरगुती उपाय -
थोड्याशा हळद पावडरमध्ये बेसन घाला आणि पाणी अथवा दूध घालून याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच सुकू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने हलक्या हाताने स्क्रब करत तुम्ही तुमचा चेहरा धुवा.
तुमच्या चेहऱ्यावर रोज सकाळी उठल्यानंतर मध लावा आणि तो सुकेपर्यंत वाट बघा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुऊन घ्या. चेहरा क्लीन दिसायला लागेल आणि तुमच्या चेहऱ्यावर असं केल्यामुळे चमकदेखील येईल. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्रीम अथवा इतर गोष्टींची आवश्यकता भासणार नाही.
काकडीचे पातळ स्लाईस करून घ्या. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून घ्या. असं केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग हळूहळू निघून जातील.
एक अथवा दोन चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये काही थेंब पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहेत तिथे ही पेस्ट लावा. 15 – 20 मिनिट्स ही पेस्ट अशीच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. दिवसातून दोन वेळा तुम्ही असं केल्यास, तुम्हाला लवकरच याचा चांगला परिणाम दिसून येईल.
चेहऱ्याच्या त्वचेसाठी कोरफड हा उत्कृष्ट उपाय आहे. याचं नैसर्गिक जेल चेहऱ्यावर साधारण 30 मिनिट्स लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
ओटमील पावडर आणि कॉर्नफ्लोर एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा. तुमचा चेहरा यामुळे चमकदार होईल.
बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पेस्टमुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा ही गोरी होते आणि डागापासूनदेखील सुटका होते.
अंड्याचा सफेद भाग हा चेहऱ्यावर लावला जातो. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन त्वचेचा रंग उजळवायलादेखील मदत होते.
कांद्याचा रस काढून तुम्ही तो चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा चमकू लागेल आणि रंगदेखील उजळेल. फक्त हा रस लावताना तुमच्या डोळ्याला त्रास तर होत नाही ना याची योग्य काळजी घ्या.
पपईचा लहानसा तुकडा घेऊन व्यवस्थित मॅश करा आणि चेहऱ्याला लावा. सुकू द्या. सुकल्यानंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगली चमक दिसेल.
फोटो सौजन्य - Shutterstock
हेदेखील वाचा
त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान
त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया
कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल