निकशी प्रसिद्धीसाठी लग्न केल्याच्या आरोपावर प्रियांकाचं सडेतोड उत्तर

निकशी प्रसिद्धीसाठी लग्न केल्याच्या आरोपावर प्रियांकाचं सडेतोड उत्तर

प्रियांका चोप्रा आणि निकच्या लग्नाला आता सहा महिने झाले आहेत, मात्र अजूनही कित्येक लोक या जोडीवर सतत काही ना काही चर्चा करत त्यांना टोमणे मारत असतात. जोधपूरमध्ये प्रियांका - निकने केलेल्या लग्नाला एका बाजूला प्रसिद्धी मिळाली तर दुसऱ्या बाजूला त्यांना ट्रोल्सनादेखील सामोरं जावं लागलं. कधी दोघांमधील वयाच्या अंतराची चर्चा तर कधी निक प्रियांकासमोर लहान दिसतो ही चर्चा. पण या सर्वात मोठा आरोप प्रियांकावर करण्यात आला होता तो म्हणजे निकबरोबर प्रियांका चोप्राने पैशांसाठी लग्न केल्याचा. या आरोपावर प्रियांका, निक इतकंच नाही तर तिचा दीर जो जोनस आणि त्याची पत्नी सोफी टर्नर यांनीदेखील राग व्यक्त केला होता.


Priyanka Chopra on Trollers1 FI


प्रसिद्धी आणि पैशासाठी निकबरोबर लग्न केल्याचा आरोप


अमेरिकेतील एका प्रसिद्ध मॅगझिनने प्रियांका चोप्रावर निक जोनसबरोबर लग्न करण्यासाठी ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा आरोप लावला होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रियांने प्रसिद्धी आणि पैशासाठी निकबरोबर लग्न केलं. वास्तविक प्रचंड विरोध केल्यानंतर हे आर्टिकल मॅगझिनला काढून टाकावं लागलं होतं. पण त्यानंतर आता पहिल्यांदाच या गोष्टीवर खुलेआम प्रियांकाने भाष्य केलं आहे.


Priyanka Chopra on Trollers3


एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने सांगितलं की, ‘मी त्यावेळी गप्प राहिले पण मी जेव्हा निकला शोधायला हॉटेलच्या बाहेर गेले तेव्हा मी पाहिलं की, निक, जो, सोफी आणि आई हे सगळेच रागाने त्या आर्टिकलबद्दल आणि त्यांना उत्तर देण्याबद्दल बोलत होते. मला वाटलं मी एक स्वप्नं पाहत आहे आणि मला या स्वप्नातून कधीही बाहेर यायचं नव्हतं’


ट्रोलर्सबाबत बोलली प्रियांका


Priyanka Nick


याच मुलाखतीदरम्यान प्रियांकाने त्या सर्व ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या प्रत्येक फोटोला जे ट्रोल करतात त्यांना तिने या माध्यमातून उत्तर दिलं आहे. प्रियांकाने सांगितलं, ‘मी जर प्रसिद्ध नसते आणि माझं आताच लग्न झालं असतं तर तुम्हाला वाटत नाही का की माझ्या नवऱ्याबरोबर आताही फोटो पोस्ट केले असते? मी एक सेलिब्रिटी आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही की, मी नवविवाहितेसारखी वागू नये. मला माझं आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क आहे.’ तसंच प्रियांकाने पुढे असंही म्हटलं की, ‘मी जेव्हा एक पब्लिक फिगर अर्थात प्रसिद्ध झाले तेव्हाच माझं वैयक्तिक आयुष्य अर्थात खासगी आयुष्य संपलं होतं. पण तरीही काही गोष्टी या खासगी असतात आणि त्या मला खासगी ठेवायलाच आवडतात.’ तिच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा तिला ट्रोल केलं जातं, तेव्हा तिला तिचा नवरा निक खूपच पाठिंबा देतो. यामुळेच ते दोघं एकमेकांबरोबर अतिशय प्रेमाने आणि सुखाने राहू शकतात.


निकचं प्रियांकावरील प्रेम


prinick
निकचं प्रियांकावरील प्रेम नेहमीच त्याच्या वागण्यातून दिसून आलं आहे. निक आणि प्रियांकाचे नेहमीच वेगवेगळे फोटो पोस्ट होत असतात. काही व्हिडिओमध्ये प्रियांकाजी काळजी घेत असलेला निक बऱ्याचदा दिसून येतो. इतकंच नाही तर प्रियांकाही तितक्याच प्रेमाने आणि काळजीने निकबरोबर असते. त्यामुळे त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम असलेलं दिसून येतं. त्यामुळे या मुलाखतीच्या माध्यमातून प्रियांकाने आपल्या हेटर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


प्रियंका-निकचं हे ‘बेडरूम सिक्रेट’ तुम्हाला माहीत आहे का


हा #Hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण


बाॅलीवूड स्टार्सना आहे विचित्र फोबिया, तुम्हाला वाटेल आश्चर्य