ADVERTISEMENT
home / आरोग्य
Benefits Of Sunbathing In Winter in marathi

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे फायदे, सूर्यप्रकाश आहे लाभदायक

हिवाळ्यात वातावरणात वाढलेल्या थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. आहारात योग्य ते बदल करून, उबदार कपडे घालून अथवा सकाळी कोवळ्या उन्हात अंग शेकवून थंडीपासून बचाव करता येतो. यासाठी प्रत्येकाला सूर्यप्रकाश अंगावर किती आणि कधी घ्यावा हे माहीत असायला हवं. सूर्यप्रकाश असा अंगावर घेण्याला सनबाथ असं म्हणतात. सनबाथचे अनेक चांगले फायदे शरीरावर आणि आरोग्यावर होतात. 

सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे फायदे

Benefits Of Sunbathing In Winter in marathi

सूर्यप्रकाशाची तुमच्या शरीर आणि आरोग्याला गरज असते. मात्र लक्षात ठेवा यासाठी फक्त सकाळी अकरा वाजेपर्यंतच सूर्यप्रकाश अंगावर घेऊ शकता. कारण सकाळी अकरा वाजेपर्यंत कोवळे ऊन असते. त्यानंतर निर्माण झालेला प्रखर सूर्यप्रकाश तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यासाठी जाणून घ्या कोवळ्या उन्हात बसण्याचे काही फायदे

व्हिटॅमिन डी मिळते

सूर्यप्रकाशातून तुमच्या शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत असते. वास्तविक निरोगी राहण्यासाठी शरीराला  व्हिटॅमिन डीची गरज असते. मात्र आजकालच्या दाटीवाटीच्या जीवनशैलीत माणसाच्या शरीराला पुरेसं असं व्हिटॅमिन डी मिळत नाही. अन्नपदार्थांमधून अथवा सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळालं नाही तर औषधांच्या माध्यमातून तुम्हाला व्हिटॅमिन डी घ्यावं लागतं. सूर्यप्रकाशातून तुम्हाला पुरेसं म्हणजेच जवळजवळ नव्वद टक्के व्हिटॅमिन डी मिळू शकतं. यासाठीच सकाळी कोवळ्या उन्हात दररोज कमीत कमी दहा मिनीटे तरी प्रत्येकाने बसायला हवं.

ADVERTISEMENT

दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)

इनफेक्शनचा धोका कमी होतो

आजकाल कोरोनामुळे इनफेक्शनचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशा वेळी जर तुम्ही नियमित कोवळ्या उन्हात अंग शेकवत असाल तर तुम्हाला इनफेक्शन होण्याची शक्यता कमी होते. कारण उन्हामध्ये जीवजंतू अथवा विषाणू नष्ट होतात. घरातील कपडे, वापरलेल्या वस्तू अथवा पांघरूण दुपारच्या कडक उन्हात वाळवण्यामुळे तुमचे घर जीवजंतूंपासून दूर राहू शकते. यासाठी घरात सूर्यप्रकाश येणं खूप गरजेचं आहे.

ऑक्सिजनची पातळी वाढते

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तुमच्या शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाशात बसल्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. शरीराला ऑक्सिजन घेण्यास लागणारी क्षमता यामुळे वाढते आणि तुमचे शरीरा स्वस्थ राहते. ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास असेल अशा लोकांनी नियमित कोवळ्या उन्हात यासाठीच बसायला हवं.

Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

ADVERTISEMENT

शांत झोप लागते

जर तुम्हाला तुमच्या चुकीच्या जीवनशैली अथवा इतर काही कारणांमुळे झोप लागत नसेल तर नियमित कोवळे ऊन अंगावर घ्या. कारण सकाळी फक्त काही मिनीटे कोवळे ऊन घेतल्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागू शकते.  कारण सूर्यप्रकाशात तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या मेलाटोनिनच्या निर्मितीला आळा बसतो. ज्यामुळे तुमचे बॉडी क्लॉक सुधारते आणि तुम्हाला रात्री शांत झोप लागते. 

त्वचेसाठी उत्तम

त्वचेच्या अनेक समस्या या इनफेक्शनपेक्षा अशुद्ध रक्तामुळे निर्माण होतात. मात्र सूर्यप्रकाशात बसण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. ज्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा रोग सहज दूर होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा त्वचेवर नेहमी कोवळे ऊन म्हणजे सकाळी अकरा आधी आणि संध्याकाळी पाच नंतरचेच ऊन सोयीचे असते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

सनबाथ घेताना काय काळजी घ्यावी

सूर्यप्रकाशात बसताना अथवा सनबाथ घेताना काही गोष्टी मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्या.

  • सूर्यप्रकाशात असताना सतत पाणी प्या ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही.
  • प्रखर ऊन असेल तर डोक्यावर रुमाल अथवा टोपी घाला
  • सूर्यप्रकाशात बसल्यानंतर अंघोळ केल्यास चांगला परिणाम होतो.
  • सूर्यप्रकाशात बसल्यानंतर लगेच काही खाऊ नका
  • एक तासाच्या जास्त वेळ सूर्यप्रकाशात बसू नका
31 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT