ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरचा रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरचा रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर बॉलीवूडचं एक रोमॅंटिक कपल आहे. हे दोघं नेहमीच एकमेंकांवरील प्रेम सोशल मीडियावर जाहीरपणे शेअर करत असतात. बिपाशाने 2016 मध्ये करण सिंहसोबत विवाह केला. या दोघांचे अनेक चाहते आहेत. ज्यामुळे त्यांच्या प्रेमाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात.  नुकतंच या दोघांच्या मंकी लव्हची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांचं एकमेकांवरील प्रेम दिसून येत आहे. 

बिपाशा आणि करणचं मंकी लव्ह

बिपाशा बासूने इन्स्टाग्रामवर तिचा आणि करणचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे.  ज्यामध्ये ते दोघं एकमेकांना रोमॅंटिक पद्धतीने किस करताना दिसत आहे. शिवाय तीने यासोबत एक भावनिक मेसेजही लिहीला आहे. बिपाशाने शेअर केलं आहे की, “मला फक्त तुझी गरज आहे”

बिपाशा आणि करण बॉलीवूडची रोमॅंटिक जोडी

बिपाशा आणि करण लग्नानंतर अनेकदा एकत्र दिसतात. सोशल मीडियावरील एक हॉट आणि सेक्सी जोडी म्हणून त्यांची ओळख आहे. बिपाशाने करणसोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. अनेक ब्रॅंडचे ते दोघंही ब्रॅंड अॅंम्बेसेडर आहेत. या शिवाय त्या दोघांनी अलोन या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर बिपाशा बासू चित्रपटसृष्टीपासून दूरावली. करण मात्र त्यानंतर कसौटी जिंदगी की या हिंदी मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये मिस्टर बजाजच्या भूमिकेत दिसला होता. मात्र काही काळानंतर त्याने हा शो सोडला. मात्र हे दोघंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. काही दिवसांपासून बिपाशाच्या प्रेंगन्सीच्या चर्चादेखील चाहत्यांमध्ये सुरू आहेत. मात्र याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

करणचं बिपाशाची लव्हस्टोरी

बिपाशाच्या प्रेमात पडण्यापूर्वी करणचं जेनिफरसोबत आणि बिपाशाचं जॉन इब्राहिमसोबत अफेअर होतं. मात्र जेनिफर आणि करणच्या नात्यात दूरावा आला. जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर लोकप्रिय हिंदी मालिका ‘दिल मिल गए’ मध्ये काम करता करता एकमेंकांच्या जवळ आले. काही वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. जेनिफर आणि करणची जोडी टेलीव्हिजन माध्यमातील एक हिट जोडी होती. जेनिफरच्या मते, “लग्न  हे एक सुंदर नातं असतं. जेव्हा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदतात तेव्हा हे नातं आणखी बहरतं. मात्र कधी कधी माणसांच्या जीवनात काही चुका घडतात. आपल्या चुकांचे परिणाम आपल्या जोडीदाराला भोगावे लागतात हे नक्कीच योग्य नाही. करणसोबत असलेल्या नात्याविषयी माझ्या मनात कोणत्याही कडू आठवणी नाहीत. उलट मी करणची आभारी आहे की त्याने योग्य वेळी मला सोडून दिले. नाहीतर मला माझं कोण आणि परकं कोण हे कधीच समजू शकलं नसतं. त्या काळात मला माझ्या जवळच्या लोकांनी चांगली साथ दिली.  त्यामुळे घटस्फोटानंतर मी आणखी स्ट्रॉंग होऊ शकले आहे. पूर्वी मी विचार न करता निर्णय घेत होते आता मात्र मी कोणताही निर्णय विचारपूर्वक घेऊ लागले आहे. शिवाय घटस्फोटाच्या निर्णयामुळे मी आता माझ्या जीवनात पुढे जाण्यात यशस्वी झाले आहे.” नातं तुटल्यावर अनेक लोक निराश होतात, काहीजण डिप्रेशनच्या आहारी जातात मात्र या दोघांनी त्यांच्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. जेनिफरसोबत घटस्फोट झाल्यावर करणने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केलं आहे. करणचे हे तिसरे लग्न आहे. मात्र करण आणि बिपाशाचं एकमेकांवर खरं प्रेम आहे ज्यामुळे ते दोघांच्या प्रेमात  आजही आखंड बुडालेले आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या या फोटोमुळे त्यांच्या प्रेमाची कबुली मिळत आहे.  

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

अरे बापरे पुन्हा एकदा #MeToo,सोना महोपात्राने केले या गायकावर आरोप

स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी केलं फक्कड जेवण

जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाहीFB bipasha basu shares romantic moments with karan singh grover

ADVERTISEMENT

 

05 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT