ADVERTISEMENT
home / मनोरंजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बॉलीवूडने ‘या’ गाण्यातून दिला संदेश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बॉलीवूडने ‘या’ गाण्यातून दिला संदेश

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त बॉलीवूडने एका गाण्यातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला आहे. ‘थोडी हवा आने दे, ताजी हवा आने दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातून सेलिब्रेटींनी पर्यावरण वाचविण्यासाठी आणि शुद्ध हवा टिकविण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. पर्यावरण मंत्रालय आणि भामला फांऊडेशन यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. भामला फांंऊडेशन ही बालविकास, महिला सशक्तीकरण, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर जनजागृती करणारी एक संस्था आहे.

हवा आने दे गाण्यात बॉलीवूडची मांदीआळी

या गाण्याच्या सुरूवातीलाच अक्षय कुमार दिसत आहे. अक्षयसोबत विकी कौशल, राजकुमार राव, कपिल शर्मा, कोरिओग्राफर शामक दावरदेखील या गाण्यात पर्यावरणाचा संदेश देताना दिसत  आहेत. शिवाय पर्यावरण दिना निमित्त सुनिधी चौहान, शान, स्वानंंद किरकिरे, शंकर महादेवन यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यातून मुलांचे भविष्य आणि आरोग्याच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण  करण्यात आला आहे. यात दाखविण्यात आलेली भारतीय मुलं पर्यावरण वाचविण्यासाठी कार्य करताना दाखविण्यात आली आहेत. दैनंदिन जीवनात थोडेसे बदल करून आपण आपलं आरोग्य आणि पर्यावरण कसं वाचवू शकतो हे एका अनोख्या पद्धतीने यात दाखवलं आहे.  या गाण्यातून झाडे लावण्यासोबतच वाहतुक कोंडी आणि त्यातून निर्माण होण्याऱ्या प्रदूषणाचा प्रश्नदेखील मांडण्यात आला आहे. कारण World environment day 2019 ची थीम वायू प्रदूषण ही आहे. हे गाणं उत्तम संगीत आणि मांडणी यामुळे आकर्षक झालं आहे. थोडी हवा आने दे या  गाण्यामुळे नव्या पिढीसमोर पर्यावरणाचा ढासणारा तोल अगदी सहजपणे मांडता येऊ शकतो. या गाण्यामुळे पर्यावरणाचे वाढणारे प्रश्न सोडवणे सोपे जाऊ शकते. या गाण्यातून वाढत्या प्रदूषणाबाबत जनजागृती झाल्याने त्यावर उपाय शोधणेदेखील सोपे होणार आहे. बॉलीवूड आणि सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचलेले एक चांगलं पाऊल आहे. सेलिब्रेटींप्रमाणे जगातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभाग घेण्याची गरज आहे. अनेक सेलिब्रेटी ट्विटरच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयुषमान खुराना

जान्हवी कपूर

 

जागतिक पर्यावरण दिनाचे उद्दीष्ट

वाढती जीवनशैली आणि सुखसुविधा यामुळे प्रदूषणदेखील वाढतच आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केल्यास खरा पर्यावरण दिन साजरा होऊ शकतो. जगभरात जवळजवळ शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये आज पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुळ उद्देश पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हाच आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या या स्तुत्य उपक्रमाचे चाहत्यांकडून नक्कीच स्वागत होणार आहे. सेलिब्रेटीजचे चाहते त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या गाण्याच्या चाहत्यांच्या मनावर चांगला परिणाम होईल आणि पर्यायाने पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी बॉलीवूडला आशा आहे.

ADVERTISEMENT

राजकुमार राव

अधिक बातम्या वाचा-
Save Earth Slogans in Hindi
पृथ्वी दिवस का इतिहास
निकशी प्रसिद्धीसाठी लग्न केल्याच्या आरोपावर प्रियांकाचं सडेतोड उत्तर
याच इफ्तार पार्टीमध्ये झाला होता सलमान आणि शाहरुख मिलाप
कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

04 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT