ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Bhatukal icha khel in marathi

Bhatukali Khel In Marathi | भातुकलीचा खेळ – बालपणीच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न

“भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी….” हे गाणं ऐकत जे लहानाचे मोठे झाले त्यांना भातुकलीचा खेळ (Bhatukali Khel) म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल. अनेकांचे बालपण या खेळाने समृद्ध झालेले असेल. काहीजणींनी तर त्यांची जुनी भातुकली आजवर जपूनही ठेवली असेल. कारण हा नुसता एक बालपणीचा खेळ नसून गृहस्थाश्रमात कसं वागायचं याचा नकळत बालमनावर झालेला संस्कारही होता. प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचं घरकुल हवं असतं. भातुकलीच्या खेळातून लहानपणापासूनच मुलांना घर व्यवस्थापनाचे धडे मिळत असत. एवढंच नाही तर बालपणीचा काळ भुर्रकन उडून गेला तरी आणि भातुकलीच्या खेळातील गोड आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनात कायम राहत असत. मात्र आजकाल व्हिडिओ गेम्सच्या युगात लहान मुलं या खेळापासून काहिशी दुरावली आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे तुमच्या मुलांनाही डिजीटल लर्निंग आणि परीक्षेचा ताण सतावू शकतो. अशा वेळी मुलांना काही मैदानी अथवा शारीरिक हालचाल करणारे खेळ खेळण्याची गरज असते. काळाच्या ओघात विस्मरणात गेल्यामुळे आजकालच्या लहानपिढीला भातुकली या घरात खेळता येणाऱ्या सोप्या खेळाबद्दल फारसं काही माहीत नाही. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत भातुकलीचा खेळ आणि त्याबद्दल बरंच काही… यासोबतच वाचा ‘भोंडला’ महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक पारंपरिक खेळ

भातुकली खेळ परंपरा | Tradition Of Bhatukali In Marathi

शाळेला पूर्वी उन्हाळी अथवा दिवाळीची सुट्टी लागली की अंगणात लहान मुलं-मुली जमून दंगा घालत असत. या खेळात प्रामुख्याने खेळला जात असे तो भातुकलीचा खेळ (bhatukalicha khel). या खेळासाठी प्रत्येकाच्या घरात  खास छोटी भातुकली असे. भातुकली म्हणजे घरातील सर्व वस्तूच्या लहान प्रतिकृती. भांडीकुंडी, कपाट, फ्रीज, डायनिंग टेबल, पंखा, टीव्ही अशा घरातील प्रत्येक वस्तूंच्या या प्रतिकृतींसोबत लहान मुलं मग अंगणात छोटासा संसार मांडत असत. कधी कधी अशा खेळामध्ये  बाहुला- बाहुलीचे लग्न लावले जाई. आणि या बाहुला- बाहुलीचा संसार या भातुकलीमधून खेळत असत. सुट्टी पडल्यावर पूर्वी प्रत्येक घरी दुपारी अंगण, खिडकी, बाल्कनीमध्ये हे दृश्य पाहायला मिळत असे. लहान मुलांसाठी घरातील मोठी मंडळी मग खास लाकडी, पितळी, स्टीलची, मातीची भातुकली तयार करून घेत असत. मात्र काळाच्या ओघात हा खेळ कालबाह्य झाला. ज्यामुळे एक या खेळाचीही  समृद्ध पंरपराच आता नष्ट होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण भातुकलीच्या ऐवजी आता मुलांच्या हातात आले स्मार्ट फोन आणि व्हिडिओ गेम्स.. ज्यामुळे मुलं एकलकोंडी झाली आहेत. त्यांच्यावर एकमेकांना समजून घेण्याचे, शेअर करण्याचे, आनंद वाटण्याेचे संस्कारच होत नाहीत. शिवाय लहान मुलांसाठी छोटी भातुकली तयार करणारे अनेक उद्योगही आता बंद होत आहेत. यासाठीच पुन्हा एकदा या खेळाचे महत्त्व आणि ही गोड परंपरा जपण्याची वेळ आली आहे. 

वाचा सोळा संस्कारांपैकी एक असलेला जावळ विधी कसा करावा

भातुकलीचा खेळ प्रकार | Types Of Bhatukali In Marathi

भातुकलीचा खेळ (Bhatukalicha Khel) प्रकार म्हणजेच भातुकलीची खेळणी ही पूर्वी जत्रा, बाजार, यात्रेत मिळत असत. भातुकलीच्या खेळण्यांसाठी पूर्वीच्या काळी खास दुकाने नव्हती. मात्र आजकाल अनेक ठिकाणी आणि ऑनलाईन ही भातुकलीची खेळणी विकत मिळतात.

ADVERTISEMENT

लाकडाची भातुकली खेळ (Wooden Bhatukali Khel)

Bhatukalicha Khel In Marathi
Bhatukalicha Khel In Marathi

कोकणात सावंतवाडीमध्ये खास लाकडाची खेळणी मिळतात. या  खेळण्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठ अनेक प्रकार असतात. जसं की गाडी, भोवरे, खुळखुळे. पण यात आकर्षक असतात ती भातुकलीची खेळणी. बऱ्याचदा घरात पोळपाट, बसण्याचा पाट, भाजी चिरण्याचा  पाट, चौरंग, दही घुसण्याची रवी, धान्य पाखडण्याचे सूप, विळी लाकडीच असते. पूर्वी घरात लाकडी उखळ, दगडी जातंही असे. अशी खरी खुरी वाटणारी भांडी जेव्हा लहानमुलांच्या भातुकलीमध्ये जमा होतात. तेव्हा त्यांना आपण खराच स्वयंपाक करत आहोत असं वाटतं. या लाकडी खेळण्यांमध्ये लाकडी फळंदेखील असतात. छोटा डायनिंग टेबल, खुर्च्या आणि त्यावर खरी वाटणारी लाकडी फळं तुमच्या मुलांच्या भातुकलीची शोभा आणखी वाढवतात. यासोबतच वाचा कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family)

स्टेनलेस स्टील भातुकली खेळ (Stainless Steel Bhatukali Khel)

Bhatukalicha Khel In Marathi
Bhatukalicha Khel In Marathi

जत्रा, यात्रा आणि तीर्थक्षेत्री आजही स्टीलची खेळणी विकत मिळतात. ज्यामध्ये हंडा, कळशी, पाण्याची बादली, लहान पातेले, चिमटा, चूल अथवा गॅस शेगडी आणि कुकर असे. बऱ्याचदा भांड्यासाठी छोटी मांडणी सोबत मिळते. ज्यामध्ये ही भांडीकुंडी लावलेली असतात. लहान मुलांना ही स्टीलची खेळणी फार आवडतात. कारण ही भांडी हुबेहूब स्वयंपाक घरातील मोठ्या भांड्याप्रमाणेच दिसतात. लहान मुलींना या खेळण्यातू आपण आईप्रमाणेच खरा खुरा स्वयंपाक करत आहोत असे वाटू शकतं. 

टेराकोटा आणि स्टोन भातुकली खेळ (Terracotta And Stone Bhatukali Khel)

Bhatukalicha Khel In Marathi
Bhatukalicha Khel In Marathi

आजकाल तांबा, पितळ आणि स्टीलची भातुकली दिसत नसली तरी मातीची अथवा टेराकोटा भातुकली मात्र तुम्हाला सहज मिळू शकते. कारण मातीच्या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा परत आला आहे. टेराकोटा या  कलेला ही एक पांरपरिक संस्कृती आहे. टेराकोटा क्लेपासून अनेक जण घरी देखील सुंदर कलाकृती बनवत असतात. याचाच  एक भाग म्हणजे मातीची भांडीकुंडी अथवा टेराकोटा भातुकली. ज्यामध्ये छोटे छोटे हंडा, कळशी, स्वयंपाकाचे टोप, बादली, पोळपाट लाटणं, चुल, कुकर, कपबशी अशी अनेक भांडी मिळतात. मात्र ही भांडी बऱ्याचदा केवळ शोसाठी ठेवली जातात. कारण खेळताना मुलांच्या हातून ती तुटण्याची जास्त शक्यता असते. 

तांबा-पितळ भातुकली खेळ (Brass And Copper Bhatukali Khel)

Bhatukalicha Khel In Marathi
Bhatukalicha Khel In Marathi

पुण्यातील तुळशीबागेत अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री हमखास मिळतात तांब्या-पितळ्याची भातुकली. या भांड्यामध्ये पाहताना ऐश्वर्याची अनुभूती येते. पूर्वी घरात अशी तांब्या-पितळीची भांडी भरपूर असत. मात्र स्वच्छ करण्यास कष्ट पडत असल्यामुळे आता खऱ्या खुऱ्या किचनमधूनही ही भांडी हद्दपार झाली आहेत. मात्र अनेक घरात आजही जुना वारसा जपण्यासाठी अथवा एथनिक लुक देण्यासाठी या भांड्यांचा वापर केला जातो. लहान मुलांच्या भातुकलीमध्ये हंडा, कळशी, बंब, घंघाळ, टाकी यांचा समावेश असतो. ज्यामुळे आजही मुलांना पूर्वीच्या तांब्या पितळी भांड्याची पंरपरा समजू शकते. 

ADVERTISEMENT

प्लास्टीक भातुकली खेळ (Plastic Bhatukali Khel)

Bhatukalicha Khel In Marathi
Bhatukalicha Khel In Marathi

प्लास्टिकची भांडी ही आधूनिक खेळण्यांचा एक भाग आहे. आजकाल लहान मुलींसाठी ऑनलाईन प्लास्टिकचे किचन सेट विकत मिळतात, ज्यामध्ये बार्बीचे किचनही असते. या खेळण्यांमध्ये आजकाल घरांमध्ये झालेल्या बदलानुसार किचन हॉब, कुकर, फूड प्रोसेसर, कुकिंग पॅन, ओव्हन असतात. ही खेळणी स्वस्त आणि आकर्षक असली तरी लहान मुलं खेळणाना ती तोंडात घालू शकतात. प्लास्टिक आरोग्यासाठी हितकारक नसल्यामुळे प्रत्येक पालकाने स्वतःच्या जबाबदारीवर ही खेळणी मुलांना खेळण्यास द्यावी. यासोबत वाचा सर्वांसमोर का हट्ट करतात लहान मुलं, करा हे उपाय

भातुकली बालगीत BHatukali Rhymes In Marathi

एखादा खेळ मांडला की त्याला भव्य दिव्य स्वरूप देण्यासाठी पूर्वी गाणी, कवितांची जोड दिली जात असे. ज्यामुळे पारंपरिक खेळामध्ये आणखी रंगत येत असे. यासाठीच आतुकली भातुकली हे बालगीत खास भातुकलीच्या खेळातील आठवणी जागे करणारे.

आतुकली-भातुकली

शाळा संपली, सुटी लागली

मित्रमैत्रिणी जमू लागली,

ADVERTISEMENT

खेळू आतुकली – भातुकली

खेळणारी भारीच धीटूकली.

स्वयंपाक बनवला, रूचकर झाला

ढेकर मात्र मोठा आला,

ADVERTISEMENT

भांडी कुंडी घासली

पितांबरीने चकचकीत झाली.

दुपारची कामे उरकून घेतली

उन्हे गेली तिन्ही सांज झाली,

ADVERTISEMENT

पुन्हा स्वयंपाकाची तयारी

कंटाळाच आला भारी.

नुसतेच केले भात पिठले

कोणाला नाही आवडले,

ADVERTISEMENT

आईबाबांनी खाल्ले

आमचे पोट भरले.

– अनामिक

मांडू खेळ भातुकलीचा

आपण सारे संगतीने

ADVERTISEMENT

खेळ खेळूया गमतीने, 

मांडू खेळ भातुकलीचा

बाहुला बाहुलीच्या लग्नाचा.

नक्कल करूया आईची

ADVERTISEMENT

खोडी काढूया ताईची,

बाबांच्या पाठीवर सपाटा

दादाला घालू धपाटा.

चिऊला दाणे देऊ या

ADVERTISEMENT

माऊच्या मागे धाऊया,

धुड धुड धुडगुस घालू या

बडबड गाणी गाऊ या.

– आनंद

ADVERTISEMENT

लहानपणीचे असे अनेक खेळ न खेळण्यामुळे अथवा आताच्या पिढीला माहीत नसल्यामुळे कालबाह्य होत आहेत. मोबाईल फोन आणि व्हिडिओ गेम्सच्या दुष्टचक्रात अडकेलेल्या लहान मुलांना त्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यांना भातुकलीच्या खेळासारख्या पारंपरिक खेळांची ओढ जरूर लावायला हवी. 

17 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT