ADVERTISEMENT
home / xSEO
get well soon message in marathi

लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश | Best Get Well Soon Message In Marathi

आपल्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणीही आजारी असलं की आपलं मन अजिबात लागत नाही. सतत त्या व्यक्तीची चिंता मनात लागून राहते. घरातील कोणतीही व्यक्ती असो, आपला मित्र असो, गर्लफ्रेंड असो वा बॉयफ्रेंड असो या व्यक्तींनी लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे हीच आपल्या मनात नेहमी इच्छा असते. तर आपणही ही सदिच्छा करत आहोत हे त्या व्यक्तींपर्यंत पोहचवावे अशीही आपली मनोमन इच्छा असते. मग लवकर बरे व्हा असे संदेश आपण पाठवत असतो. असेच लवकर बरे होण्यासाठी खास संदेश (Get Well Soon Message In Marathi) आपण या लेखातून पाहणार आहोत. तसंच आपल्या आप्तजनांसाठी गेट वेल सून कोट्स (Get Well Soon Quotes In Marathi) आपण जाणून घेऊया. 

गर्लफ्रेंडसाठी गेट वेल सून मेसेजेस | Get Well Soon Message In Marathi For Girlfriend

Get Well Soon Message In Marathi For Girlfriend
Get Well Soon Message In Marathi For Girlfriend

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे नातं वेगळंच असतं. बऱ्याचदा घरात हे नातं माहीत नसतं आणि अशावेळी त्रास तेव्हा अधिक होतो जेव्हा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड यापैकी कोणी आजारी असतं. आपल्याला आपल्या या जवळच्या व्यक्तीबरोबर राहयचंदेखील असतं आणि ते शक्यही नसतं. अशावेळी कामी येतात ते म्हणजे Wishes For Good Health In Marathi. असे Get Well Soon Message In Marathi पाठवून आपल्या गर्लफ्रेंडला तिची काळजी आहे हे नक्कीच तुम्ही दाखवून देऊ शकता. असेच काही Get Well Soon Message In Marathi For Girlfriend आपण जाणून घेऊया. 

1.  तुझ्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. तू लवकर बरी हो आणि मला भेटायला ये. तुझ्याशिवाय अन्नही गोड लागत नाहीये. तू लवकर बरी व्हावीस हीच सदिच्छा! Get Well Soon My Jaan 

2. माझे प्रेम आणि काळजी नेहमीच तुझ्यासह आहे. औषधं तर तू घेतच आहेस पण त्याचबरोबर माझे प्रेमही तुझ्याबरोबर आहे. तू लवकरात लवकर बरी हो आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने मला भेटायला लवकरात लवकर ये..वाट पाहतोय. तुझाच…

ADVERTISEMENT

3. कायम सकारात्मक विचार ठेव आणि लवकर बरी हो. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तुला माहीत आहे. माझ्या सदिच्छा कायम तुझ्याच बरोबर आहेत. Get Well Soon

4. या सर्व कठीण परिस्थितीत माझी सर्व प्रार्थना आणि सकारात्मक विचार, प्रेम, काळजी सर्वकाही तुझ्याबरोबर आहे. तुला माहीत आहेच. लवकरात लवकर बरी हो!

5. लवकरात लवकर तुझ्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी हीच देवाजवळ सतत प्रार्थना करत आहे. तुझ्याशिवाय दिवस रात्र काहीच चांगलं वाटत नाहीये. लवकर बरी हो गं! तुझी वाट पाहतोय. 

6. माझा विश्वास आहे की, तू लवकरच बरी होशील आणि अगदी पूर्वीसारखी ठणठणीत होऊन लवकरच मला प्रेमाने पुन्हा एकदा त्रास देशील. LOVE you. Get well Soon

ADVERTISEMENT

7. मला तुझी खूपच आठवण येत आहे. लवकरात लवकर बरी हो!

8. थोडासा विश्वास आणि आत्मविश्वास ठेव. तू लवकरच बरी होशील हा माझा पूर्ण विश्वास आहे. सर्व काही ठीक होईल

9. तू आजारी आहेस पण मी तुला भेटायला येऊ शकत नाही याचेच मला वाईट वाटत आहे. पण तुला माहीत आहे माझे प्रेम आणि मी दोन्ही तुझ्याजवळच आहोत. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!

10. लवकरात लवकर तू बरी व्हावीस म्हणून खूप प्रेम आणि काळजी तुझ्याकडे पाठवत आहे. मी तुझी वाट पाहतोय, त्यामुळे पटकन बरी हो! 

ADVERTISEMENT

मित्रासाठी गेट वेल सून संदेश | Get Well Soon In Marathi For Friend

Get Well Soon In Marathi For Friend
Get Well Soon In Marathi For Friend

मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आपण निवडलेला मार्ग आहे. कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं. कारण तुमच्या सुखदुःखात कायम साथ देणारे तुमचे नातेवाईक नसतात तर मित्र असतात. आजारपणातही मित्रमैत्रिणीच असतात जे तुम्हाला अधिक साथ देतात. असेच काही Get Well Soon Message In Marathi पाठवून आपल्या आजारी मित्रमैत्रिणीला जसं वाढदिवस शुभेच्छा संदेश देता तसंच हेही द्या आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रवृत्त करा. 

1. प्रिय मित्रा, तुझ्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! लवकर बरा हो आणि कट्ट्यावर भेट.

2. तुझ्या आजारपणाबद्दल ऐकून खूपच वाईट वाटले. तू लवकर बरी व्हावास याासाठी रोज प्रार्थना करत आहे. मला तुझ्याजवळ येता येत नाही याबद्दल अधिक वाईट वाटत आहे. पण मला विश्वास आहे तू लवकरच बरी होशील. 

3. आजारी असल्यामुळे तुझ्या मनात नकारात्मक विचार येत असतील. पण असे अजिबात करू नकोस. मनात सकारात्मक विचार आणलेस तर नक्की लवकर बरी होशील. Get Well Soon 

ADVERTISEMENT

4. आजारातून लवकरात लवकर बाहेर यावे यासाठी माझ्या सदिच्छा कायम तुझ्याबरोबर आहेत

5. मी माझे सर्व सकारात्मक विचार तुझ्याकडे पाठवत आहे. तू लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहे. 

6. तुम्हाला कधीच नसावे आजारीपण, तुमच्याशिवाय घराला नाही घरपण! लवकर बरे व्हा!

7. लवकर बरे होऊन घरी या!

ADVERTISEMENT

8. तू आजारी आहेस हे कळलं. मी इतक्या लांब असल्यामुळे हतबल वाटत आहे. पण माझ्या सदिच्छा तुझ्यासह आहेत आणि तू लवकरच बरा होशील अशी मी प्रार्थना रोज करत आहे. 

9. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही आणि तुला आपली मैत्री जपण्यासाठी लवकर बरं व्हावंच लागेल. लवकर बरी हो. 

10. चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ते मला तुझ्या रूपात मिळालं आहे. तू असं आजारी राहून अजिबातच चालणार नाही. लवकरात लवकर बरी हो कारण मला तुला घट्ट मिठी मारून सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी किती खास आहेस. 

बॉयफ्रेंडसाठी गेट वेल सून कोट्स | Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend

Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend
Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend

आजारी पडल्यानंतर आई अथवा बाबांनंतर जर कोणी आपल्याजवळ असावं असं वाटत असेल तर बॉयफ्रेंड. पण तोच बॉयफ्रेंड आजारी पडला तर मात्र गर्लफ्रेंडलाही अजिबात चैन पडत नाही. आपल्या बॉयफ्रेंडसाठी असेच काही गेट वेल सून कोट्स (Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend)

ADVERTISEMENT

1. आता तू आजारी आहेस आणि माझं मन अजिबात थाऱ्यावर नाही. जेव्हा तू बरा होशील आणि मला भेटशील तेव्हा मला एक वचन हवं आहे. याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी तूच मला हवा आहेस. लवकर बरा हो!

2. तू हसलास तर सर्व जग माझ्याबरोबर आहेस. तू असा आजारी अजिबात चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो रे! मी तुझी मनापासून वाट पाहतेय. 

3. तुझ्यासाठी जगातील सर्व आनंद मला आणायचा आहे. तू लवकर बरा हो आणि मला येऊन भेट हीच सदिच्छा आहे

4. प्रत्येकवेळी तुला पाहिल्यावर मी अधिक प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीने असे आजारी राहू नये हीच सदिच्छा. लवकरात लवकर बरा हो!

ADVERTISEMENT

5. मी देवाकडे रोज हेच मागते आहे की, मला माझ्यासाठी अजून काही नको. फक्त तुला लवकर बरे वाटू दे. तूच माझं सर्वस्व आहेस. 

6. तू कधीच का समजून घेत नाहीस रे…मला तुझ्याशिवाय करमतच नाही. लवकर बरा हो रे. मी वाट पाहतेय तुझी

7. प्रेम आणि मैत्री ही उत्तम उपचारपद्धत आहे. तू लवकर बरा हो मला अजून काही नको

8. माझं प्रेम कायम तुझ्याबरोबर आहे तुला माहीत आहेच. तू लवकर बरा होऊन माझ्याजवळ यावंसं हीच एक सदिच्छा!

ADVERTISEMENT

9. तू जगातील माझा सर्वात जवळचा व्यक्ती आहेस आणि हे तुला माहीत आहे. प्लीज लवकरात लवकर बरा हो! Get Well Soon My Sweetheart

10. आपल्याला प्रेम करण्यासाठी संपूर्ण जगाची आवश्यकता नाही. एकच व्यक्ती खूप आहे आणि माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस. तू असा आजारी अजिबातच चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो!

