ADVERTISEMENT
home / आरोग्य
दिवाळी फराळ माहिती

फराळ खायचाय आणि वजनही वाढू द्यायचे नाही, जाणून घ्या फराळाची योग्य वेळ

सगळीकडे दिवाळीला मस्त सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हणजे सजावट आणि फराळाचा घमघमाट, कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या घरी या दिवसात दिवाळी फराळ अगदी आवर्जून केला जातो. दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपण दिवाळीच्या फराळाची देवाण-घेवाण करतो.  दिवाळी फराळ तुमचा वीक पॉईंट आहे का? उत्तर हो असेल आणि तुम्हाला फिटनेसही ठेवायला आवडत असेल तर तुम्हाला फराळ खाऊनही फिटनेस कसा राखायचा ते माहीत असायला हवे. फराळ खाण्याची वेळ योग्य असेल तर तुमचे वजन वाढत नाही. फराळ किती आणि कोणत्या वेळेत खायला हवा. जेणेकरुन वजन वाढीचा प्रश्नच येत नाही आणि फराळ मिस केला असे म्हणायची वेळ येणार नाही. त्यासाठीच जाणून घेऊया ही महत्वाची माहिती

नाश्त्याची वेळ

खूप जणांकडे दिवाळीला दिवसभरातून एकदा तरी फराळ खाल्ला जातो. खूप जणांकडे सकाळी हा नाश्ता म्हणून दिवाळी फराळ केला जातो. दिवसाच्या सुरुवातीला शरीराला उर्जेची गरज असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पोहे किंवा उपमा अशा नाश्त्यासोबत थोडासा फराळ घेतला तर असा फराळ तुमच्या शरीराला आवश्यक अशी उर्जा पुरवतो. असा नाश्ता तुम्हाला त्रास देत नाही. त्यामुळे तुम्हाला अगदीच फराळ खायचा असेल तर योग्य प्रमाणात तो सकाळी नाश्ताच्या वेळी घ्या.म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळची भूक ही अशी असते की, ज्यावेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असते. दिवसभरात काम करुन किंवा वर्कआऊट करुन जर तुम्हाला भूक लागली असेल तर त्यावेळी शरीराला उर्जा मिळवण्याची गरज असते. फराळामध्ये चकली, बेसन लाडू, रवा लाडू, अनारसा, शेव असे पदार्थ असतात. हे पदार्थ वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. यामागे त्यामधील असलेले तळणीचे पदार्थ, साखर आणि जास्तीचे तूप असते. त्यामुळे संध्याकाळचा नाश्ता करताना ही गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी. संध्याकाळीही फराळाचे पदार्थ खाताना सगळ्या गोष्टी खा. पण त्याचे प्रमाण हे योग्य असायला हवे.

या वेळी टाळा फराळ

 फराळ खाण्याची योग्य वेळ जाणून घेतल्यानंतर फराळ कधी खाऊ नये हे देखील माहीत असायला हवे. 

ADVERTISEMENT
  1. दुपारच्या जेवणात शक्यतो फराळ खाऊ नका. कारण दुपारी पचन क्रिया थोडी मंदावलेली असते. त्यामुळे या वेळी फराळ खाऊन अधिक सुस्तवायला होते. शरीराच्या क्रियाही मंदावलेल्या असतात. त्यामुळे त्याचे उर्जेत नाही तर फॅटमध्ये रुपांतर होते. 
  2. रात्री जेवणानंतरही तुम्ही शक्यतो फराळ न खाल्लेला बरा असतो. रात्री शरीर थकलेले असते. पचन क्रिया मंदावलेली असते. त्यामुळेही शरीरामधील फॅट वाढण्यास त्यामुळे मदत मिळते. ज्याचे रुपांतर वजनवाढीमध्ये होऊ लागते. त्यामुळे शक्यतो तुम्ही रात्री फराळ खायला जाऊ नका. 

आता फराळ खाण्याची योग्य वेळ जाणून घेतली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल

अधिक वाचा

2021 लक्ष्मी पूजन कसे करावे |Laxmi Pujan Marathi | Laxmi Pujan Vidhi In Marathi

Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

असा साजरा करा दिवाळसण, ऐका दिवाळीची गाणी मराठीतून

01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT