दूध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. शरीरातील अनेक गोष्टींची कमतरता भरुन काढण्याचे काम दूध करते. दूध हे साखर घालून किंवा हल्लीच्या काळात त्यामध्ये वेगवेगळ्या पावडर घालून पिण्याची पद्धत आहे. पण तुम्ही कधी दुधात तूप घालून त्याचे सेवन केले आहे का? जर तुम्ही अद्याप दुधात तूप घालून पित नसाल तर आजपासूनच त्याचे सेवन करण्यास सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला भऱपूर फायदे मिळण्यास मदत होईल. मुळात पंचामृत करताना तुम्ही दुधात तूप घातलेले पाहिले असेल पण त्यामध्ये अन्यही काही घटक असतात. पण नुसते तूप दुधात घालून प्यायलाने काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
लग्नाची तारीख जवळ येताच आहारात असू द्या या फळांचे रस, त्वचा दिसेल सुंदर
शक्तीवर्धक
ज्यांच्या कामांचे तास अधिक आहेत त्यांच्यासाठी दुधामध्ये एक चमचा तूप टाकून पिणे फारच फायद्याचे आहे. तूप आणि दूध हे मिश्रण प्यायल्याने शरीराला इन्स्टंट उर्जा मिळते. दूध हे पूर्णान्न आहे तर तूप हे त्याला पुरक असे असल्यामुळे तुम्हाला पटकन टवटवीत वाटते. बाहेर काम करुन घरी परतल्यानंतर जर तुम्हाला मरगळ आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही लगेचच दुधात तूप घालून प्यायला हवे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.
पचनक्रिया सुधारते
दूध हे थंड असते. ज्यांना अॅसिडीटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. त्यांच्यासाठी दूधाचे सेवन फारच फायद्याचे ठरते. दूधामुळे मल: निस्सारण होण्यास मदत मिळते. तूपही पोटातील कडक विष्ठेला पोटातून बाहेर काढण्यास मदत करते. जर तुम्हाला पोटाचे त्रास असतील तर तुम्ही दररोज रात्री झोपताना गरम दुधात तूप टाकून त्याचे सेवन करायला हवे. तुमचे पोटाचे आरोग्य सुधारेल.
सांधेदुखी करते कमी
शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली की सांधेदुखीचा त्रास आपल्याला होऊ लागतो. अशी सांधेदुखी तुम्हालाही होत असेल तर तुम्ही आजपासूनच दुधात तूप घालून त्याचे सेवन करायला सुरु करा.त्यामुळे शरीराला इन्स्टंट उर्जा मिळते हे आपण जाणून घेतलेच पण त्यासोबत शरीरात सुरु झालेल्या सांधेदुखीला नियंत्रणात आणण्याचे काम देखील करते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास दुधात तूप घालून प्यायला हवे.
लग्नाच्या पार्टीसाठी इंडो-वेस्टर्न ड्रेसचे पॅटर्न
लैंगिक शक्ती वाढते
लैंगिक शक्ती वाढवण्यासाठीही दुधात तूप घालून पिणे फायद्याचे ठरते. असे म्हणतात की दूधात तूप घालून प्यायल्यामुळे शरीरातील वीर्याची निर्मिती वाढण्यास मदत मिळते. जर तुमची लैंगिक क्षमता कमी असेल तर तुम्ही आयुर्वेदानुसार याचे सेवन करु शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल
त्वचा दिसते सुंदर
तुपामध्ये अनेक अँटी- ऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेवरील तजेला टिकून ठेवण्याचे काम करतात. तूपाचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील चमक वाढते हे तर आपण सगळेच जाणतो. पण दूध आणि तूप यांचे एकत्रितपणे सेवन केल्यामुळे त्वचा ही अधिक सुंदर दिसते. त्वचेवरील अनइव्हन स्किनटोन चांगली होण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचेवरील पुरळ, पुटकुळ्या कमी होतात.
आता दूध आणि तुपाचे एकत्रित सेवन किती फायद्याचे आहे हे जाणून घेतल्यानंतर आजच त्यांचे सेवन करा. तसंच आरोग्यासाठी गीर गाईचे दूध पिणे फायदेशीर असते. तेही नक्की करून पाहा.