बहिणीसाठी लवकर बरे व्हा विनोदी संदेश | Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister

Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister
Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister

बहीण आणि भावाचं नातंच वेगळं असतं. प्रेम आणि नोक-झोक हे कायमच असतं. पण बहीण आजारी पडल्यानंतर भावाचा जीव नक्कीच वरखाली होतो. आपल्या बहिणीसाठी असेच काही Get Well Soon Sms In Marathi. विनोदी लवकर बरे व्हा संदेश बहिणीसाठी खास या लेखातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

1. तू अशी पडून राहिलेली अजिबात चांगली दिसत नाहीस. चल पटकन बरी हो आणि माझ्यासाठी काही मस्त खायला बनव

ADVERTISEMENT

2. तू आजारी पडली आहेस तर घर एकदम शांत झालंय. घराची शांती भंग करण्यासाठी लवकर बरी हो!

3. सगळ्यात जास्त तुला जर काही माहीत असेल तर आजारी पडणं – मजा करतोय लवकर बरी हो!

4. तू लवकरात लवकर बरी व्हावीस हीच इच्छा कारण मला परत परत हॉस्पिटलमध्ये यायची अजिबात इच्छा नाहीये

5. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, तुला सध्या सॉफ्ट डाएटवर राहायचं आहे आणि यात माझाच जास्त फायदा आहे. तरी पण तू लवकर बरी हो 

ADVERTISEMENT

6. आपल्या गरीब डॉक्टर्सना पैसे मिळाले फक्त तुला बरं नसल्यामुळे. पण आता बरी हो लवकर! जास्त पैसे राहिले नाहीत माझ्याकडे 

7. सध्या आजारी असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडेच केंद्रित होतंय आणि ते मला अजिबात आवडत नाहीये. त्यामुळे लवकर बरी हो!

8. लवकर बरी हो आणि परत ये आणि आता तुला हॉस्पिटलच्या जेवणाची चव कशी वाटली ते आम्हाला सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे. म्हणजे किमान आता घरच्या जेवणाला नावं तरी ठेवणार नाहीस. 

9. मी तुझ्यासाठी खूप चॉकलेट्स आणली आहेत. पण तुझ्या डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे लवकर बरी होऊन ती खाणार आहेस की मी संपवू ते मला सांग 

ADVERTISEMENT

10. कोणतीही औषधं तुझा बकवास चेहरा बदलू शकणार नाही. त्यामुळे उगीच हॉस्पिटलमध्ये पडून राहू नकोस. चल लवकर घरी ये!

लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश | Wishes For Good Health In Marathi

Wishes For Good Health In Marathi
Wishes For Good Health In Marathi

लवकर बरे होण्यासाठी लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश तुमच्या आप्तजनांसाठी. आजारी असल्यानंतर अधिक नकारात्मकता मनात येत असते. सकारात्मकता आणण्यासाठी तुम्ही आपल्या नातेवाईकांना पाठवा लवकर बरे व्हा शुभ सकाळचे शुभेच्छा संदेश.

1. लवकरात लवकर बरे व्हा आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि निरोगी राहा हीच सदिच्छा!

2. तुमच्या निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी माझ्याकडून सदिच्छा! लवकर बरे व्हा!

ADVERTISEMENT

3. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत. लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा हीच एक इच्छा

4. अजिबात काळजी करू नका. आपल्याकडील सकारात्मक विचारांनी लवकर बरे व्हा!

5. आजारपणावर तुम्ही सकारात्मक विचारांनी करा मात. आमची तुम्हाला आहे कायमची साथ! लवकर बरे व्हा!

6. आजारपण हे काही टिकणारे नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि लवकर बरे व्हा!

ADVERTISEMENT

7. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमधून घरी यावे हीच सदिच्छा!

8. तुम्ही बरे व्हाल कारण मला माहीत आहे की आजारपण तुमच्या सामर्थ्याने व इच्छाशक्तीसमोर हरले आहे, लवकरच बरे व्हा आणि बळकट व्हा

9. सर्व काही लवकरच ठीक होईल. तुम्ही बरे होण्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पहात आहोत. 

10. तुम्हाला असं हॉस्पिटलमध्ये भेटायला येणं अजिबात आम्हाला आवडत नाहीये. त्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊन आपल्या घरी या हीच इच्छा. 

ADVERTISEMENT

Best Get Well Soon Message In Marathi, wishes for good health in marathi, लवकर बरे व्हा संदेश आम्ही तुम्हाला या लेखातून दिले आहेत. तुम्हाला हे संदेश कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. 

09 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT