लग्नाचा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर वधुवरांची लग्नाच्या खरेदीसाठी लगबग सुरू असताना सध्या दिसत आहे. लग्नाच्या आऊटफिट, दागदागिन्यांसोबत वधुसाठी महत्त्वाचा असतो तिचा मेकअप… लग्नात ब्रायडल मेकअप करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट असतातच. पण लग्नाआधी आणि लग्नानंतरही असे अनेक विधी असतात जेव्हा वधुचा लुक अगदी परफेक्ट दिसणं गरजेचं असतं. यासाठीच अशा विधींना तयार होताना तुमच्याकडे ब्रायडल मेकअप प्रॉडक्ट असायलाच हवेत. जर तुम्ही सध्या तुमच्यासाठी असे मेकअप प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत आहात. तर त्याआधी ही माहिती अवश्य वाचा.
ब्रायडल मेकअप खरेदी करताना काय काळजी घ्यावी
मेकअप असो वा कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट ते न विचार करता घाईघाईत कधीच खरेदी करू नये. कारण प्रत्येक मेकअप अथवा कॉस्टमेटिक प्रत्येकीच्या त्वचेचा विचार करून तयार करण्यात आलेलं असतं. त्यामुळे अशा वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार अथवा त्वचेवर येत असलेल्या अॅलर्जीचे प्रकार आधीच माहीत असायला हवेत.
स्किन टाईपचा करा विचार
तुमचा स्किन टाईप कोणता आहे हे एकदा समजले की तुम्ही मेकअप प्रॉडक्ट खरेदी करण्यात कधीच चुकू शकत नाही. तुमची त्वचा कोरडी, तेलकट अथवा कॉम्बिनेशन, संवेदनशील कशी आहे ते आधी पाहून घ्या आणि त्यानुसार प्रॉडक्ट खरेदी करा. शिवाय तुमच्या त्वचेचा रंग जसा आहे त्यानुसार फाऊंडेशन, प्रायमर, कलर करेक्टर अथवा बीबी क्रिमची निवड करा. लिपस्टिक, आयशॅडो आणि ब्लशदेखील तुमच्या रंगानुसार योग्य शेडचे निवडा.
लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)
गुणवत्ता आहे महत्त्वाची
कधीच ओपन मार्केटमधले अथवा स्वस्त मिळत आहे म्हणून कोणतेही मेकअप प्रॉडक्ट खरेदी करू नका. कारण मेकअप करताना त्यात वापरण्यात आलेले घटक तुमच्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. खराब गुणवत्तेचे प्रॉडक्ट तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास चांगल्या ब्रॅंडचे मेकअपचे साहित्यच लग्नात खरेदी करा. कारण या क्षणी तुम्ही तुमच्या त्वचेची जास्त काळजी घ्यायला हवी.
लिपस्टिक लावण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)
टेस्टर्स वापरा
बऱ्याच लोकांना कॉस्टमेटिकच्या दुकानात गेल्यावर वापरलेले टेस्टर वापरून पाहणे आवडत नाही. मात्र जर तुम्ही टेस्टर वापरून पाहिले नाही तर तुम्हाला मेकअपची परफेक्ट शेड नक्कीच कळणार नाही. बऱ्याचदा टेस्टर न वापरण्यामुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. कारण काही शेड जशा बुकलेट अथवा स्क्रिनवर दिसतात तशा मुळीच नसतात. त्यामुळे टेस्टर वापण्याचा संकोच करू नका.
तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्या ‘या’ न्यूड लिपस्टिक (Best Nude Lipstick Shades)
प्रॉडक्टचे नाव आणि इतर माहिती लक्षात ठेवा
ब्रायडल मेकअप खरेदी करण्यासाठी कॉस्टमेटिकच्या दुकानात जाणं तिथे टेस्टर आणि सेल्स पर्सनच्या सल्ल्यानुसार मेकअपचं साहित्य खरेदी करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. मात्र जर तुम्हाला एखादं प्रॉडक्ट खूप आवडलं तर त्याचा कोड, नाव अथवा इतर माहिती नीट लक्षात ठेवा अथवा नोंद करून ठेवा. कारण लग्नानंतर तुम्ही ते प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करू शकता.