ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
laxmi pujan in marathi

2021 लक्ष्मी पूजन कसे करावे | Laxmi Pujan Marathi | Laxmi Pujan Vidhi In Marathi

‘दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या’…. , ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजून जावे की, दिवाळी आता जवळ आली आहे. दसरा गेला की, दिवाळी सणाचे वेध लागतात. दिवाळी सणाची माहिती घेताना दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवसांची माहिती घेणे गरजेचे असते. कारण दिवाळीच्या शुभेच्छा तर आपण देतोच. पण दिवाळीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाचा फार महत्व आहे. लक्ष्मीपूजन हे वेगवेगळ्या पद्धतीने पण मनोभावे केले जाते. लक्ष्मी पूजनाची माहिती (Lakshmi Pujan Chi Mahiti) घेताना लक्ष्मी पूजन विधी (Laxmi Pujan Vidhi In Marathi)  जाणून घेणे गरचेचे आहे. लक्ष्मीपूजन अगदी साग्रसंगीत करण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी (Laxmi Kuber Puja Vidhi In Marathi) लक्ष्मी पूजन विधी मराठी (Laxmi Pujan Marathi) जाणून घेऊया. तसंच लक्ष्मीपूजन केल्यावर शेअर करण्यासाठी खास लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी.

लक्ष्मीपूजन म्हणजे काय ?

laxmi pujan vidhi marathi
लक्ष्मी पूजन कसे करावे | Laxmi Pujan In Marathi

दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला खूपच जास्त महत्व आहे. वेगवेगळ्या स्तरातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनासंदर्भातील अनेक कथा, दंतकथा या प्रसिद्ध आहेत. लक्ष्मी पूजनाची माहिती जाणून घेताना लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली ते माहीत करुन घेणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गासाठी हा अत्यंत महत्वाचा असा दिवस मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी जे समुद्रमंथन झाले त्या दिवशी त्या समुद्र मंथनातून लक्ष्मीची निर्मिती झाली. त्यामुळेच शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्यानंतर येणाऱ्या अमावस्येला कालीमातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पण बदलत्या कालांतराने दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत सुरु झाली. पण दुसऱ्या माहितीनुसार दिवाळीचा काळ म्हणजे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी ही पृथ्वीवर संचार करते. आपल्या निवासासाठी ती योग्य असे स्थान शोधते (लक्ष्मी चंचल असते)  असे म्हणतात ज्या व्यक्ती या खऱ्या, संयमी, दानशूर,  धर्मनिष्ठ आणि पतिव्रत्या किंवा सच्च्या असतात अशा व्यक्तींच्या घरी लक्ष्मी ही राहणे पसंत करते. या शिवाय असे सांगितले जाते की,  लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. कारण काही ठिकाणी लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.  लक्ष्मीपूजन विधी (Laxmi Pujan Vidhi Marathi) जाणून घेणे देखील गरजेचे आहे.

दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे मराठी | Laxmi Pooja Vidhi In Marathi

Laxmi Pooja Vidhi In Marathi

यंदा म्हणजेच 2021 मध्ये लक्ष्मी पूजन हे 4 नोव्हेंबर 2021 या दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत   आहे. आता लक्ष्मी पूजन नेमके कसे करावे ते जाणून घेऊया.

  1.  घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फुले असलेले तोरण लावावे. 
  2. घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी घरात गंगाजल शिंपडावे. 
  3.  लक्ष्मीपूजनासाठी एखाचा चौरंग किंवा पाट घ्यावा  त्यावर लाल रंगाचे कापड घालावे. थेट चौरंगावर पूजा मांडू नये.  
  4. चौरंग किंवा पाटाच्या आजुबाजूला रांगोळी काढावी. तांदुळ घेऊन त्याचे स्वस्तिक लाल रंगाच्या कपड्यावर काढावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. आंब्याची पाने आणि नारळ ठेवून तो कलश बसवावा. 
  5. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीचे स्थान असते. म्हणून त्या ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. 
  6. फुलांची आरास करुन देवांना अक्षता वाहून घ्याव्यात. देवी लक्ष्मी मातेसमोर नाणी ठेवावीत. 
  7. उदबत्ती, दिवा लावून आता मनोभावे देवीचे नाम: स्मरण करावे. लक्ष्मी मातेची आरती करुन तिला नैवेद्य दाखवून पाया पडावं. 

अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन विधी (Laxmi Kuber Puja Vidhi In Marathi) करावे त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल. अशा पद्धतीने पूजा करुन तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.

ADVERTISEMENT

वाचा – Tulsi Vivah Status In Marathi

लक्ष्मीपूजन विधी करतानाचे नियम | Rules To Follow While Doing Laxmi Pujan Vidhi Marathi

Lakshmi Pujan Chi Mahiti

कोणताही पूजाविधी आला की त्याचे नियम आलेच तुम्हालाही लक्ष्मी पूजन करताना काही नियम पाळणे हे अगदी अनिवार्य असते. 

  1.  लक्ष्मी पूजन सुरु असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करु नयेत. त्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते. 
  2. लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात म्हणजे लक्ष्मीचे स्वागत तुम्ही करत आहात असा त्याचा अर्थ होतो.
  3. लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी. 
  4. पूजाविधी सुरु असताना गाणी किंवा नाच करु नये. त्यामुळे पूजा नीट होत नाही. 
  5. खूप जण फारच घाईत आणि कसेतरी पूजा करतात तसे मुळीच करु नये. 
  6. लक्ष्मीपूजनाच्या आधी देव्हारा आणि देवपुजेचे साहित्य स्वच्छ करुन घ्यावे.
  7. देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवैद्य दाखवला तरी चालतो.

    अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन विधी (Laxmi Kuber Puja Vidhi In Marathi) करावे त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.

वाचा – Information About Tripurari Purnima In Marathi

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावी या वस्तूंची खरेदी | Things To Buy On Laxmi Pujan Marathi

Laxmi Pujan Vidhi Marathi

खरेदी करण्यासाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अगदी शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या साहित्याची किंवा या गोष्टींची खरेदी करायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT
  1. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी आवर्जून सोन्याची खरेदी करायला हवी. सोने हा असा संचय आहे जो तुम्हाला अडचणीच्या काळात कधीही मिळू शकतो. खूप जण सोने घेऊन ठेवतात आणि त्याचा उपयोग ज्यावेळी गरज असेल त्यावेळी सोने मोडून किंवा गहाण ठेवून करता येतो. त्यामुळे या दिवशी अगदी हमखास सोने खरेदी करा. ते तुमच्या धन संचयात वाढ करते. 
  2. झाडूची खरेदी या दिवशी करायलाच हवी. ज्यांना घरात नवा झाडू हवा असेल त्यांनी या दिवशी खरेदी करावा. असे म्हणतात. केरसुणी ही घरातली अशी वस्तू आहे जी घर स्वच्छ ठेवते आणि घरात स्वच्छता ठेवण्याचे काम करते. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. 
  3.  नवी कपड्यांची खरेदी करण्यासही या दिवशी काहीच हरकत नाही. नवीन कपडे घालून पूजा केल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण ही येते. 
  4. नवे वाहन खरेदी करण्यासाठी किंवा ते घरी आणण्यासाठी हा अत्यंत शुभ असा  दिवस मालता जातो. 
  5. घरी एखादी नवीन मशीन आणण्यासाठी किंवा एखादे इलेक्ट्रॉनिक्स वसतू घेण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. 
  6. नवे घर घेण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. त्यामुळे नव्या घराचे बुकींग किवा नव्या घरात राहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. 
  7. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही घरात नवीन पुस्तकांचीही खरेदी करु शकता. 
  8. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची असेल ती देखील तुम्ही या दिवशी करु शकता. 

लक्ष्मीपूजन विधी मराठी (Laxmi Pooja Vidhi In Marathi) जाणून घेतल्यानंतर तुम्ही यंदा अशा पद्धतीने पूजा नक्की करा.

01 Nov 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT