home / मनोरंजन
bigg boss 15

BB15: अभिजित बिचुकलेचा माज, सलमानच्या बोलण्यानेही पडला नाही फरक

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) चालू झालेल्या दिवसापासूनच वादात आहे. यावर्षी म्हणावा तितका या रियालिटी शो ला प्रतिसाद नसला तरीही सध्या करण – तेजा (Karan Kundrra – Tejasswi Prakash) यांच्यातील वाद, करण सतत तेजस्वीला देत असलेली चुकीची वागणूक आणि अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) याचा माजुरडेपणा यामुळे ट्रेंडमध्ये आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खानच्या (Salman Khan) बोलण्यानंतरही अभिजितवर काहीही फरक पडलेला नाही. उलट सलमानच्या बोलण्यानंतर आणि नेहा भासीनच्या आरोपनंतर अभिजित बिचुकले अधिक बिथरला असून शो मधून आताच्या आता बाहेर काढा अशा पद्धतीचा माज दाखवत अत्यंत हीन पातळीची वागणूक दर्शविली आहे. 

अधिक वाचा – अखेर आमिर अली आणि संजिदा शेख विभक्त

नेहा भासीनला धमकी 

विकेंड वारच्या (Weekend War) आधी एक प्रोमो प्रसारित करण्यात आला होता. जो अत्यंत व्हायरल झाला. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून देण्यासाठी एक पॅनल बोलाविण्यात आले होते, ज्यामध्ये नेहा भासीन (Neha Bhasin), गीता कपूर (Geeta Kapur), दिव्या अग्रवाल (Divya Aggarwal), विशाल शर्मा (Vishal Sharma), कश्मेरा शाह (Kashmera Shah) यांनी वर्णी लावली होती. यावेळी नेहा भासीन या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेवर प्रचंड संतापली असल्याचे दिसून आले. यामध्ये सेलिब्रिटी नक्की काय करत आहेत आणि त्यांच्या काय चुका आहेत याबाबत सांगत असताना नेहाने अभिजीतला सांगितले की, ‘पैर की जूती बोलेंगे ना तो जुते से मारूंगी अंदर आकर’ यावर अभिजितने नेहाला रागात उत्तर देताना म्हटले की, ‘मेरी भाभी है ना टकली करेगी तुझको’. अभिजीतच्या या उत्तरानंतर सर्वांनाच धक्का बसलेला दिसून येत आहे. मात्र त्यानंतर नेहाच्या रागाचा पारा अधिक वाढला असून तिने तुझ्याशी बोलण्याइतकी तुझी लायकीच नाही असंही म्हटलेले दिसून येत आहे. 

अधिक वाचा – धक्कादायक! कपिल शर्मा फेम या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

शमिताने दिले दिव्याला उलट उत्तर 

Bigg Boss OTT विजेती दिव्या अगरवालने शमिताला (Shamita Shetty) म्हटले की, तिची जी वागण्याची पद्धत आहे त्यावरून ती अजून चार सीझन आली तरीही जिंकू शकत नाही. त्यावर दिव्याला उलट उत्तर देत शमिताने तिला फटकारले. तुला तर या सीझनसाठी विचारणाही झाली नाहीये. त्यामुळे तू काहीही बोलू नकोस असं म्हणत शमिताने दिव्याला उलट उत्तर दिलेले या प्रोमोमधून दिसून आले. तर या विकेंडच्या वार भागामध्ये सर्वांनीच एकमेकांना उलटसुलट बोलल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये याचा परिणाम नक्की काय होणार हेच बघावं लागणार आहे. करण आणि तेजस्वीचे नाते पुढे जाणे शक्य नाही असंच दिसून येत आहे तर अभिजीत सतत आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून चूकच करत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान रागात चुकीचे वागल्यामुळे उमर रियाज (Umar Riaz) स्पर्धेतून बाद झाला आहे. मात्र आता फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे या रेसमध्ये कोण टिकून राहणार आणि कोण बाहेर जाणार याचीही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण सध्या दिसत असलेल्या चित्रानुसार नक्की कोण राहील आणि कोण बाहेर जाईल हे सांगणे कठीणच आहे. कारण तगडे स्पर्धकही यातून कधीच बाहेर गेलेले दिसून आले आहे. 

अधिक वाचा – झिम्माचे रेकॅार्डब्रेक अर्धशतक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text