मंद सुगंध देणारी मोगऱ्याची फुलं अनेकांच्या आवडीची असतील. साधारण एप्रिल महिना सुरु झाला की, मोगऱ्याची फुलं जास्त दिसू लागतात. हल्ली मोगऱ्याची शेती वर्षभर केली जाते. त्यामुळे ही फुलं थोड्या फार प्रमाणात का असेना मिळतात. पण या फुलांचा खरा सीझन हा खरा उन्हाळ्यातच असतो. केसांत ही फुलं माळण्यापलीकडे याचे काही उपयोग असतील असे तुम्हाला वाटते का? असे वाटत असेल तर असे अजिबात नाही. सुगंधी द्रव्य आणि केसांची शोभा वाढवण्यापलीकडे ही याचे अनेक फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात
त्वचेसाठी मोगऱ्याचे फायदे
मोगऱ्याचे फुल त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. ते नेमके कसे ते आता जाणून घेऊया.
- ॲंटीसेप्टिक : मोगऱ्यामध्ये अनेक अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे एखादी जखम झाली तरी देखील त्या बऱ्या होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा इतर काही जखमा झाल्या असतील तर त्यावर मोगऱ्याचा अर्क काढून लावावा. त्यामुळे त्या जखमा बऱ्या होण्यास मदत मिळते.
- त्वचा करते हायड्रेट : ज्यांना कोरड्या त्वचेचा त्रास असेल अशांनी तर मोगऱ्याचा उपयोग करायला हवा. मोगऱ्याचे पाणी किंवा मोगऱ्याची पेस्ट असेल तर ती चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
- डाग करा दूर : चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर डाग तसेच राहून जातात. चेहऱ्यावर तसेच डाग राहून गेले असतील तर तुमच्यासाठी मोगरा हा खूपच चांगला. मोगऱ्याचा उपयोग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत करते.
- अँटी एजिंग: त्वचा तुकतुकीत आणि तरुण हवी असेल तर मोगऱ्याचे पाणी हे उत्तम असते. मोगऱ्याचे पाणी वापरल्यामुळे त्वचेतील कोलॅजन वाढते आणि त्वचा अधिक चांगली दिसू लागते.
असाही करु शकता मोगऱ्याचा वापर
- मोगऱ्याची फुलं आणण्यानंतर त्याचा चेहऱ्यासाठी वापर करायचा असेल तर ती फुलं पाण्यात चांगली उकळून घ्या.
- पाण्यात ती तशीच राहू द्या. त्यामुळे त्याचा अर्क चांगलाच त्यामध्ये उतरेल. ते पाणी थंड झाले की, एका बाटलीत भरुन ठेवा. ते पाणी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावता येईल.
- जर तुम्हाला मोगऱ्याचा फेस पॅक करुन लावायचा असेल तर तो देखील तुम्ही लावू शकता. मोगऱ्याची काही फुलं घेऊन ती फुलं चांगली वाटून घ्या. वाटलेल्या फुलांमध्ये तुम्हाला आवडत असलेला कोणताही बेस घेऊन तो चांगला एकत्र करा. आणि तो पॅक लावा. तुमच्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो मिळण्यास मदत मिळेल.
आता मोगऱ्याच्या फुलाचा वापर स्किनकेअर म्हणून करायला अजिबात विसरु नका.