ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
कधी मुंबईत किंवा पुण्यात आलात तर नक्की ट्राय करा या थाळी

कधी मुंबईत किंवा पुण्यात आलात तर नक्की ट्राय करा या थाळी

काहीतरी वेगळे खाण्याची तुम्हाला इच्छा असेल आणि एखाद्या वीकेंडमध्ये तुम्ही मुंबई किंवा मुंबईपासून जवळ असलेल्या पुण्याजवळ जाण्याचा विचार करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी खास आहे. कारण मुंबई आणि पुण्यात अशा काही खास थाळी मिळतात.याचा आस्वाद तुम्ही कधीतरी नक्कीच घ्यायला हव्यात. यातील काही थाळी या इतक्या खास आहेत की, त्या तुम्ही नक्कीच खाऊन पाहायला. पाहुयात मुंबई आणि पुण्यात मिळणाऱ्या अशाच काही खास थाळी

प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…

सरपंच थाळी, तात्यांचा धाबा

सरपंच थाळी

Instagram

ADVERTISEMENT

काहीतरी मस्त चमचमीत खाण्याचा विचार करत असाल एकाच वेळी नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही पुण्यातील तात्यांचा धाबा येथे मिळणारी ही सरपंच थाळी तुम्ही नक्कीच चाखून पाहायला हवी. कारण या जम्बो थाळीमध्ये तुम्हाला एकाचवेळी अनेक पदार्थ चाखायला मिळतील. चिकन ग्रेव्ही, मटन ग्रेव्ही,अंडा मसाला, भाकरी, चपाती, पापड, डाळ, भात असे पदार्थ वाढले जातात. भरगच्च अशी ही थाळी तुम्ही एकटे खाऊ शकत नाही. तुम्हाला ही थाळी संपवायला किमान 4 जण तरी लागतील. 

चैतन्य थाळी, दादर, मुंबई

फिश फ्राय थाळी

Instagram

आता जर तुम्हाला मालवणीपद्धतीचे काही तरी चाखायचे असेल तर तुम्ही दादर येथील चैतन्य हॉटेलला नक्की जायला आवडेल. इकडे तुम्हाला मस्त चमचमीत मासे खायला मिळतील. मस्त तुमच्या आवडीचे फिश फ्राय, (कोळंबी, बोंबील, पापलेट, सुरमई) खेकडा, मालवणी कढी, मासे, तांदूळाची भाकरी, भात असे पदार्थ तुम्हाला या थाळीमध्ये मिळतील. जर तुम्हाला चमचमीत नॉनव्हेज खायचं असेल तर इथे नक्की जा.

ADVERTISEMENT

कोकणात सणांना हमखास बनवले जातात हे स्वादिष्ट गोड पदार्थ

बाहुबली थाळी, पुणे

बाहुबली थाळी

Instagram

पुण्यातील हाऊस पराठा येथे तुम्हाला मिळते बाहुबली थाळी.  व्हेज खाणाऱ्यांसाठी ही थाळी खास आहे. त्यातच जर तुम्हाला पराठा हा प्रकार खायला आवडत असेल तर तुम्ही बाहुबली थाळी नक्की चाखून पाहायला हवी. बाहुबली थाळीमध्ये तुम्हाला एक मोठा स्टफ पराठा आणि ते संपवण्यासाठी वेगवेगळ्या ग्रेव्हीज दिल्या जातात. ज्यामुळे तुम्हाला पराठा संपवताना वेगवेगळे फ्लेवर मिळतात. आता हा इतका मोठा पराठआ एकट्याने संपवण्याचा प्रश्नच येत नाही इथे तुम्हाला रिकाम्या पोटी आणि खूप खाणाऱ्या मित्रांनाच घेऊन जावे लागेल. 

ADVERTISEMENT

हॉटेल सुजाता, गिरगाव

Instagram

जर तुम्हाला अस्सल मराठमोळं आणि काहीतरी घरचं आईच्या हातसारखं खायचं असेल तर तुम्ही गिरगावातील सुजाता हॉटेलमध्ये जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला अस्सलं घरासारखे पदार्थ मिळतील. अगदी थालिपीठ, डाळिंबी उसळ,मोदक, वालाच बिरडं, तांदूळाची भाकरी, नाचणी भाकरी असे काही खास पदार्थ मिळतात आणि तेही तुमच्या बजेटमध्ये म्हणजे जर तुम्हाला काही आईच्या हातचं किंवा घरगुती खायचं झालं तर गिरगावातील सुजातामध्ये जा. 

आता मुंबई आणि पुण्यात मिळणाऱ्या या काही खास थाळी आम्ही तुम्हाला सांगितल्या. तुम्हालाही काही खास मिळणारे पदार्थ किंवा अशा थाळी माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा.

ADVERTISEMENT

 

 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

17 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT