ADVERTISEMENT
home / बिग बॉस
#BBM2 नंतर शिवानी सुर्वेची दुहेरी भरारी

#BBM2 नंतर शिवानी सुर्वेची दुहेरी भरारी

Bigg Boss Marathi 2 च्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करियरचा टर्निंग पॉईंट ठरला आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांची लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर सुरू होणार आहे फिल्म इंडस्ट्रीतील घोडदौड. त्यामुळे मध्यंतरी काहीसं स्लो झालेलं तिचं करिअर पुन्हा एकदा वेग घेताना दिसतंय.

शिवानीच्या करिअरला मिळालं बूस्ट

शिवानी सुर्वेने तिच्या गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा एकमेव रिएलिटी शो केला. तिच्या या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनंही जिंकली आणि काही प्रमाणात तिच्यावर टिकाही झाली. आता टेलीव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वेने सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.

शिवानीचा लकी ऑक्टोबर

ADVERTISEMENT

शिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. यापैकी एक सिनेमा अंकुश चौधरीसोबतचा ट्रिपल सीट असून दुसरा हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित सातारचा सलमान हा आहे. हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे शिवानी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.

तीन वर्षांच्या गॅपनंतर येणार शिवानीचा सिनेमा

2016 ला शिवानीचा ‘घंटा’ हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दुनियेत पुन्हा एकदा एंट्री करताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.

बिग बॉसचं घर शिवानीलाही ठरलं लकी

ADVERTISEMENT

सूत्रांनुसार, शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीतून बाहेर पडणारी एकुलती एक अशी कंटेस्टंट आहे. जी बिग बॉसच्या घराबाहेर पडताच तिचे दोन मोठे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या घरातून प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेऊन घरी काही काळासाठी परतलेल्या शिवानीला अजून दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत. ज्यावर आता शिवानी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर घरातून बाहेर आल्यावर विचार करणार असल्याचं कळतंय.

शिवानीसोबतच नेहा आणि माधवचाही येणार सिनेमा

बिग बॉसचं घर फक्त शिवानीलाच नाहीतर माधव देवचक्के आणि नेहा शितोळेलाही लकी ठरलं आहे. एकीकडे माधवला बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सुभाष घईंचा विजेता हा मल्टीस्टारर सिनेमा मिळाला तर दुसरीकडे नेहा शितोळेला तर बिग बॉसच्या घरात असतानाच येरे येरे पैसा 3 मध्ये तिला भूमिका मिळाली आहे.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

BBM2 : दिवसेंदिवस वाढतेय शिवानीची लोकप्रियता

#BBM चा स्पर्धक पुष्कर जोगच्या नात्यात सई लोकुरमुळे आला दुरावा

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

 

ADVERTISEMENT
26 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT