ADVERTISEMENT
home / Fitness
Benefits Of Chamomile Tea In Marathi

सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कॅमोमाईल टी (Benefits Of Chamomile Tea In Marathi)

आपण सर्वांनीच लेमन टी आणि ग्रीन टी ही नावं ऐकली आहेत आणि हे ट्रायदेखील करून पाहिलं आहे. त्याची सर्व माहिती अर्थात त्याचा फायदा आणि नुकसान याबद्दलदेखील आपल्याला माहिती असते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या आयुर्वेदाच्या खजिन्यामध्ये ग्रीन टी आणि लेमन टी शिवाय अजून एक टी अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे कॅमोमाईल टी. याचं वैशिष्ट्य हे आहे की, या कॅमोमाईल टी ही जगभरात अनेक ठिकाणी मिळते. यामध्ये निरोगी आणि इतर आजारांपासून वाचण्यासाठी यामध्ये अनेक गुण आढळतात. कॅमोमाईल टी तुमची त्वचा अधिक सुंदर करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, झोप नियंत्रित करण्यासाठी आणि मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या  त्रासापासूनदेखील वाचवण्यासाठी याची मदत होते. पण कोणत्याही गंभीर आजारावर अथवा गरोदर असताना दरम्यान याचा वापर करू नका. तुम्हाला नियमित स्वरूपात कॅमोमाईल टी प्यायचं असेल तर पहिले कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

कॅमोमाईल टी म्हणजे नक्की काय? (What is Chamomile Tea In Marathi)

Chamomile Tea In Marathi)

Chamomile Tea In Marathi)

ADVERTISEMENT

कॅमोमाईल फूल असतं आणि त्यापासून हे हर्बल टी बनवण्यात येतं. याचं कलम Asteraceae परिवारचा एक सदस्य आहे. या चहाचं नाव स्पॅनिश Manzanilla tea असं आहे. या फुलांचा वापर हर्बल आणि नैसर्गिक उपचारासाठी वापरण्यात येतो. जगभरात अनेक ठिकाणी या झाडाच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रजाती सापडतात. पण यातील पोषक तत्व मात्र समान असतात. यामुळे तुमच्या आरोग्याला चांगला फायदा होतो. जर्मन आणि रोममध्ये जे कॅमोमाईल टी सापडतं त्यामध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. याचा तुमच्या आरोग्यासाठी औषध म्हणून उपयोग करता येतो. यामध्ये नैसर्गिक स्वरूपात कॅफेन असतं. कॅमोमाईल चहामध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, फॉलेट आणि विटामिन ए याचं प्रमाण असतं. या पोषक तत्वांच्या उपस्थितीमुळे कॅमोमाईल चहाचे फायदे आरोग्यासाठी जास्त चांगले असतात. ग्रीन टी प्रमाणेच कॅमोमाईल टी चे देखील सॅशे तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत.

वाचा – Hibiscus Flower Information In Marathi

कॅमोमाईल टी चे पोषक तत्व (Nutritional Value of Chamomile Tea In Marathi)

Nutritional Value of Chamomile Tea In Marathi

ADVERTISEMENT

Nutritional Value of Chamomile Tea In Marathi

कॅमोमाईल टी मध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये अजिबात फॅट अर्थात चरबी नाही. तसंच कार्ब्सचं प्रमाणदेखील यामध्ये कमी प्रमाणात असतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पोटॅशियम, लोह आणि विटामिन ए चं देखील प्रमाण असतं. यातील पोषक तत्वामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होत असतात. तसंच तुम्ही अनेक आजारांंपासून दूर राहण्यासाठी या पोषक तत्वांचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही नियमित कॅमेमाईल टी पिणं योग्य ठरतं. पण हे टी पिण्याआधी तुम्ही तुमच्या शरीराला याचा योग्य फायदा मिळू शकेल की नाही याची आपल्या डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

वाचा – Khadi Sakhar Benefits In Marathi

ADVERTISEMENT

कॅमोमाईल चहाचे आरोग्याला लाभदायक फायदे (Health Benefits Of Chamomile Tea In Marathi)

कॅमोमाईल टी चे तुमच्या आरोग्यासाठी होणारे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेऊया- 

झोपेचा दर्जा सुधारण्यास होते मदत

Improve Sleep Quality In Marathi

Shutterstock

या टी मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या मेंदूला शांतता देण्यास मदत करतात. झोप अधिक येण्यासाठी याचा उपयोग होतो. एका अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की, तुम्ही जर दोन आठवडे नियमित कॅमोमाईल टी चं सेवन केलंत तर तुमच्या झोपेच्या दर्जामध्ये सुधारणा होते. तुम्ही रोज व्यवस्थित झोपू शकता. त्यामुळे तुम्ही झोपेच्या आधी काही वेळ हा चहा प्यायल्यास तुम्हाला अधिक फायदा होतो.

ADVERTISEMENT

आरोग्यासाठी आवश्यक असणारी पचनक्रिया सुधारते

आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती पचनक्रिया. अशावेळी तुम्ही अनेक उपाय करता. पण त्यासाठी तुम्हाला कॅमोमाईल टी हा पर्यायदेखील सोपा आणि चांगला आहे. पचनक्रिया योग्य नसेल तर रोज तुमची चिडचिड होत राहते. पोट साफ राहात नाही. पण अशावेळी नियमित कॅमोमाईल टी पिण्याने फायदा होतो. पोटातील गॅस कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच पोटातील अल्सरसाठीदेखील हे उपयोगी आहे. अल्सरसाठी त्रासदायक ठरणाऱ्या बॅक्टेरियासाठी कॅमोमाईल टी हे मारक ठरतं. 

कॅन्सरपासून करतं संरक्षण

सध्या कॅन्सर हा आजार बऱ्याच ठिकाणी फोफावत चालल्याचं दिसून येत आहे. पण कॅमोमाईल टी मधील असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरच्या पेशींशी लढा देणं सोपं जातं. काही प्रकारचे कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी याचा उपयोग होतो. यातील कमी प्रमाणात असलेल्या इन्फ्लेमेशनमुळे कॅन्सरला रोख लावण्यास अर्थात कॅन्सरपासून तुमच्या शरीराचं संरक्षण करण्यास सोपं होतं. पण याचं अतिसेवन करणं योग्य नाही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. 

रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण

Blood Sugar Control In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

आजकाल ही समस्या अगदी कमी वयातदेखील उद्भवलेली दिसून येते. आपली रोजची बदलती लाईफस्टाईल याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो आपल्या शरीरातील रक्तामधील साखरेच्या पातळीवर. तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करून हार्मोन्सची पातळीदेखील संतुलित राखण्यासाठी कॅमोमाईल टी चा उपयोग होतो. कॅमोमाईल टी मध्ये इन्शुलिनचं प्रमाण असल्यामुळे समतोल राखला जातो. यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.

हृदयाला ठेवतं सुरक्षित

आजकाल कमी वयातदेखील हृदयविकाराचे झटके येऊन मृत झाल्याच्या अनेक केस ऐकू येत असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेणं. त्यासाठी कॅमोमाईल टी चा उपयोग होतो. तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे साहजिकच तुमचं हृदय अधिक सुरक्षित राहण्यास मदत होते. यातील फ्लेवेन अँटीऑक्सिडंट्समुळे तुमच्या हृदयावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही आणि तुमचं हृदय निरोगी राहण्यास मदत होते. पण तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर शक्यतो कॅमोमाईल टी पिणंं टाळा.

कॅमोमाईल टी चे त्वचेसाठी होणारे उपयोग (Skin Benefits Of Chamomile Tea In Marathi)

केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीदेखील या कॅमोमाईल टी चा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला कदाचित हे फायदे माहीतही नसतील. चला तर मग जाणून घेऊ – 

ADVERTISEMENT

जखमेवरील उपाय

तुम्हाला जखम झाल्यानंतर तुम्ही साधारणतः मलमाचा वापर करताच. पण तुम्हाला यावर कॅमोमाईल टी चा देखील वापर करता येऊ शकेल. रोमन्स, ग्रीक्स आणि इजिप्शियन्स लोक याचा जखम बरी करण्यासाठीदेखील उपोयग करतात. यामध्ये अँटीमायक्रोबायल आणि अँटीइन्फ्लेटरी गुण असल्यामुळे जखम लवकर बरी होण्यासाठी उपयोग होतो. तसंच सोरायसिसपासूनदेखील सुटका मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होतो.

त्वचा उजळवण्यासाठी होते मदत

Shutterstock

यामध्ये नैसर्गिक त्वचा उजळवण्याचे घटक असून नैसर्गिक ब्लीच म्हणूनदेखील याचा वापर करता येऊ शकतात. तुमचं कॉम्प्लेक्शन उजळवून तुमची त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी तुम्ही नियमित कॅमोमाईल टी वापरू शकता. याचा व्यवस्थित प्रमाणात वापर केल्यास, तुम्हाला कोणताही दुष्परिणाम जाणवत नाही. एक मात्र नक्की याचा वापर करून तुम्हाला नक्कीच जादूई त्वचा मिळू शकते. तुम्हाला नेहमी तुमच्या त्वचेवर जो ग्लो हवा असतो तो मिळू शकतो. 

ADVERTISEMENT

अॅक्ने कमी करण्यासाठी होते मदत

Acne In Marathi

Shutterstock

अॅक्ने ही नेहमीच उद्भवणारी समस्या आहे. त्यावर उपचार करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण तरीही ही समस्या सतत उद्भवत आहे. तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र नष्ट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये आढळणाऱ्या अँटिसेप्टिक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांंमुळे अॅक्ने कमी होण्यास मदत मिळते. तसंच याचा नियमित वापर केल्यास, तुमची अॅक्नेची समस्या दूर होण्यासदेखील मदत मिळते.

वाचा – सौंदर्यासाठी कॉफीचे फायदे

ADVERTISEMENT

अँटीएजिंग म्हणून होतो वापर

कॅमोमाईल टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी फायदेशीर असतात. फ्री – रॅडिकल डॅमेजपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी याचा तुम्हाला फायदा मिळतो. तसंच तुमच्या त्वचेवरील छिद्र कमी करून एजिंग प्रोसेस कमी करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो. 

सूर्यकिरणांपासून करतं बचाव

सूर्यकिरण तुमच्या त्वचेला सर्वात जास्त नुकसान पोहचवतं. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करावा लागतो. पण कॅमोमाईल टी च्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे याचा तुमच्या त्वचेला अधिक फायदा मिळतो. यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी बनवून घ्या. त्यामध्ये टॉवेल भिजवा आणि पाणी पिळून टाका आणि तुमच्या सनबर्न झालेल्या त्वचेवर लावा. असं केल्याने तुमची बर्न झालेली त्वचा उजळण्यास नक्कीच मदत होते. 

कॅमोमाईल टी चे केसांना होणारे फायदे (Hair Benefits Of Chamomile Tea In Marathi)

केसांसाठीदेखील तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. केस हा खरं तर आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपाय शोधत असतो. याचा कसा फायदा होतो बघूया –

ADVERTISEMENT

कोंड्याविरुद्ध लढा

Dandruff In Marathi

Shutterstock

बऱ्याच जणांना कोंड्याची समस्या असते. कितीही आणि कोणतेही शँपू आणि कंडिशनरचा वापर करून कोंड्याची समस्या राहात असेल तर तुम्ही कॅमोमाईल टी चा वापर करा. तुम्हाला त्रासदायक असणाऱ्या स्काल्पवरदेखील याचा चांगला परिणाम होतो. तसंच तुमचा कोंडा कमी करण्यासाठी यातील अँटीसेप्टिक गुणामुळे फायदा होतो. त्यासाठी तुम्ही तुमचे केस थंड कॅमोमाईल टी ने धुवा. काही वेळ तसंच ठेऊन नंतर पुन्हा थंड पाण्याने केस धुवा. यामुळे कोंडा निघून जाण्यास मदत होते. 

केसांची वाढ

लांबसडक केस सगळ्यांनाच आवडतात. पण त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. केसांची वाढ बऱ्याचदा कोंडा, केसगळती यामुळे थांबते. पण अशावेळी तुम्ही कॅमोमाईल टी चा वापर करा. यातील गुणधर्म मेटाबॉलिजम बुस्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कॅमोमाईल टी तुमच्या त्वचेत मुरून केसांची वाढ करून देण्याासाठी उपयुक्त ठरतं. तसंच तुमच्या केसांच्या त्वचेवरील डेड सेल्स काढून टाकण्यासही मदत होते. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ अधिक चांगली होते.

ADVERTISEMENT

दुहेरी केसांची समस्या सोडवण्यासाठी होते मदत

Shutterstock

दुहेरी केसांची समस्या ही तर जागतिक समस्या आहे. यासाठी आपण नियमित कितीही केस ट्रिम केले तरीही काही कालावधीनंतर पुन्हा ही समस्या येतेच. पण ही समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला कॅमोमाईल टी ची मदत मिळू शकते. याचा तुम्ही नियमित वापर केल्यास, तुमच्या दुहेरी केसांची समस्या सोडवण्यासाठी मदत होते. कॅमोमाईल टी आणि बिअर मिक्स करून तयार झालेल्या मिश्रणाने तुम्ही केस धुतल्यास, तुमची ही समस्या निघून जाते.

चमकदार केस

चमकदार केस राहणं हे तर प्रत्येकाचंं स्वप्नं असतं. त्यासाठी अनेक तेल, शंँपू आणि कंडिशनर आपण वापरतो. पण त्यावरील रामबाण उपाय म्हणजे कॅमोमाईल टी. तुमच्या केसांना कोणताही धक्का न पोहचता तुमचे केस चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुमचे केस जर निस्तेज आणि कोरडे दिसत असतील तर तुम्ही थंड कॅमोमाईल टी चा केसांवर प्रयोग करा. ज्यामुळे तुमच्या केसांना अधिक चमक मिळते. तुम्ही मेंदीसह याचा वापर केल्यास, तुमच्या केसांना अधिक चांगली चमक येईल.

ADVERTISEMENT

केसांना मिळतं पोषण

Nourishes Hair In Marathi

Shutterstock

केसांना पोषण देणं हे सध्याच्या प्रदूषणामध्ये खूपच अवघड काम झालं आहे. पण तुम्हाला कॅमोमाईल टी चा वापर करून हे नक्कीच करता येतं. यात असलेल्या अँटिसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केसांना पोषण मिळतं.

ADVERTISEMENT

कॅमोमाईल टी कसा बनवावा (How To Make Chamomile Tea In Marathi)

Chamomile Tea In Marathi

Chamomile Tea In Marathi

कॅमोमाईल टी नक्की कसा बनवायचा असा प्रश्न पडतो. तर हे करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही दुधासहदेखील बनवू शकता अथवा याचा ग्रीन टी प्रमाणेदेखील वापर करू शकता. 

कॅमोमाईल टी बनवण्याची पद्धत – 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिले एक कप पाणी उकळून घ्यावं
  • कॅमोमाईल टी बॅग कपात ठेवावी
  • वरून उकळलेलं पाणी घालावं
  • यातील अर्क पाण्यात उतरला की, कॅमोमाईल टी प्यावा

फ्लेवर्ड कॅमोमाईल टी कसा बनवावा 

  • तुम्ही वरीलप्रमाणेच सर्व कृती करून घ्यावी
  • त्यानंतर तुम्ही त्यामध्ये एक चमचा मध घालावा
  • मिसळून हे मिश्रण प्यावे

दुधाचा कॅमोमाईल टी

  • तुम्ही वरील कृती करून टी तयार करून घ्या
  • त्यामध्ये थोडंसं दूध घाला
  • यामुळे तुमच्या चहाला थोडी क्रिमी अशी चव येईल

कॅमोमाईल टी मुळे होणारं नुकसान (Side Effects Of Chamomile Tea In Marathi)

Effects Of Chamomile Tea In Marathi

Side Effects Of Chamomile Tea In Marathi

ADVERTISEMENT

आयुर्वेदाच्या अनेक गुणांनी भरपूर असलेल्या कॅमोमाईल टी चे अनेक फायदे आहेत. पण नुकसानदेखील आहे. फायद्याच्या तुलनेत कमी नुकसान असलं तरीही याचं अधिक सेवन केल्यास, तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. 

1. तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असाल आणि त्यासाठी कोणत्याही तऱ्हेची औषधं घेत असाल तर अशावेळी कॅमोमाईल टी पासून दूर राहा. औषधांचा अधिक डोस असेल तर या टी चा वापर चुकीचा ठरू शकतो. याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांंचा सल्ला जरूर घ्या. 

2. लहान मुलांना हा कॅमोमाईल टी देऊ नये. त्यांच्या आरोग्यासाठी हा योग्य नाही

3. गरोदरपणात तुम्हाला जो तणाव येत असतो, तेव्हा याचं सेवन करू नये. कारण या दरम्यान कॅमोमाईल टी पिण्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

4. कॅमोमाईल टी सेवन जास्त केल्याने तुम्हाला उल्टी होण्याचा अथवा मळमळण्याची समस्या होऊ शकते

कॅमोमाईल टी संबंधित प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1- कॅमोमाईल टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

कॅमोमाईल टी पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यानंतर अथवा झोपण्यापूर्वी 30 ते 40 मिनिट्स पहिले तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते आणि सकाळी तुमचा उत्साह चांगला राहतो. 

2- कॅमोमाईल टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्याचप्रमाणे कॅमोमाईल टी च्या बाबतीतदेखील आहे. याच्या अधिक सेवनाने तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट्स होत असतात. दिवसातून एक किंवा दोन वेळाच तुम्ही हे पिऊ शकता. 

ADVERTISEMENT

3- रोज कॅमोमाईल टी प्यायला हवं का?

कॅमोमाईल टी मध्ये फ्लेवर्स मिळत नाहीत. पण हे विविध देशांमध्ये मिळत असल्याने याचा प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा स्वाद असतो. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

10 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT