कलाकारांसाठी चित्रपटात विविध भूमिका साकारणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. निरनिराळ्या पठडीतल्या भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कधी कधी या भूमिका साकारण्यासाठी त्यांना स्वतःच्या लुकमध्ये अनेक बदलही करावं लागतात. कलाकारांसाठी एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी करणं हे नेहमीचच आहे. कारण स्लीम आणि फिट दिसणं हे प्रत्येकाचं स्वप्नच असतं. मात्र कधी कधी एखाद्या भूमिकेसाठी कलाकारांना वजन वाढवावंही लागतं.अशा प्रकारे वजन वाढवल्यावर ते कमी करण्यासाठीही तितकीच मेहनत पुन्हा घ्यावी लागते. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी भरपूर वजन वाढवलं होतं.
Table of Contents
भूमी पेडणेकर –
दम लगा के हैशा या चित्रपटात भूमि पेडणेकरने एका लठ्ठ बाईची भूमिका केली होती. ज्यासाठी तिने जवळजवळ 30 किलो वजन वाढवलं होतं. लठ्ठपणामुळे लग्नानंतर येणाऱ्या अडचणींवर आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर भूमीला तिचं वजन पुन्हा पूर्ववत केलं.
अमिर खान –
अमिर खानला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखलं जातं. अमिरचे सर्वच चित्रपट लोकप्रिय होतात. कारण तो त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेसाठी प्रंचड घेत असतो. त्याच्या दंगल चित्रपटासाठी स्वतःचं वजन जवळजवळ 100 किलोपर्यंत वाढवलं होतं.
कंगना रणौत –
कंगना रणौत निरनिराळ्या भूमिका नेहमीच साकारत असते. मात्र तिच्या एका आगामी चित्रपटासाठी तिने चक्क तिच्या वजनात प्रंचड वाढ केली आहे. तिच्या आगामी थलायवी या चित्रपटासाठी तिने जवळजवळ 10 किलो वजन वाढवलं आहे. या चित्रपटात ती जयललिता यांची भूमिका साकारत आहे.
सलमान खान –
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या फिटनेससाठी लोकप्रिय आहे. अनेकवेळा त्याच्या जीममधील व्यायाम करताना असलेले फोटो तो त्याच्या चाहत्यासोबत शेअर करत असतो. मात्र सलमानने त्याच्या सुलतान या चित्रपटासाठी 25 किलो वजन वाढवलं होतं. कुस्ती सोडल्यानंतर पोट सुटलेला रेसलर दाखवण्यासाठीदेखील त्याला त्याच्या लुकमध्ये अनेक बदल करावे लागले होते.
क्रिती सेनन –
क्रिती सेननचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गरोदर असल्याचं दिसत आहे. कृतीने तिच्या आगामी चित्रपट मिमीसाठी अंदाजे 15 किलो वजन वाढवलं आहे. या चित्रपटात ती एका सरोगेट आईची भूमिका साकारणार आहे.
रणवीर कपूर –
रणबीर कपूरनेदेखील त्याच्या संजू या चित्रपटातील विविध लुकसाठी प्रंचड मेहनत घेतली होती. हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित होता. या बायोपिकसाठी रणवीरने पन्नाशीतील संजय दत्त साकारण्यासाठी वजनात प्रंचड वाढ केली होती.
विद्या बालन –
डर्टी चित्रपटातून विद्या बालनच्या अभिनयाचे विविध पैलू चाहत्यासमोर आले. या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी तिने तिच्या वजनात खूप वाढ केली होती. साऊथची अभिनेत्री साकारण्यासाठी तिला त्याच पद्धतीचे बदल स्वतःच्या लुकमध्ये करावे लागले होते.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची लोकप्रियता