ADVERTISEMENT
home / बिग बॉस
घरात पडतेय का फूट

Bigg Boss Marathi : घरात पडू लागली आहे फूट, स्नेहा तयार करतेय का नवा गट

 Bigg Boss च्या घरात कधी कोणती समीकरणं बदलतील हे कधीही सांगता येत नाही. या घरात कधी एकत्र राहणारी लोकं अचानक एकमेकांविरुद्ध होऊन भांडायला लागतात हे कळत नाही. या घरात अगदी पहिल्या दिवसापासून एक गट दिसून आला आहे. तो म्हणजे उत्कर्ष, मीरा, जय, गायत्री, अक्षय, स्नेहा, तृप्ती, दादूस अशी टीम दिसून आली होती. तर दुसरीकडे विकास, विशाल, सोनाली, मीनल असा गट दिसून आला होता. पण आता घरात काहींचे चेहरे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे घरात आता एक तिसरा गट दिसून येत आहे. तो म्हणजे सोनाली, विशाल, सुरेखा, स्नेहा असे एकत्र येताना दिसून आले आहे. त्यामुळे आता स्नेहा आणि सोनाली नवा गट करताना दिसत आहे.

Bigg Boss 15: विशाल कोटीयन आहे घरचा विनोदी बातमीदार, पहिल्याच दिवसापासून होतेय चर्चा

टास्कनंतर बदलली समीकरण

नॉमिनेशन टास्क खेळताना फोन चार्जिंगला लावायचा होता. ज्याचा फोन चार्जिंगला लागणार नाही ती लोकं नॉमिनेट होणार होते. या टास्कमध्ये स्नेहा, विशाल, तृप्ती, अक्षय, संतोष हे नॉमिनेट झाले. उत्कर्षच्या गटातील ही लोकं असून सुद्धा यांचा काटा हा त्याच गटातील लोकांनी काढल्यामुळे स्नेहा हिचा पारा चांगलाच चढलेला दिसत आहे. स्नेहा त्या गटात गेल्यामुळे तिला नॉमिनेशनचा झटका बसला आहे. त्यामुळे उत्कर्ष आणि जयच्या गटामध्ये फूट पडताना दिसत आहे.  त्यामुळे आता तृप्ती, दादूस, सुरेखा यांना देखील प्रश्न पडू  लागला आहे की, गट A हा काहीतरी गडबड करत आहे. त्यामुळे सुरेखा आता त्या गटापासून थोडे वेगळे होताना दिसत आहे. नॉमिनेशन टास्कनंतर अनेकांची मने दुखावल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे उघडले आहेत. 

 विकासबद्दलही मनात शंका

विकास या घरात फेअर गेम खेळताना दिसत आहे. पण आता टास्कनंतर दगा कोण देत आहे. त्याचा शोध घरातले लावताना दिसत आहे. त्यामुळेच की काय आता खूप जणांबद्दल चर्चा होताना दिसत आहे.  विकासने गेम केला असे देखील त्याच्या गटातील लोकांना वाटले आहे. पण असे होत असताना विकास-विशालची दोस्ती तुटू नये असे देखील अनेकांना वाटत आहे. विकाससोबत असणाऱ्यांनी  गैरसमज केल्यामुळे आता त्यांच्या गटातही असा परिणाम दिसून येईल का अशी शंका निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

सुरु झालाय जिंकू किंवा लढू टास्क

घऱात आता एकामागोमाग एक टास्क सुरु झाले आहेत. घरात टिकून राहण्यासाठी आता टास्क सुरु झाले आहे. त्यापैकीच एक आहे तो म्हणजे ‘जिंकू किंवा मरु टास्क’ सुरु झाला आहे. या गटांतर्गत घरातील लोकांना फर्निचर वापरता येणार नाही. घऱातील काही सदस्यांच्या हातात काही अधिकार असल्यामुळे आत या फर्निचरमुळे वाद होताना दिसणार आहे. आता या टास्कनंतर घरातील आणखी काही समीकरण देखील बदलताना दिसणार आहे.

विशाल- सोनालीची मैत्री 

हे घर कधी होणाला प्रेमात पाडायला लावेल हे देखील कळणार नाही. घरात काही जण एकमेकांना जवळ येताना दिसत आहे. विशाल- सोनाली एकत्र येताना दिसत आहे. त्यांना एकमेकांची काळजी मैत्रीच्या पलीकडे जाऊन दिसू लागली आहे. अस्सल कोल्हापुरी असलेली सोनाली- विशालची काळजी घेताना आणि तो तिची काळजी घेताना दिसत आहे. 

त्यामुळे आता घरात फूट पडू लागल्यामुळे आता घरात ही वेगळी समीकरणं दिसून येणार आहे.

Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे करणार मरणोत्तर अवयव दान

ADVERTISEMENT
07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT