बॉलीवूड सोलिब्रेटीज त्यांच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असतात. सिनेक्षेत्रात टिकून राहण्यासाठी सतत डाएट आणि फिटनेसबाबत काळजी घेणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. ज्यामुळे अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी मांसाहार सोडून चक्क शाकाहारी झाले आहेत. शुद्ध आणि सात्विक आहाराचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम होत असतो. काही कलाकारांनी तर यासाठी चक्क वेगन डाएटचा मार्ग धरला आहे. जाणून घ्या असे कोणते कलाकार आहेत जे फिट राहण्यासाठी फक्त शाकाहार करतात हे जरूर जाणून घ्या.
शुद्ध शाकाहार करणारे हे कलाकार तुम्हाला माहीत आहेत का ?
बॉलीवूडचे हे असे कलाकार आहेत ज्यांनी फिट राहण्यासाठी मांसाहार करणं सोडून शाकाहार करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहीद कपूर
बॉलीवूडचा कबीर सिंह अर्थातच शाहीद कपूर शाकाहारी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मांसाहार सोडून शाकाहारी झाल्यानंतर शाहीद खऱ्या अर्थाने आनंंदी झाला आहे. शिवाय हा जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग आहे असं त्याचं म्हणणं आहे. PETA या पशुअधिकार संघठन संस्थेच्या वतीने त्याला हॉटेस्ट व्हेजिटेरिअन हा पुरस्कार मिळाला आहे.
कंगना रणौत
कंगना रणौत ही बॉलीवूड अभिनेत्री पूर्वी अगदी अस्सल मांसाहारी होती मात्र ती आता पूर्णपणे शाकाहारी झाली आहे. कंगनाच्या आयुष्यात असं काही घडलं की तिने मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे. कंगनाच्या मते तिच्यात तिने असे काही अध्यात्मिक बदल केले की तिला मांसाहार बंद करावासा वाटू लागला. शिवाय जर तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही तुमच्या मांसाहाराच्या ईच्छेवर नियंत्रण मिळवू शकता असंही तिने व्यक्त केलं आहे.
जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीनचे प्राण्यांवर फार प्रेम आहे. ज्यामुळे तिने वेगन होण्याचा निर्णय घेतला. शिवाय तिला सात्विक आणि शाकाहारी जेवण फार आवडतं. सेंद्रिय अन्नपदार्थ खाण्याची तिला आवड आहे. प्राणीप्रेमापोटी प्राण्यांच्या अधिकारासाठी कार्यरत संस्थांना ती सतत सहकार्य करत असते.
आर माधवन
आर माधवन हा बॉलीवूड आणि टॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वांचा एक आवडता अभिनेता आहे. मात्र एवढंच नाही तर आर माधवन पूर्णपणे शाकाहारी आहे. आर माधवनच्या मते जर तुम्ही कधी एखाद्या कसाईला प्राण्यांची हत्या करता पाहिलं तर तुम्ही स्वतःहून मांसाहार करणं बंद कराल. शिवाय मी शाकाहारी आहे हे सांगण्यासाठी मला कोणताही संकोच वाटत नाही.
करिना कपूर
कपूर घराणं त्यांच्या अभिनयाप्रमाणेच खवैयेगिरीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. करिना कपूर फूडी असल्यामुळे तिच्या खाण्या-पिण्याच्या आवडीबाबत चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. शिवाय करिना फिटनेसबाबत जागरूक असल्यामुळे ती नेमकं काय खाते हे जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही. मात्र करिना पूर्णपणेे शाकाहारी आहे हे तुम्हाला माहीत होतं का? करिनाच्या मते तिने अनेक वर्षांपासूनच मांसाहार बंद केला आहे. तिच्यामते मांसाहारापेक्षा शाकाहार हा नेहमीच उत्तम असतो.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील मांसाहार सोडून शाकाहारी झाली आहे. अनुष्का तिच्या या निर्णयाबद्दल फारच खूष आहे. मांसाहार सोडणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही असं म्हटलं आहे. प्राण्यांवर असलेल्या प्रेमापोटी तिने हा निर्णय घेतला आहे.
विद्या बालन
विद्या बालन लहानपणापासूनच शाकाहारी आहे. मात्र तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर पक्के मांसाहारी आहेत. घरात मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे लोक असतील तर एकत्र जेवण करणं थोडंसं कठीण जातं. मात्र विद्याला यात काहीच गैर वाटत नाही. तिच्या मते ती पूर्वीपण शाकाहारी होती आणि आयुष्यभर अशीच असणार.
आमीर खान
एक असा काळ होता जेव्हा अमीर खानला मटण,चिकन, मासे, अंडी फार आवडत असत. मात्र आता अमीर पूर्णपणे शाकाहारी आणि वेगन झाला आहे. अमीर खान फक्त आहारातून भाज्या आणि फळं घेतो. शिवाय त्याने वेगन झाल्यापासून दूध आणि दूधाचे पदार्थदेखील कमी केले आहेत.
सोनम कपूर
अमीर खान प्रमाणेच अभिनेत्री सोनम कपूरदेखील मांसाहार सोडून वेगन झाली आहे. ज्यामुळे तिने आता मांसाहाराप्रमाणेच दूध आणि दूधाचे पदार्थ आहारातून वर्ज्य केले आहेत. ती तिच्या या लाईफस्टाईलबाबत अत्यंत खूष आणि आनंदी आहे.
अधिक वाचा
बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय
या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या
सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम