शरीरातील चरबी (fats) एकदा वाढली अथवा वजन एकदा वाढल्यानंतर वजन कमी करणं (weight loss) फारच कठीण वाटतं. विशेषतः महिलांना. पण आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याचा तुम्ही एक महिना वापर केलात तर तुम्ही एका महिन्यात 4 किलो वजन कमी करू शकता. तुम्ही घरातील कामांमधून काही वेळ स्वतःसाठी काढायलाच हवा. कितीही व्यस्त असलात तरीही या काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुमचे वजन एक महिन्यात चार किलो कमी करू शकता. मात्र या टिप्स तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो करायला हव्यात. डाएटसह योग्य व्यायाम केल्याने तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. सर्वात पहिले आपण काय काय करता येतं ते पाहूया.
लग्न झालेल्या महिलांसाठी फॅट लॉस टिप्स (fat loss tips for married women)
आजकाल बहुतांशी महिलांमध्ये थायरॉईडची समस्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे वजनवाढ (weight gain) अत्यंत वेगाने होताना दिसून येते. कितीही प्रयत्न केले तरीही मग वजन कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेषतः लग्नानंतर हार्मोन्समधील बदलामुळेदेखील वजन वाढ होताना दिसून येते. लग्न झाल्यानंतर अनेक बदल होतात आणि मग आपली फिगर अथवा आपले आरोग्य योग्य राहात नाही असं बऱ्याच महिलांना वाटते. तुम्हालाही तुमच्या वजन वाढीची चिंता असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि आम्ही दिलेल्या टिप्सचा वापर करून तुमचे वजन कमी करा.
डाएट चार्ट करा फॉलो
Shutterstock
तुम्ही जिमला जात नसलात तरीही तुम्ही स्वतःसाठी योग्य डाएट चार्ट तयार करून घ्या. संपूर्ण महिना तुम्ही हा योग्य डाएट चार्ट पाळायलाच हवा. कोणत्याही परिस्थितीत हा चार्ट फॉलो करणं सोडू नका. डाएट चार्टनुसारच तुमचे वजन कमी होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आधी पोटभर नाश्ता करणे. यामध्ये कोणतेही तळलेले पदार्थ न खाता शरीराला पोषण देणारे आणि पोट भरणारे असे पदार्थ नाश्त्याला खावेत. अधिक काळ सकाळी उपाशी राहू नये.
चांगले फॅट खावे
शरीराला पोषक तत्व काय हवी आहेत याचा एकदा डाएटिशियनकडून तुम्ही सल्ला घ्या आणि त्यानुसार आपल्या डाएटमध्ये खाण्याचा समावेश करून घ्या. बदामातून शरीराला चांगले फॅट्स मिळतात. त्यामुळे रोज सकाळी किमान दोन बदाम खावे. त्याशिवाय ऑलिव्ह ऑईल आणि सलाडचा उपयोग करावा. यामुळे लवकर भूक लागत नाही. तसंच शरीराला योग्य पोषण मिळतं.
वजन कमी करायचं असेल तर बदला झोपण्याची पद्धत
मल्टिविटामिन कॅप्सुल
जर शक्य असेल तर तुम्ही डाएटसह मल्टिविटामिन अथवा फिश ऑईलची कॅप्सुलही खा. तुम्हाला तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत या गोळीचाही उपयोग करून घेता येतो. म्हणजे तुमच्या शरीरात जास्त थकवा राहतन नाही. वजन कमी झाल्यानंतर येणारा थकवा तुम्हाला जाणवणार नाही.
जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स
10-12 ग्लास पाणी प्या
Freepik
शरीरातील घाण बाहेर येईल तेव्हा चरबी बर्न होते हे तुम्ही लक्षात ठेवा. दिवसभरात तुम्ही किमान 10-12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. कोणताही ऋतू असला तरीही इतके पाणी पोटात जायलाच हवे. पाण्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही लिंबाचा रस पाण्यात घालून प्यायल्यास अधिक सोयीस्कर ठरते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी रोज कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत मिळते. लिंबातील विटामिन सी हे तुमच्या अंगावरील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसेच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा लिंबू खा. तसंच अॅप्पल साईड व्हिनेगर, चिकन ब्रेस्ट, सूप, बदाम, मासे अशा पदार्थांचाही तुम्ही आहारात समावेश करून घ्या. फ्रोझन फूड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.
सालीसकट सफरचंद खाल्ल्याने होते वजन कमी, जाणून घ्या फायदे
व्यायाम करा
Shutterstock
इतर गोष्टी करताना तुम्ही व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष करू नका. किमान रोज एक तास चाला. यामुळे तुम्ही खाल्लेल्या पदार्थांची अतिरिक्त चरबी जमत असेल तर ती जमू न देण्यासाठी तुम्ही व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्यामुळे फारच कमी वेळात तुम्हाला वजन कमी करता येते. रोज नियमित व्यायाम करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक