Big boss मराठीचा सीझन 2 चांगलाच गाजतोय तो या घरात असलेल्या एकमेव राजकीय नेत्यामुळे.. आता हा राजकीय नेता काय लोकांना नवीन राहिला नाही. स्वत:ला राजकीय नेता आणि कवी म्हणवून घेणारा हा अभिजीत बिचुकले सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याला चक्क घराबाहेरुन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे केली गेली असून एका भाजपच्या माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे. या मागणीनंतर बिचुकलेला खरचं घराबाहेर काढणार का?
का करायचे बिचुकलेला घरातून बेघर ?
बिग बॉस सुरु होऊन आता महिना पूर्ण होईल. या महिन्याभरात या घरात कित्येकांची भांडणे झाली. तर अनेक कॉन्ट्राव्हर्सीजही झाल्या. अगदी पहिल्या दिवसापासून या घरात धुमाकूळ घातला आहे तो अभिजीत बिचुकलेने. साताऱ्यातील अभिजीत बिचुकलेचे महिलांप्रतीचे बोलणे आतापर्यंत अनेकांना खटकले आहे. महिलांना किंमत न देणारे आणि त्यांना हिडीस फिडीस करणारे शब्द वापरणारा बिचुकले त्यामुळेच अनेकांना घरात आवडत नाही. एका टास्कदरम्यान रुपालीच्या आयुष्यातील खासगी गोष्टी काढून त्याने तिच्याबद्दल अपशब्द काझायला सुरुवात केली. त्यांच्या याच वागण्यामुळे आणि स्त्रीदाक्षिण्यता त्याच्या अंगी नसल्यामुळे त्याच्याकडून समाजाला एक चुकीचा संदेश जात आहे. असा माणूस Big bossच्या घरी राहण्यास योग्य नाही. त्यामुळे त्याला तातडीने घरातून बाहेर काढण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
Big Bossमध्ये सेट होत आहे एक नवा टार्गेट
त्या दिवशी नेमंक झालं काय?
आता Big boss हा रिअॅलिटी शो असल्यामुळे या शोमध्ये टास्क हे आलेच. एका टास्क दरम्यान 1 ते 10 या क्रमांकावर घरातील कामगिरीनुसार स्पर्धकांना उभे राहायचे होते. पहिल्या क्रमांकावर अभिजीत केळकर, दुसऱ्या क्रमांकावर किशोरी शहाणे, मग नेहा शितोळे असे उभे राहिले. बझर वाजण्याच्या आत चौथ्या क्रमांकावर अभिजीत बिचुकले उभा राहिला. त्यामुळे रुपालीला सातव्या क्रमांकावर उभे राहावे लागले. बिचुकलेंना चौथ्या क्रमांकावर पाहून रुपाली चिडली आणि तिने त्याचा दुटप्पीपणा आणि घरातील कामगिरी यावर आरोप केल्यानंतर अभिजीत बिचुकलेला रुपालीने त्यांच्या मुलीची शप्पथ दिली. त्यानंतर चिडलेल्या बिचुकलेने अर्वाच्च शब्दात रुपालीला बोलायला सुरुवात केली. तिच्या घटस्फोटापासून ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे शब्दोच्चार केले. प्रकरण इतकं तापलं की, टेलिकास्ट केलेल्या एपिसोडमध्ये अनेक गोष्टी बीप… करण्यात आल्या.
Big Bossच्या घरात असा रंगला पहिला टास्क
अखेर चौथ्या क्रमांकावर गेली रुपाली
या टास्कमधील भांडणानंतर इतका गोंधळ झाला की, या दोघांमध्ये खडाजंगी जमली. हा फालतू खेळ मला खेळायचा नाही म्हणून त्यांनी चौथा क्रमांक सोडून दिला. त्या जागी रुपाली जाऊन उभी राहिली.
कोण आहे अभिजीत बिचुकले?
सगळ्यांच्या डोक्याला ताप देणारा हा बिचुकले आहे तरी कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा बिचुकले आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मूळ सातारचा असलेला अभिजीतने आतापर्यंत नगरसेवकापासून ते अगदी राष्ट्रपतीपदापर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना देखील त्याने खुले आव्हान दिले आहे. तब्बल 20 वेळा निवडणुका लढवूनही तो एकदाही जिंकला नाही. त्याने स्वत:ला 2019 साली मुख्यमंत्री होण्याचे पोस्टर देखील लावले होते.
या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?