ADVERTISEMENT
home / मनोरंजन
jay bhanushali

Bigg Boss 15: हा स्पर्धक घेतो सर्वाधिक मानधन, थक्क व्हाल

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. 2 ऑक्टोबरला या रियालिटी शो चा ग्रँड प्रिमियर झाला आणि घरात प्रवेश करणारा पहिला स्पर्धक ठरला तो म्हणजे अभिनेता – निवेदक जय भानुशाली (Jay Bhanushali). बिग बॉसच्या घराची ओळख जयला स्वतः सलमान खानने (Salman Khan) करून दिली. या संपूर्ण आठवड्यात बिग बॉसच्या घरात जय आणि करण कुंद्रा (Karan Kundra) या दोघांनी अक्षरशः ओटीटीमधील प्रतीक सहजपाल (Pratik Sahjpal), शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि निशांत भट (Nishant Bhat) यांना सळो की पळो करून सोडलं आहे. आता या सगळ्याचा निकाल शनिवार आणि रविवारच्या भागात नक्की काय लागणार हे कळेलच. पण हा आठवडा प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचा ठरला आहे. तर यावर्षी सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक म्हणून जय भानुशालीचे नाव समोर येत आहे. जय भानुशाली या शो मध्ये सहभागी होणार हे अगदी शेवटच्या क्षणी ठरले. त्यामुळे त्याचा कोणताही प्रोमो शेअर करण्यात आला नव्हता. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे करणार मरणोत्तर अवयव दान

एका आठवड्यात कमावतो 11 लाख

जय भानुशालीला बिग बॉसमध्ये बघून नक्कीच त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. यापूर्वी पाहुणा म्हणून या घरात अनेकदा जय येऊन गेला आहे. मात्र स्पर्धक म्हणून जय या घरात कमाल मनोरंजन करत आहे. एखाद्याबरोबर मजा मस्ती असो अथवा प्रतीकबरोबरचे भांडण असो जय भानुशालीने या आठवड्यात सर्वांनाच मसाला दिला आहे. पण जयने बिग बॉसमध्ये येण्यासाठी किती फी आकारली आहे तुम्हाला माहीत आहे का? एका दिवसासाठी जय 1 लाख 65 हजार इतके शुल्क आकारत आहे. अर्थात त्याची आठवड्याची कमाई आहे 11 लाख रूपये. त्यामुळे बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू म्हणून जय भानुशाली याचे नाव घेतले जात आहे.

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : विकास झाला मुलाच्या आठवणीत भावूक

ADVERTISEMENT

प्रतीक आहे जयच्या निशाण्यावर

पहिल्याच दोन दिवसात जय आणि प्रतीक यांच्यामध्ये घमासान भांडण झालेले पाहायला मिळाले. तर या भांडणामुळे बिग बॉसच्या घराचेही नुकसान झाले आहे. प्रतीकने रागात फोडलेल्या काचेमुळे जंगलवासीय सर्व स्पर्धक पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झालेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता प्रतीक हा सर्वांसाठीच वाईट झाला आहे. तर जय आणि प्रतीक यांच्यामध्ये सतत धुसफूस दिसून येत आहे. बिग बॉसचा हा सीझन पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करत आहे. तर जय आणि करण कुंद्रा या दोघांनीही आपला गेम खेळायला सुरूवात केली असून सर्वांवर भारी पडताना दिसून येत आहे. यामध्ये अनेक वेळा त्यांच्याही चुका बाहेर सोशल मीडियावर काढल्या जात आहेत. पण या सगळ्याचा परिणाम आता विकेंड का वारमध्ये नक्की काय होणार याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खान आता नक्की कोणाची बाजू घेणार आणि कोणाला ओरडणार हेच आता प्रेक्षकांना बघायचे आहे. तर जयने स्वतः म्हटले आहे की, त्याला आता विकेंड का वारमध्ये नक्की काय होतंय ते पाहायचं आहे. कारण बिग बॉसने घेतलेला निर्णय जयला पटलेला नाही. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : घरात पडू लागली आहे फूट, स्नेहा तयार करतेय का नवा गट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT