ADVERTISEMENT
home / मनोरंजन
zimma

झिम्माचे रेकॅार्डब्रेक अर्धशतक

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे ‘झिम्मा’ (Zimma). 19 नोव्हेंबरला 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून सिनेसृष्टीतूनही ‘झिम्मा’ ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा अद्यापही सुरुच आहे. ‘झिम्मा’चे नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले असूनही या चित्रपटाने हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवला आहे . खरंतर कोरोना निर्बंधांमुळे सर्व थिएटर पन्नास टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. त्यातही बॅालिवूडचे अनेक चित्रपट शर्यतीत असतानाही उत्तम कथालेखन, दिग्दर्शन आणि तगड्या स्टारकास्टच्या बळावर ‘झिम्मा’ने अर्धशतकाचा टप्पा गाठला आहे . इतकेच नाही तर बॅाक्स ॲाफिसवरही 50 दिवसात तब्बल 14 करोडची कमाई केली आहे. 50 व्या दिवशी झिम्मा 80 हून अधिक सिनेमागृहांमधे आहे हा एक रेकॅार्ड आहे. चित्रपटगृहात ‘झिम्मा’चे यशस्वी पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. 

अधिक वाचा – अखेर आमिर अली आणि संजिदा शेख विभक्त

गावोगावी पोहचला झिम्मा 

‘झिम्मा’ हा चित्रपट फक्त मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी पोहोचला जेथे ग्रामीण स्त्रियांनी मागण्या करून या चित्रपटाला त्यांच्या गावातील थिएटर मध्ये आणायला भाग पाडले.  तसेच यावेळी असा काही  ग्रामीण महिला वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला ज्यांनी ‘झिम्मा’ च्या निमित्ताने  पहिल्यांदा  थिएटरमध्ये जाउन त्यांचा पहिला सिनेमा पाहिला. हे सर्व पाहून अतिशय आनंद होतो की ग्रामीण लोक आणी विशेषतः महिला वर्ग सुद्धा आज मराठी चित्रपटाला इतका भरभरून पाठींबा देत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुहास जोशी (Suhas Joshi), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग (Kshitee Jog), सोनाली (Sonalee Kulkarni), सायली संजीव (Sayali Sanjeev), मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अधिक वाचा – तनिषा मुखर्जीने केलं लग्नाचं सत्य उघड, यासाठी पायात घालते जोडवी

ADVERTISEMENT

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद 

‘झिम्मा’ला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियेबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) सांगितले की,  ‘’सर्वप्रथम ‘झिम्मा’ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच बर्‍याच वर्षांनी एखादा मराठी चित्रपट इतके दिवस थिएटरमध्ये टिकून राहिला असून लॉकडाऊननंतर सलग पन्नास दिवस महाराष्ट्रभर थिएटरमध्ये चालणारा ‘झिम्मा’ पहिला चित्रपट ठरला आहे. याचा निश्चितच खूप आनंद व अभिमान वाटत आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि चांगल्या विषयांवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तसेच प्रेक्षकांकडून अनेक भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या कलाकृतीला मिळणार्या या सकारात्मक प्रतिक्रयेमुळे एक समाधान आहे आणि या सगळ्याचे श्रेय ‘झिम्मा’च्या टीमला आणि साहजिकच प्रेक्षकांना जाते.’’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या आयुष्यात जगतानाचे अनुभव सर्वांना मनोमनी पटले आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने अगदी सहज अभिनय करून प्रेक्षकांच्या मनातही घर निर्माण केले आहे. त्यामुळेच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असल्याचे दिसून येते आहे. 

अधिक वाचा – धक्कादायक! कपिल शर्मा फेम या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT