ADVERTISEMENT
home / Travel in India
गोड खाण्याची आवड असेल तर भारतातील ‘या’ पर्यंटन स्थळांना जरूर भेट द्या

गोड खाण्याची आवड असेल तर भारतातील ‘या’ पर्यंटन स्थळांना जरूर भेट द्या

एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर तिथली भौगोलिक परिस्थिती, वातावरण, लोकांचे राहणीमान यावरून तिथली खाद्यसंस्कृती पाहायला मिळत असते. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथे काय चांगलं खायला मिळेल अथवा तिथला एखादा स्पेशल पदार्थ आपण जरूर चाखतो. काही लोक तर खाण्यासाठीच भ्रमंती करत असतात. कारण त्यांना विविध प्रांतातील, विविध संस्कृतीमधील नवनवीन पदार्थ खाण्याची आवड असते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल आणि तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर भारतात या ठिकाणी अवश्य भेट द्या…

कलकत्ता

पश्चिम बंगालमधील कलकत्ता शहर गोड पदार्थांसाठी लोकप्रिय आहे. या शहराची ओळखच गोड पदार्थांचे शहर अशी आहे. मुळात या ठिकाणी स्ट्रीट फूड संस्कृती लोकप्रिय असल्यामुळे तुम्हाला जागोजागी खाण्याचे पदार्थ मिळतात. बंगाली लोकांची बोली जितकी गोड तितकीच त्यांची खाद्यसंस्कृतीही गोड असतात. कलकत्त्यामध्ये शिरताच तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाई, संदेश, रसगुल्ले चाखायला मिळू शकतात. गुर पायेश नावाची गुळापासून बनवलेली खीरदेखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे.

लखनऊ 

उत्तर प्रदेशमधील लखनऊ हे नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते. सहाजिकच या शहराची खाद्यसंस्कृती शाही आहे. या ठिकाणी तुम्हाला शाही कबाब आणि बिर्याणीसोबत विविध प्रकारच्या शाही मिठाई चाखायला मिळतात. काळ्या गाजरांचा हलवा ही या शहराची खासियत आहे. जुन्या आणि राजेशाही मिठाईच्या शोधात असाल तर तुम्हाला या शहरात नक्कीच तुमच्या आवडीचे गोड पदार्थ खायला मिळतील. मख्खन मलाई, रेवडी, शाही तुकडा असे काही पदार्थ फक्त लखनऊमध्येच येऊन खायला हवेत.

अमृतसर 

पंजाबमधील अमृतसर अनेक पर्यटकांना भुरळ घालतं. सुवर्णमंदीर पाहण्यासाठी या शहरात जाण्याच्या विचारात तुम्ही असाल तर तुमची काही तरी छान आणि गोड खाण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण इथलं तंदूर, पराठे जितके लोकप्रिय आहेत. तितकेच या ठिकाणाचे गोड पदार्थ हटके आहेत. कारण या शहरात बेसणाचे लाडू, पिन्नी, फिरनी, जिलेभी, लस्सी, फ्रूट क्रीम, कुल्फी फालुदा, रबडी असे विविध पदार्थ तुमच्या स्वागतासाठी सज्ज असतात.

ADVERTISEMENT

मॅंगलोर

दक्षिण भारतात फिरत असाल तर कर्नाटकमधील मॅंगलोर शहराला तुम्ही अवश्य भेट द्यायला हवी. कारण या ठिकाणचं आयस्क्रीम तुम्हाला जगात कुठेच खायला मिळणार नाही. शॉप पब्बास या प्रसिद्ध आयस्क्रीम शॉपमध्ये तुम्हाला निरनिराळ्या फ्लेवर्सचं आयस्क्रीम खायला मिळेल. या ठिकाणी केक, पेस्ट्रीज, बनचेही हटके आणि दुर्मिळ प्रकार गोड प्रेमींसाठी खास ठरू शकतात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT