लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो* (Tips For Glowing Skin In Marathi)

लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो* (Tips For Glowing Skin In Marathi)

साधारण जानेवारी महिना उलटला की, लग्नाचा सीझन सुरु होतो. फेशिअल, मेंहदी, मेनिक्युअर, पेडिक्युअरसाठी तासनतास पार्लरमध्ये जाऊन बसावे लागते. पण जर तुमच्या साधारण एक महिना हातात असेल तर तुम्ही हेे काही उपाय नक्की ट्राय करुन पाहू शकता आणि हो आणि तुमचेच लग्न असेल तर तुम्ही ही चांगली सवय स्वत:ला लावून घ्यायला हवी.कारण मेकअपपेक्षाही तुमच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो हा तुमच्या लग्नातील चर्चेचा विषय असले मग तुम्हालाही जास्त खर्च न करता अशी त्वचा हवी आहे का? मग आता  घरच्या घरी तुम्हाला काही सोप्या गोष्टी करायच्या आहेत आणि काही सवयी बदलायच्या आहेत. चला करु या सुरुवात


तुम्हालाही डबलचीन आहे? मग हे सोपे व्यायाम नक्की करा 


चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी सोपा मार्ग (Ways To Get Glowing Skin Naturally)


चमकत्या त्वचेसाठी या सोप्या उपाय आणि टिपांचे अनुसरण करा.


पोट हवे साफ (Keep Your Stomach Clean)


त्वचेला कितीही क्रिम लावा किंवा कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून काहीही करा जर तुमचे पोट साफ नसेल तर तुमच्या चेहऱ्याला ग्लो कधीच येणार नाही. कामांच्या वेळांमुळे किंवा सकाळी उठून जाण्याचा कंटाळा केल्यामुळे अनेकांचे पोट साफ होत नाही. जर तुम्हाला शौचाला जाण्याचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर साधा सोपा उपाय हवा असेल तर रात्रीचे जेवण वेळेवर घ्या. झोपण्याआधी एक ग्लास पाणी घेऊनच झोपा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. कारण उत्तम त्वचेसाठी तुमचे शरीर चांगले असणे गरजेचे असते. नुसते त्वचेसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी तुमचे पोट साफ असणे गरजेचे आहे.


constipation


टीप- बाजारात पोट साफ करण्याचे काढेदेखील मिळतात. ते देखील पाण्यातून घ्यायला हरकत नाही. रात्री झोपताना ते पाण्यातून घेण्याचा सल्ला दिला जातो.


लिंबू-मध पाणी (Drink Lemon Water)


सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घाला. वजन कमी करणाऱ्यांना हे पाणी पिण्याची सवय असेलच. दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर ही सवय बदला.  त्याऐवजी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. लिंबांमध्ये व्हिटॅमिन C असते. लिंबामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतो. त्यामुळे दररोज सकाळी लिंबू-मध पाणी प्या.


सध्या *जाड आयब्रोजचा ट्रेंड आहे, तुम्हालाही हवेत का जाड आयब्रोज?


बीटाचा रस (Beet Root Juice)


बीटामधील डिटॉक्सीफाय करणारे गुणधर्म असतात. रक्तशुद्धीकरण करण्यासाठी बीट हे फायदेशीर असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी बीटाचा रस प्या. तुमच्या त्वचेमधील बदल तुम्हाला जाणवेल. मुरुम, पुळ्या, पुटकुळ्या कमी होताना दिसतील. बीटाच्या रसाची चव ही थोडीसी तुरट असते. तुम्हाला त्याला थोडी चव आणायची असेल आणि हा रस अधिक हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही त्यात थोडे गाजर किंवा काकडीही घालू शकता.


aliaa beetroot juice


Face sheet mask ने आणा चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो


नारळपाणी (Coconut Water)


मधल्यावेळेत जर तुम्हाला काही थंडगार प्यायची इच्छा असेल तर कोल्ड्रींक पिण्यापेक्षा नारळपाणी प्या. नारळपाण्यामध्ये व्हिटॅमिन C असते. शिवाय तुमच्या त्वचेवर जर कोणत्या एलर्जी आल्या असतील तर घालवण्याची क्षमता नारळपाण्यामध्ये असते. तुमच्या निस्तेज त्वचेला तजेला आणण्याचे काम नारळपाणी  करते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी नारळपाणी प्या.


coconut water


व्हिटामिन C (Vitamin C)


जर तुम्ही फळे खात नसाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. व्हिटॅमिन C च्या टॅबलेट मिळतात. ज्या पाण्यात विरघळतात. एका ग्लासात पाणी घेऊन ही गोळी विरघल्यानंतर हे पाणी प्यायचे आहे. या गोळीमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. शिवाय त्या निमित्ताने तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पाणीही मिळते. रात्री झोपताना तुम्ही पाणी प्यायले तरी चालेल.


भरपूर सलाद खा (Eat Salad)


जंक फूडची चव इतकी चटकदार, चटपटीत असते की, आपण चांगले असे काही खायला पाहात नाही. जंक फूड खात असाल  तर त्याच्या दुप्पट सलाद घ्या. जेवणात काकडी, टोमॅटो, गाजर, बीट असे सगळे काही असू द्या. या सगळ्यामध्ये तुमच्या हेल्दी त्वचेसाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतात. या शिवाय प्रत्येक सीझनला मिळणारी फळे भरपूर खा. पाणी पिण्याचा कंटाळा करणाऱ्यांनी खरबूज,कलिंगड अशी पाणी असलेली फळे खा.त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पाणी मिळते. 


salad


हे खाणे टाळा. (Foods To Avoid) 


१. चायनीज पदार्थ खाणे या दिवसात टाळा. चायनीज चमचमीत लागते. चायनीजच्या हॉटेलबाहेरुन जाताना चुकून तेथे बनणाऱ्या पदार्थाचा वास आला तर तो खाण्याचा मोह टाळता येत नाही. पण स्वत:च्या जीभेचे चोचले थोडे आवरा.


२. जेवणाच्या वेळा पाळा. सकाळी भरपेट नाश्ता व्हायलाच हवा. त्यानंतर दुपारी १ च्या आत जेवण आणि रात्रीचे जेवणही ९ च्या आत व्हायला हवे. त्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य सुधारेल.


३. मेकअप करत असाल तर तो चेहऱ्यावरुन काढणेही गरजेचे असते. त्यामुळे बाहेरुन आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप आठवणीने काढा.


४. आठवड्यातून दोनदा चेहरा स्क्रब करा. स्क्रब केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाते


५. चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी चेहऱ्याला मसाज करायला विसरु नका.हे मसाज कोणत्याही क्रिमने करायला हवे असे नाही. हल्ली ऑनलाईन कितीतरी फेस मसाजचे व्हिडिओ असतात. त्यातील एखादा व्हिडिओ पाहून घरच्या घरी मसाज करा. 


वाचा- चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी ग्लिसरीन वापरा


तुम्हाला माहीत आहे का यामुळेही चेहरा होतो 'निस्तेज' (Reasons Your Face Looks Dull)


चीडचीड नको (Stop Being Irritable)


निरोगी आरोग्यासाठी तुमचे मन प्रसन्न असणेही गरजेचे असते. मन प्रसन्न असेल तर तुमचे शरीर प्रसन्न राहते. तुम्ही कितीही उपाय केलेत तरी तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या ग्लोसाठी तुमचे मन प्रसन्न असणे गरजेचे असते. तुमची सतत होणारी चीडचीड थांबवा. सतत होणाऱ्या चीडचीडे स्वभावाचा परिणाम तुमच्या रक्तप्रवाहावर होत असतो. त्यामुळे आलेल्या परिस्थितीशी सामंजस्याने सामोरे जाता येईल का याचा विचार करा. या शिवाय मनातील नकारात्मक विचार तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते. सतत विचार केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसत राहते. परिणामी चेहरा निस्तेज आणि अधिक थोराड दिसायला लागतो. 


जंकफूडचे अति सेवन (High Intake Of Junk Food)


सतत जंकफूड खाल्याचा परिणाम तुम्हाला लगेच तुमच्या चेहऱ्यावर दिसत नसला तरी त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत असतो. उदा. चायनीजच घेऊया. आपल्या इथे मिळणारे चायनीज हे इंडियन प्रकारातले चायनीज आहे. सांगायचे झाले तर त्यात तेल, तिखट आणि मीठ अधिक घातलेले असते. चायनीजच्या सततच्या सेवनामुळे तुमच्या नाकाभोवती अधिक तेल साचायला लागते. साचलेल्या तेलामुळे चेहऱ्यावर बारीक बारीक मुरुम येतात. ही इतर मुरुमांसारखी नसतात. तर या बारीक घट्ट अशा पुटकुळ्या असतात. 


junkies


वाचा - चेहऱ्यावर ग्लो कसा आणाल


वेगवेगळे प्रयोग (Avoid Doing Experiments)


अनेक जण अनेक टिप्स देतात. त्या सगळ्या करुन पाहण्याची घाई अनेकांना असते. आज काय बेसनाचा पॅक, उद्या काय तर मसूर डाळीचा पॅक असे सगळे प्रयोग आपल्याला करुन पाहायचे असतात. असे सततचे प्रयोगही तुमचा चेहरा निस्तेज करत असतात. नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केलेले पॅक जितके चांगले असतात. तितकेच ते त्वचा कोरडी करण्यात कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्हाला हनी-बनाना, ओट्स किंवा बेसन, मसूरचा पॅक चेहऱ्याला सूट होत असेल तरच हे पॅक लावा आणि सतत प्रयोग करणे टाळा. 


पाणी न पिणे (Less Water Intake)


काहींना बाहेर गेल्यानंतर सतत लघवीला जाण्याचा कंटाळा असतो. मग अशावेळी ते कमी पाणी पिणेच पसंत करतात. पण पाणी ही तुमच्या शरीराची गरज आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर पाणी, बाहेर किंवा ऑफिसमध्ये असाल तरी दुपारी जेवणापूर्वी अर्धा तास एक ग्लास पाणी, संध्याकाळी साधारण ४ वाजता आणि रात्री जेवणापूर्वी एक ग्लासपाणी इतके पाणी तर तुम्ही सहज पिऊ शकता. त्यामुळे पाणी न पिण्याची कोणतीच कारणे देऊ नका. कारण पाणी तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणते आणि तुमचा चेहरा सतत फ्रेश ठेवते. 


फोटो सौजन्य-Instagram


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


How To Get Rid Of Pimples In Marathi