ADVERTISEMENT
home / बिग बॉस
बिग बॉस 14′ चा ग्रँड प्रिमियर होणार ‘या’ दिवशी, लवकरच कळणार थीम

बिग बॉस 14′ चा ग्रँड प्रिमियर होणार ‘या’ दिवशी, लवकरच कळणार थीम

लॉकडाऊनमुळे बऱ्याच मालिका बंद होत्या. पण आता हळूहळू सर्व काही पूर्ववत होत आहे. आता अशाच प्रकारे काम करायचं आहे हे सर्वांनी स्वीकारलं असून लवकरच सर्वांचा आवडता शो ‘बिग बॉस 14’ देखील सुरू होत आहे. चाहत्यांना आता जास्त वाट पाहायला लागणार नसून या शो च्या निर्मात्यांनी ग्रँड प्रिमियरची तारीख घोषित केली आहे. ‘बिग बॉस 14’ वा सीझन 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबद्दल सलमान खानचा नवा प्रोमोदेखील पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा घरबसल्या चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे. या शो चे अनेक चाहते आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये ‘बिग बॉस’ म्हणजे नक्की काय असू शकतं याचा अनुभव सगळ्यांनाच आला आहे. यातील भांडणं, प्रेम आणि गेम्स यामुळे नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. आता लवकरच हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यसाठी येत आहे.

करिश्मा कपूरचा कमबॅक, अभिनेत्री नाही दिसणार निर्मातीच्या भूमिकेत

काय आहे खास?

‘बिग बॉस 14’ चा प्रोमोदेखील आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान शो बद्दल सांगत असून अजूनपर्यंत कोणती थीम आहे हे मात्र गुलदस्त्याच आहे. पण या शो ची टॅगलाईन आहे आता 2020 ची समस्या दूर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर हा शो अवलंबून असेल असं वाटत आहे. लॉकडाऊन हीच या शो ची थीम असावी असा अंदाज आता चाहते करत  आहेत. सलमान खान याामध्ये साखळदंड लाऊन बंदिस्त दिसत असून त्याच्या तोंडावर मास्कही दिसत आहे. सर्वात पहिले सलमान मास्क हटवतो आणि मग साखळदंड तोडतो. त्यामुळे कोरोना व्हायरसशी संबंधितच ही थीम असावी असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. तसंच या लॉकडाऊनची आता दूर जाण्याची वेळ आली आहे असं म्हणायचं असावं असाही अंदाज लावला जात आहे. तसंच 2020 या वर्षाला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे असंही सलमान या प्रोमोमध्ये म्हणत आहे. दरम्यान हर सीन उलटा करण्याची गोष्टही यात सांगण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. त्यामुळे नक्की कोणती थीम असेल याचा अंदाज करणंही थोडं चाहत्यांना कठीण होत आहे. पण पहिल्यात प्रोमोने नक्कीच प्रेक्षकांची आणि चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे यात दुमत नाही. 

“चोरीचा मामला” मराठी चित्रपट आता पाच भाषांमध्ये

ADVERTISEMENT

शो मध्ये कोण कोण असणार?

नेहमीच या शो मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. मागच्या सीझनमध्ये खूपच मोठी नावं होती आणि मागचा सीझन हा भांडणं आणि प्रेम या दोन्ही गोष्टींमुळे गाजला. इतकंच नाही या सीझनची लोकप्रियता इतकी होती की, तीन महिन्यांऐवजी पाच महिने हा शो चालला. त्यामुळे यावेळी अशी कोणती नावं असतील जेणेकरून प्रेक्षकांना हा शो पाहावासा वाटेल याचीही आता उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र नेहमीप्रमाणेच ‘बिग बॉस 14’ च्या स्पर्धकांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना आता 3 ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे. सलमान खान या शो चे चित्रीकरण लाईव्ह प्रेक्षकांसह करणार नाही. तर स्पर्धकांना काही दिवस आधीच क्वारंटाईन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणते स्पर्धक आहेत ते तर आधीच ठरलेले असून लवकरच यावर पडदा उठेल. 

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT